Posts

Showing posts from November, 2023

कविता - 🌷 " सिकंदर - पौरस " तारिख - १२ डिसेंबर २०१६

कविता - 🌷 " सिकंदर - पौरस " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - १२ डिसेंबर २०१६ कधी शत्रूही जाऊ शकतो भारावून, उच्च- तम जीवन- मूल्यांना पाहून ... रणयुद्ध थांबवून, अभय-दान देऊन जन्म-भराच्या मैत्रीचं वरदान देऊन ... जग-ज्जेता व्हायचं एकमेव स्वप्नं ... उराशी आला होता तो कवटाळून ... सिकंदर सुसाट घुसला हिंदुस्तानात, लढला संपूर्ण तयारी-निशी जोशात ... पौरस व अंभी हे शेजारच्या राज्यांचे राजे ... पण दोघांच्यामधून विस्तव सुद्धा जात नसे ... एक दक्षिण-धृव दुसरा उत्तर-धृव असे होते ते... पौरसचं सरळ मन, अंभी भ्याड-मतलबी-धूर्त पौरस सुसंस्कृत,अंभी संधी-साधून सोडी मुहूर्त ... हिंदुस्तानात घुसण्या आधी, खूप पूर्वी-पासून  हुशार, महत्वाकांक्षी सिकंदरने गृह-पाठ करुन दोघांचेही स्वभाव-विशेष ठेवले होते तपासून ... आपसातल्या त्या दुष्मनीचा फायदा उचलून ... एकाचवेळी दोघांच्याकडे शांती प्रस्ताव पाठवला ... घाबरट, लालची अंभी त्याच्या जाळ्यात फसला ... त्यामुळं युद्ध-शांती-करार सिकंदर-अंभीत झाला शूर-वीर पौरसने प्रस्ताव साफ शब्दात फेटाळला ... सिकंदर-पौरसचा जेव्हा झाला आमना-सामना,  सिकंदर मनी म्हणाला,"ये ...

कविता - 🌷 " न लढताच सर केला जीवन-गड " तारिख - २ सप्टेंबर २०१६

कविता - 🌷 " न लढताच सर केला जीवन-गड " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - २ सप्टेंबर २०१६ माता करीते सूक्ष्मतम संस्कार गर्भावर ... घटिका-पळे-दिस-मास जाती भराभर ... जीव जन्मतो नऊ मास पूर्ण झाल्यावर ... अभिमन्युपरि लेवून संस्कारांची झालर ... माता मग करीतसे नव-संस्कार त्या नवजीवावर ... वात्सल्याचे बोल करिती संस्कार त्या अर्भकावर... हळूहळू सुसंस्कार घडत जाती सतत त्या बाळावर... रात्रंदिवस सूक्ष्मातिसूक्ष्म पैलू पडत जाती हिऱ्यावर ...   माता दररोज सांगे गोष्टी महान्-सद्गुणी-व्यक्तींच्या... कान टवकारुन श्रवण करीतसे बाळ, तन्मयतेने त्या ... आपसूक संस्कार होई तेव्हा विविध प्रकारच्या गुणांचा... गोष्टी संत-महंतांच्या, गोष्टी कर्तृत्वाच्या-अध्यात्माच्या... गोष्टी राजा-महाराज्यांच्या, देशभक्तीच्या-रामायणाच्या... गोष्टी महाभारताच्या निष्ठेच्या-चातुर्याच्या अन् विरतेच्या... जिजाऊंनी जन्म देऊन, कणाकणांनी घडवलं शिवबाला... ऐकून गोष्टी-धैर्याच्या-शौर्याच्या-धाडसाच्या अंतर्मुख झाला... अन्यायाच्या, अन्याय-कर्त्यांच्या विरुद्ध पुरता पेटून उठला... मनोमनी तेव्हाच, गो-ब्राह्मण-प्रतिपालकाचा निश्चय झ...

कविता - 🌷 " परी या-सम-हा " तारिख - १० डिसेंबर २०१६

कविता - 🌷 " परी या-सम-हा " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - १० डिसेंबर २०१६ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ... नाव घेताच स्वाभिमानाचे, रोमांच सर्वांगावर ... " ने मजसी ने, परत मातृभूमीला ...सागरा प्राण तळमळला,सागरा ..." शब्द, अंतर्मन हलवून सोडणारे, थेट काळजाला हात घालणारे ... शब्द, अत्यंत प्रभाव पाडणारे-शंभर नंबरी लख्ख सोन्यासारखे ... वयाच्या पंधराव्या वर्षापासून समर्थ लेखणी ... काव्य तथा लेख एकदम मुद्देसूद, छान मांडणी ... नाट्य-काव्य-संगम- देशप्रेमाची उपजत लेणी ...  ओजस्वी- वक्ता, प्रभावशाली, ओघवती वाणी ... एक कवी, लेखक, नाटककार म्हणून श्रेष्ठ ... एक नेता, स्वातंत्र्य-सेनानी म्हणून उत्कृष्ट ... एकनिष्ठ प्रखर- देशभक्त म्हणून, अत्युत्कृष्ट ... माणूस म्हणून महान, कार्यकर्ता, बुद्धिनिष्ठ ... किर्तीची अजिबात हाव नाही ...पैशाचा बिल्कुल मोह नाही ... पदासाठी खेच-ताण नाही ...वेड फक्तं देशाच्या स्वातंत्र्याचं ... सार्थ अभिमान हिंदूत्वाचा-आंतरिक तळमळ फक्तं मातृभूमीची ... त्याकाळातही आग्रह धरला हिंदू-संस्कृतीतून, जातीयवाद संपूर्ण-समूळ उच्चाटन करण्यासाठी ... धर्मान्त...

कविता 🌷 " खुमारी " तारिख - गुरूवार, ११ मे २०१६

  कविता - 🌷 " खुमारी " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले  तारिख - बुधवार, ११ मे २०१६ यंदाच्या आँगस्टमध्ये पक्कं ठरवलंच होतं, कि येणाऱ्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यातच, ऑस्ट्रेलियातील थेट सिडनी-शहर गाठायचं ... दोन्ही मुलांची गुप्त खलबतं-खास योजना, काय-काय करायचं आईच्या वाढदिवसाला ... तरुण तन-मन, तरुणाईचा पुरेपूर जोश होता  त्यांचा उत्साह नुस्ता ओसंडून वाहत होता ... ब-याच विचारांती त्यांचा निर्णय झाला होता ... तीन वेगळ्या देशांतून-खंडातून एकत्र जमायचं, एका नवीन-न पाहिलेल्या-देशात तिला न्यायचं, अन् एकदम तिला "सरप्राईज" करुन टाकायचं ...! तिच्या कानावर ही तथाकथित 'गुप्तबातमी', खास-गुप्त-गोटातून, उडत-उडत आली होती... असं असतानाही "सरप्राईज" होण्यासाठी ती, नेहमी प्रमाणेच होती मात्र, पुरती आसुसलेली ... दोघंही अगदि लहान होती, तेव्हापासूनचे किस्से ... पिगी-बॅंकेतून गुप-चुप जमा केलेले खाऊचे पैसे ... त्यांची गोड गुपितं दबक्या आवाजातील खुसफुस ...  ड्रॉइंग काढून-रंगवून तयार केलेली ग्रीटिंग कार्ड्स ... त्या लडिवाळ-निरागस शुभेच्छा-पत्रांची बरोबरी,  महागड्या-प्रसिद्ध-चित...

कविता - 🌷 " संस्कारांची महानता " तारिख - १६ डिसेंबर २०१६

कविता - 🌷 " संस्कारांची महानता " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - १६ डिसेंबर २०१६ २०११ सालची गोष्ट ...आम्ही नीसहून स्वित्झर्लंडच्या" लुसन "ला आलो ... झुरीकची सीमा ओलांडल्यावर हिरव्या-रंगाच्या एक-लाख छटा बघितल्या ... डोळ्यांना अत्यंत सुखावह-नेत्र-दीपक, शितल मन-मोहक ... लांब-रुंद पठारं, हिरवीगार ...त्यावर मनसोक्त चरणारी गाई-गुरं ... पार्श्वभूमीवर निळं-निळं आकाश सुंदर ...प्रति-स्वर्गच जणू या पृथ्वी-तलावर ... सर्वांग सृष्टी-सौंदर्याचं आकंठ रसपान-इतका नयनरम्य की वाटलं, संपूच नये हा प्रवास ... " लूसन " हे स्वित्झर्लंडचं, अतिशय देखणं असं शहर ... सगळी प्रेक्षणीय-स्थळं पालथी घातली-वस्तुतः प्रेक्षणीय होता प्रत्येक इंचनइंच ... विधात्याची करणी, सर्वत्र उदंडं सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण ... लुसनला मनसोक्त राहून, हिंडून-फिरून, लुटला आनंद ... मग पुढचं शहर होतं " इंटर-लाकन "...त्यासाठी ट्रेनचं केलं होतं आरक्षण ... हॉटेल चेक-आऊट करुन, गाठलं स्टेशन-तेव्हा माझी गट्टी एका फ्रेंच-बाईशी जमली ... ती वयस्क होती-तिच्या ट्रेनला खूप अवधी होता, मोठ्या मुलासह सामान सा...

कविता - 🌷 " अखंड-अविरत " तारिख - गुरूवार, ३० मार्च २०१७

कविता - 🌷 "  अखंड-अविरत  "    कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले  तारिख - गुरूवार, ३० मार्च २०१७ वर्षा मागून वर्षं येतात, वर्षं जातात ... नवे दिवस येतात अन् पुढे सरकतात ... ॠतुचक्र नित्य-नेमानं चालंतंच राहतं ... विनाकारण कंटाळा करतो तो, फक्त माणूस ... पण निसर्ग हा कदापिही कुचराई नाही करत ... जशी सागराची नित्य भरती-ओहोटी चालते ... चंद्राच्या उदय-अस्तावर, अखंड अविरत होते ... त्यात अजिबात  टाळाटाळ  नाही वा  खंडही  नाही ऊन-पाऊस, झाडं-झुडुपं, वृक्ष-वेली, अवघी सृष्टि काटेकोरपणे पाळतात त्यांची-त्यांची वेळापत्रकं   ॠतु नंतर ॠतु, आपापलं काम चोख बजावतात ... झाडं बहरतात, पानगळीत पूर्णतः निष्पर्ण होतात ! वसंत-ॠतुच्या चाहूलीनं,  पुन्हा एकदा  निखरतात ... पाना-फुलांनी-कळ्यांनी डवरुन  अत्यानंदे डोलतात ... पक्षांना प्रेमानं आसरा देत,  घरटी-पिल्लं सांभाळतात ... रणरणत्या उन्हात सावली करुन सर्वां विसावा देतात ... सुसाट वा-या-पावसात-सारे आस-याला विसावतात युगानुयुगं रहाटगाडग्यासम चालू आहे हाच जीवनक्रम श्रेय सर्वस्वी, निसर्गदत्त शिस्तबद...

कविता - 🌷 ' भाली प्रकटे त्रिकाल-ज्ञान ' तारिख - १६ सप्टेंबर २०१६

कविता 🌷 ' भाली प्रकटे "त्रिकाल-ज्ञान" ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - १६ सप्टेंबर २०१६ अध्यात्म-विषयीचा खरा अभ्यास ... अंधारातून स्व-प्रकाशाकडे प्रवास ... तामसी-जीवन-जगणं न येई रास, तर अथक करावाच लागेल प्रयास ... स्तोम नसावं, हवी मनोपासना... सदा हवी अंतःकरणी सद्भावना ... उजळुनी देह-दीपक केली अर्चना, लक्ष-दीप उजळती-ईश्वरी-संकल्पना ... देवत्व म्हणजे सात्त्विक दैवी-गुण ... पूर्णतः समर्पित, निराकार निर्गुण अवतार रूपात करी जगत् कल्याण भू-वरी सृष्टी-नभी रवी-चंद्र निर्माण ... ज्योत-ज्योत होई हृदयी प्रकाशमान ... जल-स्रोत-स्रोत बने गंगोत्री-समान ... मना-मनात प्रेम-दया-भाव दैदिप्यमान ... भाली  प्रकटे  तेजस्वी  "त्रिकाल-ज्ञान" ... देव न असे बंधनात बांधलेला ... शेता-शेतात बीज-रूपे रुजलेला ... जरी राऊळी पूजन-अर्चन-सोहळा , तो सदा हृदयस्थ-गाभाऱ्यात वसलेला ... तेजाला ओवाळीते नयन-ज्योती ... हृदयीच्या-भावार्थाने चक्षू साश्रु होती ... विणा-वादन होता सुस्वर झंकारती ... जणू सप्त-सुर-स्वर्ग धरेवर अवतरती... जाऊनी भगवन्तासी शरण, करुनी श्वासांचा झुला पाचारण... देह रूपी नजर...

कविता - 🌷 ' समर्पण ' तारिख - १६ सप्टेंबर २०१६

कविता - 🌷 ' समर्पण '            कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - १६ सप्टेंबर २०१६ कविवर्य कुसुमाग्रज असती महान लेखन-सामर्थ्ये होई रसिकांस ज्ञान  देवाचं  वास्तव्य  हा विषय नसे लहान ... विचार-लहरींचं सुरु होतं गूढ-थैमान .. मनुजानं बांधली देवळे अनेकानेक ... कला-कुसरीला लागली वर्षे अनेक .. . गाभाऱ्यात किमती-माणके कित्येक  वास्तु उभारण्या करामती अठराशे एक ... सर्व जमूनही देव काही केल्या मिळेना, जंगजंग पछाडले, पावा काही वाजेना ... उत्सव-मूर्तीविना मंदिर काही खुलेना ... माणसांचा नवस-धावा तो काही ऐकेना ... भाव असेल सच्चा, तरच पावतो देव ... भावात नाही " राम ", तरी देवा मला पाव ... जिथे श्रेष्ठ गुणांचं दर्शन,   तेथेच होतसे नमन-पूजन मस्तक झुके, दो-कर जोडून,   ईश्वरी भाव तो अति-पावन ... सहज पावतो तो, भक्तांची आंतरिक कृतज्ञता जाणून ... समर्पणावीण मानव बनू शकतो दानव, देव-देवतांच्यात सुद्धा करतो भेदभाव... अवघ्या विश्वात केवळ "भक्ति-हाच-खरा-भाव " एकच शक्ति तरी जगभर दिली जाती हजारो-नावं ... जेथे जेथे होतसे खरेे श्रम-दान ... तेथे नक्की अस...

कविता - 🌷 " जाणीव अज्ञानाची " तारिख - १७ डिसेंबर २०१६

कविता - 🌷 " जाणीव अज्ञानाची " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - १७ डिसेंबर २०१६ सर्वप्रथम एखाद्या अज्ञान बालका-परी, कायमची एक जिज्ञासा, प्रत्येक गोष्टीची ... कालांतराने जसा-जसा थोडा-थोडा अंतरीचा प्रकाश लागतो उजळायला  ... प्रकर्षाने हेच वाटू लागे जाणवायला, की काहीच येत नाही बरं, आपणाला ... अजून अधिक कालावधी लोटला ... सुरु होतंच ज्ञान-कण करणं गोळा ... मधमाशी-सम, जाऊन फुला फुला ... सूक्ष्म, तरलतम " मधु " करुनी गोळा ... मन मात्र सांगे, ज्ञानाच्या नावानं "भोपळा" ... अंतर्यामी ज्ञानार्जनाची तहान वाढतच जाई ... दश-दिशा हिंडून, मनापासून अभ्यास होई ... कित्येक मान्यवरांबरोबर, चर्चा-संवाद होई ... "काही येत नाही" यांची नव्यानं जाणीव होई ... अधिक खोलवर अध्ययन, वाचन- मनन... दिन-रात ध्यास, विसरून सर्व भूक-तहान करुनी ज्ञानार्जन, नि:संकोच, विनाअभिमान  फिरून कळून चुके, " आपण शून्य-समान"... जशीजशी प्रगती-पथावर पडत जाती पावलं, स्वतःच्या "अज्ञाना"चेच उभे दिसे, उंच राऊळ ... जाणीव झाली, मुंगीपेक्षा लहान आहोत आपण ... हे विशाल-विश्वं, त्यातील आ...

कविता - 🌷 "अद्वितीय, दिव्य रसायन " तारिख - १५ मे २०१७

कविता - 🌷 "अद्वितीय, दिव्य रसायन " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले  तारिख - सोमवार, १५ मे २०१७  ती संमिश्र भाव-भावनांनी सजलेली ... दोन मे ची अद्भूत अशी पहाट उगवली ... एकीकडे, भुर्रकन् उडून,  अखेर  पिल्लांकडे जाण्याचा तो सुदिन, वास्तवात येऊन उभा ठाकलेला ... यामुळे प्रचंड आनंद, मनोमनी होता दाटला ... तर दुसरीकडे, लग्न करून, शुभ-विवाहानंतरच्या अनंत ... अत्यंत नाजुक, हळुवार आठवणी व क्षण ... या सगळ्याला साक्षिदार असणार्या, सुंदरशा या शुभ-शकुनी वास्तुला, तिच्या हक्काच्या या "गृहलक्ष्मीला"... आता मात्र बराच काळ मुकावं लागणार ... देहानं दूरदेशी पण मन इथेच रेंगाळणार ... 'घर' म्हणून हीच वास्तु समोर साकारणार ... तिचा प्रिय सुंदर निसर्ग, निगडीत या वास्तुशी   फुल-झाडं, किचन-गार्डन जी तिने लावलेली ... या वास्तुतील काऊ-चिऊ पोपट-मैनादी पक्षी ... खूप हलकं वाटत होतं, जरुरी कामं पूर्ण झाली ... तिने मना-पासून, आवडीने, सुशोभित केलेली प्रत्येक गोष्ट, कोनाकोपरा अन् खोली-न्-खोली या सर्वांना पाहताना डोळे भरून ... तिचं हळवं मनही भरून आलेलं ... साश्रू डोळ्यांपुढे  सगळं  ...

कविता -🌷 " सैराट मन " तारिख - २७ मार्च २०१७

कविता -🌷 " सैराट मन "  कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले  तारिख - सोमवार, २७ मार्च २०१७ कधी कधी खट्याळ वारा  हळूच, खोड्या पण काढतो ... ओढणीला हवेत उडत ठेवतो अन् तिची जणू छेड काढतो ... तर कधी, बरसून रिमझिम सरी तिला अलगद भिजवून जाई ... ओढणी तिला बिलगुन जाई ... ऊन मग तिच्याशी, लपाछपी खेळणार तिची ओढणी मग, डोक्यावर शोभणार मातीच्या सुगंधातही तिचं मन रमणार बालपणीच्या गमती, आठवत बसणार त्या कागदी होड्यांमागे धावणं ... लावलेल्या स्पर्धेत, चिंब भिजणं ... मस्त मजेत, वेळेचं भान विसरणं, लपत-छपतच घरी उशिरा जाणं ... आईच्या पाठीमागे धोशा लावणं सारं जणू कालच घडलंस वाटणं कळलच नाही, असं कसं वाढलं वय ... मनाला लागू नाही, काळ-वेळ वा समय ! शरिर त्याच्या, धिम्या गतिने चालणार ... मन सैराट, वार्याच्या गतिने बागडणार ... आठवणींना, कसं बरं बंधनात ठेवणार ... 🌷@तिलोत्तमा विजय लेले  🙏🕉️🌅

कविता - 🌷 " जन्माचं झालं सार्थक " तारिख - ३० सप्टेंबर २०१६

कविता - 🌷 " जन्माचं झालं सार्थक "        तारिख - ३० सप्टेंबर २०१६ कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले जीवनात असं मागं वळून पाहता-मोहक क्षण, पुन्हा येती अनुभवता ... तेव्हा कळत नाही त्यांची महानता-वेगळीच खुमारी त्या क्षणांची आता ... पहीलं-वहीलं "ती"चं बाळंतपण ...म्हणजे पहील्यांदाचं आईपण होणं ... ऐकायला, म्हणायला वाटतं छान ...प्रत्यक्ष अनुभवणं महा-कर्मकठीण ... स्वतः मेल्याशिवाय जसा स्वर्ग नाही दिसंत ...तसंच "प्रसूती-वेदना" सोसल्या शिवाय, त्या वेदना, कधीही पूर्णपणे नाही समजत ...बाळ-मुख-पाहून होणारं "अनोखं-सुख" केवळ शब्दातीत  तिचे नऊ महिने पूर्ण झालेले, थोडे पोटात दुखायलाही लागलेले-दवाखान्यात, डॉक्टरीणबाईंनी तपासले ... तिला तिच्या कळा जीवघेण्या वाटत होत्या-तिच्या दोन्ही "आई" उशाशी-पायाशी होत्या ... तिच्या कळा अंतरा-अंतरानं चालूच होत्या-त्यांच्या गप्पा मात्र छान रंगात आल्या होत्या ... माझ्या ह्याच्या वेळी, अमुक - अमुक ...माझ्या तिच्या वेळी, अमुक - तमुक ... "अजून हिला काही म्हणाव्या तशा येतं नाहीत कळा"-या त्यांच्या बोलण्यानं तिचा संयम स...

कविता - 🌷 " सोन्याहून पिवळं " तारिख - १७ में २०१७

कविता - 🌷 " सोन्याहून पिवळं " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले  तारिख - बुधवार, १७ मे २०१७  दरवर्षी मे महिन्याचा रविवार येतो, हुरहुर लावून "मदर्स डे" घेऊन येतो यावर्षीचा रविवार खरंच खास होता ... जशी आई बाळांचे लाड पुरवते अगदि तशाच-धर्तीवर लाड केले, मदर्स-डेला, अमित बाळाने त अजूनी बाळ आईची डिट्टो काँपी करतं नीट-लिस्ट बनवून,त्यावर अंमल करतं सर्वात प्रथम भेट दिली - सिडनी-फिश-मार्केट ... हे ठिकाण जगप्रसिद्ध ... त्यामुळे टूरीस्ट लोकांचा, प्रचंड खच - भरपूर खाऊन, घरी पार्सल न्यायचं  गेल्या टूरमधे, राहीलं होतं तेथे जायचं   आपल्याकडे बघायलाही न मिळणारे "जेम्स बाँड मुव्हीत" पाहिल्याप्रमाणे,  व इंग्लीश कथा-कादंबरीत,वर्णन केलेले, ऊत्तम प्रकारचे,ताजे,   खूप मोठ्या आकाराचे    जसे आपणास हवे तसे- बनवून,गरमा त्यात भुर भुर पावसाने,   अजूनच रंग भरले होते ... त्यानंतर ट्रेन-ट्रँवल करून,मस्त " सर्क्युलर की " च गाठली थेट ... सगळे टूरिस्ट, तेथे जग-भरातले,   गोळा होऊन,फोटोमधे होते रमले ... त्या एकाच ठिकाणी, वर्ल्ड फेमस,   सिडनी ब्रिज,सिडनी-ऑपराहाऊस ...

कविता - 🌷 "निरागस-जीव, इवले-इवले" तारिख - १८ में २०१७

कविता - 🌷 "निरागस-जीव, इवले-इवले" कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले  तारिख - गुरुवार, १८ मे २०१७  वाढदिवसाचा तो पूर्ण दिवसच अमितने, व्यवस्थित आखणी करून, सुंदररितीने ... साग्रसंगीत साजरा केला होता हिरीरीने ... फारसा गवगवा नाही,  उगीचचं स्तोमही नाही ... एक अत्याधुनिक छानसा फोन  त्याने तिला आधीपासून देऊन, तिच्या आवडीचे खास हेडफोन्स  असं बरंचसं काही आणलं होतं ... अलास्का-टूरसाठी जास्त ऊबदार,  खास बनावटीच्या थर्मल्सची भैट, ही तर अफलातून कल्पना त्याचीच ... सरते शेवटी, रेड-वाईनची बॉटल तोहफेपर "तोहफा" चौफेर भडीमार ... अख्खा दिवसच भुर्रकन् उडून गेला ... तिकडे राहूलने "संपूर्ण वॉर्डरोब नवा, एकही ड्रेस चालणार नाही जुन्यातला" ... असं निक्षून सांगितलेलं होतं तिला ... "मदर्स डे"ला, लेकरांच्या प्रेमामुळे  तिला अतिशय भरून आलं होतं  तिचं अंतर-मन नितांत सुखावलं ... आई होण्यातलं खरं सुख गवसलं ... नऊ महिने ओटीपोटी, असलेले, दोन निरागस-जीव, इवले-इवले ... कधी एव्हढे मोठे, जाणते झाले, तिला बिल्कुल  नाही  कधी कळले ... 🌷@तिलोत्तमा विजय लेले  🙏🕉️🔆

कविता - 🌷 ‘ गढूळ ‘ तारिख - १६ सप्टेंबर २०१९

कविता - 🌷 ‘ गढूळ ‘ कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारीख - सोमवार, १६ सप्टेंबर २०१९ जाणीवा बोथट झाल्या तरी, सल काही केल्या जात नाही ... अदृश्य जखमा संपल्यावरही, वेदना काही थांबत नाहीत ... आनंददायी मस्त-मनालाही, चरे पाडणारे सोडंत नाहीत ... वाहणाऱ्या स्वच्छ पाण्यालाही, गढूळ होण्यातून सुटका नाही ... मुकामार दिसत नसला तरी, ठणका पाठ काही सोडत नाही ... नशिबाचे फासे खासे असूनही, सोंगट्यांकडून घात थांबत नाही ... एका छताखाली रहात असूनही, दोन-मनांतील अंतर संपत नाही ... 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता - 🌷 ‘ दुष्टांसाठी आम्ही धुरंधर ! ‘ तारिख - २७ ऑगस्ट २०२१

कविता - 🌷 ‘ दुष्टांसाठी आम्ही धुरंधर ! ‘ कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - शुक्रवार २७ ऑगस्ट २०२१ वेळ - रात्रीचे ९ वाजून ५५ मिनिटे पंख छाटले नियतीने जरी  आक्रसले ना माझे अंबर, कंबर कसूनी झेप फिरुनी, नाही कसलेच अवडंबर ! अगणित घाव पचवूनही,  हसत-मुखे सामोरे होऊ आकाश-पाताळ एक करुनी, शर्थीने लढू आम्ही शिकंदर ! अनंत यातना सहूनही,  ताठ कण्याने जगून दाखवू आले बहु, येतील बहु परि, पुरून उरू आम्ही बिलंदर ! होत्याचे नव्हते झाल्यावरही  राखेमधूनी, विश्व उभारू कधी न डगमगू, कधी न बिथरू, आम्ही सारे मस्त-कलंदर ! तुफानी लाटा लीलया झेलत  विराट रूपाचं दर्शन घेऊ, कालिया-मर्दन सहज करुनी, दुष्टांसाठी आम्ही धुरंधर ! 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता - 🌷 ' स्वप्न-रंजन ' तारिख - २ ऑगस्ट २०१७

तारिख - बुधवार, २ ऑगस्ट २०१७  कविता - 🌷 " स्वप्न-रंजन " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले  एकदा स्वर्ग-लोकात झाली बरं एक गंमत नवीन ठराव पास झाला, चक्कं सर्व-संमत ! या नंतर इहलोक सोडून जे जे येणार स्वर्गी,  त्यांना येण्यासाठी आधीच द्यावी लागेल वर्दी ... त्यानुसार लेखी वैयक्तिक अर्ज करावा लागेल, प्रवेश-कराचा आगाऊ भरणाही करावा लागेल ... स्वर्गात आता ज्याला-त्याला यायला, मज्जाव  देवही संभ्रमात नक्की कुणा म्हणावं,"चलेजाव"...  सुशांत-सुंदरशा स्वर्गात, अनपेक्षित चल-बिचल  भक्तांवरही पाळी आली, सर्वत्र उडाली खळबळ  सारे प्रथम पूजनीय गणेशाकडे गार्हाणं घेऊन गेले मंगलमूर्ती मोरयानी प्रथम सगळ्यांचे म्हणणे ऐकले  यावर जो उपाय निघेल, तो सर्वांनाच लागू असेल दोन्ही लोकातील प्रमुख-प्रवक्त्यांनी म्हटले "चालेल" ... जोवर स्वर्ग-लोकी पाबंदी तोवर इहलोकातही बंदी सगळंच बंद, मंदिरे-देव-देवतांची-पूजा-अर्चा-आरती बाप्पा मोरयाची ही शक्कल अचूक काम करुन गेली  हातोहात चक्रं फिरली, स्वर्ग-प्रवेशाची पाबंदी उठली ! सुटकेचा निःश्वास टाकून, बाप्पांचा जयजयकार केला या मजेशीर स्वप्नातून ...

कविता 🌷 ' अविस्मरणीय अनुभव ' तारिख - २० जुलै २०१७

कविता - 🌷 "अविस्मरणीय अनुभव "...   कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले  तारिख - गुरुवार, २० जूलै २०१७  भल्या पहाटे उठून शुचिर्भूत होऊन, थेट देनाली नँशनल पार्कला, दिली होती भेट सेन्टरला जाऊन देनालीची बस पकडली अगदी वेळेवर वक्तशीरपणे बसही सुटली,   ते निसर्ग सौंदर्य इतकं होतं नजर-फोड,  काय अन् किती पाहावं असं झालं होतं  सगळं दृश्यच होतं अविस्मरणीय-अजोड  इतक्यात झाडीतून चक्कं अस्वलांची जोडी, बाहेर पडून भर रस्त्यातून चाललेली दिसली ... अंदाजे पाचशें किलो-देहाला आवरत-सावरत  खाली मुंडी घालून चालले होते त्यांच्याच मस्तीत  लगोलग बसच्या काचा फटा-फट झाल्या बंद आवाज न करता चिडीचूप, सर्वच एकदम शांत  ते दोघेही रस्ता संपूर्ण ओलांडून जाईपर्यंत सगळ्यांचे कँमेरे, कँमकॉडर झाले कार्यरत  क्लिक-क्लिक-क्लिक शटर्सची उघड-झाप  शेवटी सुशागात रमत-गमत त्या जोडीची स्वारी मंद लयीत आरामात, पोहोचली एकदाची पैलतीरी  नंतर नीलगाय आदी जंगली प्राण्यांना बघत-बघत वनराईत हिरवी भरगच्च घनदाट झाडी-झुडुपं पहात डोळ्यांनीच घेता येईल तितका सृष्टीचा आस्वाद घेत, बॅक-पॅ...

कविता - 🌷 " असाही एक वाढ-दिवस " तारिख - १२ मे २०१७

कविता - 🌷 " असाही एक वाढ-दिवस " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले  तारिख - शुक्रवार, १२ मे २०१७ कितीही ठरवलं तरी सर्वच्या सर्व गोष्टी, ठरलेल्या त्या-त्यावेळी होतीलच असं नाही ... त्या जिद्दीनं तशा घडवून आणणं, वेगळं, अन् सगळं आपोआप घडून येणं, निराळं ... दोन्ही मध्ये अंतर आहे जमिन-अस्मानाचं ... आपोआप सारं-काही जुळून घडण्यावरच, तिचा नेहमीच, अधिकाधिक असायचा भर ... झुकतं माप कायम अध्यात्मिक "अधिष्ठानावर" ... तिच्या जरुरी-कामांची यादी तर लांबच लांब ... ती लवकर संपायचं‌ काही नव्हतं नामोनिशाण ... उलटपक्षी हनुमानाच्या शेपटी-सारखी यादी, दरेक दिवशी, खूप लांब वाढंतच जात होती ... शेवटी चार डिसेंबरचा उगवला खास-दिवसही, अन् मैत्रिणींच्या घोळक्यात, मजेत गेला जरी ... तिचा हा पहिलावहिला असा होता वाढ-दिवस, जो तिच्या प्राणप्रिय पिल्लांपासून, खूपखूप दूर ... साजरा केला गेला होता, एकटिनं ओढून-ताणून ... चेष्टा-मस्करीत, चेहर्यावर हसरा-मुखवटा चढवून ... वाढदिवशी देहानं जरी, बिल्कुल मुंबापुरीतच होती, केंव्हाच भुर्रकन उडून ती, मनानं रमली होती परदेशी ... 🌷@तिलोत्तमा विजय लेले  🙏🕉️🔆

कविता 🌷 ' निसर्गाची जादू '. तारिख - २३ में २०१७

कविता - 🌷 " निसर्गाची जादू " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले  तारिख - मंगळवार, २३ मे २०१७  कधी कधी अस्मादिकाना, उगीचच मोरपिसा-सारखं, खूप हलकंं वाटतं ... विचारांच्या उंच-भव्य हिंदोळ्या-वर, मनसोक्त झोके घेत घेत रमावंं वाटतं ... तसं काहीच कारण नसताना, वाटतं, उत्स्फूर्तपणे उठून नाचावं-गात बसावं ... समुद्र-किनारी मखमली  शुभ्र  रेतीत, अंगावर कोवळी उन्हं पांघरुन सुस्तीत ... मस्त अंग शेकत-लोळत-पडावं वाटतं ... सतत उसळणार्या-त्या फेसाळ-लाटांकडे, भान हरपून, बस्स पहात राहावं एकटक ... सागराच्या अति-विशाल-अथांग देहावर, अलगद पसरणार्या सोनेरी रवि-किरणांचं, अगदी मनापासून, कौतुक करावं वाटतं ... नदिच्या नागमोडी, मोहक वळणांवरून, जीव ओवाळून वाटतं, पहावं तसं जगून ... हिमालयाच्या शुभ्रं अत्युच्च-शिखरी जाऊन, घोर-तप-साधना करावी-आसनमांडी घालून ... न चुकता-दररोज नित्य-नियमानं उगवणार्या पूर्ण विश्व पाप-क्षालन करुन, शुद्ध करणार्या ... त्या तेजोमय  सूर्या ला न्याहाळावं मावळताना ... सागर-जलात उभं राहून यथार्थ अर्घ्य देताना ... मावळत्या किरणांनी निर्मित  दिव्य "कँनव्हास" ... लालिमेच्या अ...

कविता - 🌷 " भक्त आणि भगवन्त " तारिख - ६ डिसेंबर २०१६

कविता - 🌷 " भक्त आणि  भगवन्त  " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - ६ डिसेंबर २०१६ भक्त जेव्हा संकटी ... धावून येई जगजेठी ... तुकोबा लिखीत अभंग ... त्यानं ठेविले "अ-भंग "! स्वतः जळात लपून ... अभंग ठेविले जपून ... न दिले त्यांना भिजून ...  सांभाळ केला कसून ! संत-जनांसाठी, झडकरी ... जळी-स्थळी- वास करी अपार कष्ट करी मुरारी ... माय-बाप, कुंज-बिहारी ... घारीसारखे संपूर्ण लक्ष, भक्तांवर ठेवून ... सर्व संकटे वरच्यावरच  अलगद   झेलून ... भक्तांना सदैव सांभाळले ... त्यात जात-पात न पाहिले ... लहान-थोर भेदाभेद न केले ... रोहिदास भक्तासाठीच रंगविले चर्म ... मदत करण्या भक्तां, केले हरेक कर्म ... थोर ते भक्त, अन् महा-थोर भगवन्त ... सहज ओळखू येती, साधू आणि संत ... 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता 🌷 ' संत-महंतांची पारख ' तारिख - ६ डिसेंबर २०१६

कविता - 🌷 " संत-महंतांची पारख " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - ६ डिसेंबर २०१६ रसाळ ओघवती असे वाणी ... भक्ति- रसाने परीपूर्ण गाणी ... ओळखावा संत, तोची जनीं ... त्याच्या, भाळी टिळा नसूनही ...! सच्चा अनुभवी सज्जन ... भावनापूर्ण त्याचं कथन ... करीतसे सर्वां, मार्गदर्शन ... ओळखू येई तो, गुरू-जन ... त्यां, पायी खडावा नसूनही ...! पर-स्त्रीचा करूनी पूर्ण सन्मान ... तिज देई आई- बहिणीचा मान ... न पाही डोळा, वर करून मान ... ओळखावा, शिवछत्रपती महान ... कमरेस भवानी-तलवार नसूनही ...! अंतर्यामी संतुष्ट, सरळमार्गी, एकनिष्ठ ... पर-धन पाहुनी, जरा न होतसे आकृष्ट ... डोळे मिटून घेतसे, तंद्री लागे ध्यानस्थ ... पै-पैका, सोनं-नाणं ज्यास वाटे नि:कृष्ट ... साधू तोची ओळखावा, माथी जटा नसूनही ! निंदा-नालस्तीचा उलटाच होई प्रभाव ... आनंदे नाचे, जणू स्तुतीचा झाला वर्षाव ... अशी वल्ली ओळखावी, संत-पदा भूषवीं ... जरी नसे टाळ हाती, गळा माळ नसूनही ...! 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता : 🌷 ' चौफेर दिसे प्रतिबिंब शिवाचे ' तारिख : १८ फेब्रुवारी २०२३

कविता : 🌷 ' चौफेर दिसे प्रतिबिंब शिवाचे ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : १८ फेब्रुवारी २०२३ वेळ :. १० वाजून १० मि. शिव-शक्तीस समर्पित दिन हा अति-पवित्र शिव-पार्वती विवाह म्हणून 'महा-शिवरात्र' ! पुष्प, चन्दन, भस्म, जलाभिषेक व बिल्वपत्र झळकतो वैश्विक उर्जेचा, प्रचंड स्रोत सर्वत्र ! अथक प्रयत्नान्ती भगीरथ घेऊन आला, थेट स्वर्गातून पृथ्वीवर आणले गंगेला ! शंकराने त्वरित जटेत धारण केले तिला,  म्हणून 'गंगाधर' नावानं ओळखला गेला  अमृत-मंथनात चौदावं रत्न जहरी विष निघालं  भोळ्या शंकरानं ते 'हलाहल’ प्राशन करुन टाकलं  सृष्टीवरील भयाण संकटाचं तत्काल निवारण केलं  तेव्हापासूनच 'नीलकंठ' हे नावही त्याला मिळालं  शिव-तांडव नृत्य जगात आहे सुप्रसिध्द निसर्गही हवं ते देतो भरभरून मुक्तहस्त  कधी कोपला तर मात्र होऊन तो क्रुद्ध, थैमान घालून तांडव-नर्तन करतो संत्रस्त  शिव-शंकर-भोलेनाथ, निसर्गाचं जणू प्रतिकात्मक रूप खास ! सुनामी, ज्वालामुखी, चक्रीवादळं, भूकंप यांनी सृष्टीचा विनाश त्रिलोचन-शिव तिसरा डोळा उघडून तांडव करतो विनासायास एक निसर्गाचं 'रौद्र रूप', दुस...

कविता : 🌷 ' उसनी हिम्मत ' तारिख : १७ फेब्रुवारी २०२३

कविता : 🌷 ' उसनी हिम्मत ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले  तारिख : शुक्रवार, १७ फेब्रुवारी २०२३ वेळ :. रात्री, ११ वाजून १८ मि. सगळं काही ठीकठाक असताना दुधात मीठ पडावं तसं काहीसं व्हावं, अधिकाधिक सुखाच्या हव्यासामुळं, हातचं सारं, उगाच निसटू लागावं ! दुरुन डोंगर साजिरे किती भासतात, जवळून मात्र ओबडधोबड दिसतात ... " ज्याच्या वंशा जावे तेव्हा ते कळे !" एरवी सदैव 'पर दुःख शितल' वाटते ! आला दिवस-गेला दिवस, गणती नाही काय करावं, कसं वागावं, थांगच नाही ... बिघडत चाललेलं दिसूनही वळत नाही, धरलं तर चावतं अन् सोडलं तर भुंकतं ! दुखरी नस कोणती ते शोधून न काढून उपाययोजना करण्यात दिरंगाई करुन, आजचं मरण उद्यावर ढकलून देऊन, नक्की असं काय साध्य होऊ शकतं ? गाढ झोपलेल्याला सुध्दा उठवता येतं पण डोळ्यांवर खोटी-नाटी झापडं बांधून झोपेचं सोंग वठवणा-या दिशाहीनाला, वठणीवर आणायला सोळावं रत्नच हवं ! बिकट वाट वहिवाट नसावी हे समजूनही हातावर हात ठेवून बसणं, स्वभावात नाही कंबर कसून पदर बांधून पाऊल पुढे टाकून, हीय्या करुन लढायला, उसनी हिम्मत हवी ! 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता : 🌷 ' शब्दांजली ' तारिख - ७ फेब्रुवारी २०२३

कविता : 🌷 ' शब्दांजली ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : ७ फेब्रुवारी २०२३ वेळ : ८ वाजून २० मि. श्रुतीन्-श्रुती का बरं आज रुसली ? साक्षात् सरस्वती कुठं असेल लपली ? सर्व रसिक मंडळीं झाली रडवेली ... गान-कोकीळा हे जग सोडून गेली ! अवघं विश्वच जणू काही पोरकं झालंय्  सुरांविना शब्दही फिके, एकाकी झालेत ! सुरात्मा गेला आता उरली फक्त पोकळी,  हिंदवी गान-कोकीळा हे जग सोडून गेली  घरादाराचा भार, 'गात-गात' पेलणारी साधं-सरळ-हसरं व्यक्तीमत्व असलेली असामान्य कर्तृत्वाने दीपवून टाकणारी  लाडकी कोकीळ-कंठी अंतर्धान पावली ! सुरेल आवाजाने काळीज छेदणारी संपूर्ण जगाची, 'लता-दीदी' असलेली, देवादिकांना रिझविण्या सम्राज्ञी गेली, आपली गान-कोकीळा अजरामर झाली ! आपली गान-कोकीळा अजरामर झाली ! 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता : 🌷 ' स्वराई ' तारिख : ८ फेब्रुवारी २०२३

कविता : 🌷 ' स्वराई ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : ८ फेब्रुवारी २०२३ वेळ : रात्रीचे १२ वाजून ४३ मि. स्वरांवर तरंगत-तरंगतच आपण वाढलो सुस्वर कानावर अलगद पडत होते अन्  संगीताचे आपसूक संस्कार ही होत होते ! त्यामुळे सुरांची जाण आपोआपच आली गानशूर-कम-कानशूर तरी नक्की झालो... याचं बरचसं श्रेय द्यायला हवं 'स्वराई' ला ! एक जन्म-दाती माऊली-जी आपली आई, ही स्वर-ज्ञान देणारी माऊली-म्हणून 'स्वराई' कसे बरं होणार आपण या दोघींचे 'उतराई' ? सुरेल स्वरांनी, श्रोत्यांना प्रशिक्षित करून, कैक पिढ्या गेल्या 'स्वराईच्या हाताखालून' गर्व वाटतो आपणही त्यापैकीच एक म्हणून ! तारुण्यात याच स्वरांनी अदृष्य साथ दिली... प्रेमाची माधुरी वाढली, उमटली गाली लाली तरुणाईचा आविष्कार-स्वरांची बहार आली... जसं हवा-पाणी-अन्न-निवारा व प्रकाश हवा, निकोप प्रकृतीसाठी, हवा स्वरांचा शिडकावा... तेव्हा मनात झोके घेऊ लागतो पक्षांचा थवा ! @तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता - 🌷 " थरारक नाट्य " तारिख - शुक्रवार, २१ जूलै २०१७

कविता  - 🌷 " थरारक नाट्य "     कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले  तारिख - शुक्रवार, २१ जूलै २०१७  कालच्या मधाळ अनुभवानंतर, पाय आपोआप वळले, थेट देनाली नँशनल पार्क कडे रस्ते होते नाग-मोडी, वेडे-वाकडे-जणू देनाली स्वतः खेचत होता त्याच्याकडे ... आदल्या दिवशीच्या, "टफ-ट्रेलवर"- बेहद्द खुश होते अमित-राहूल दोघेही आजच्या सुंदर सोनेरी सकाळी -तिघंही निघाले फिरत वाट निराळी ... काल घाटातून, गाठलं होतं सर्वोच्च टोक-आजचा मनसुबा गाठायचं तळाचं टोक... ट्रेल बघायला साधी-सोप्पी-भुरळ घालणारी वाटत होती, मस्त मजेत चालली होती मंडळी ... एकीकडचा रस्ताच होता बंद केलेला-एक सूचनावजा बोर्ड, होता लिहीलेला  "अस्वलांचं वास्तव्य असण्याचा धोका"-जणूकाही, अस्वलांसाठी लिहीला होता !  का कोण जाणे, थोडंसं अंतर कापल्यावर-अचानक तिला आंतरिक संकेत जाणवला, पाऊल पुढे टाकण्यास मन राजी होईना-दोन्ही मुलांना सांगून, त्यांना काही ते पटेना ... शेवटी अस्वलांची शक्यता बोलून दाखवली-तरीही त्यांनी काढता पाय घेतला नाही... केवळ त्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून पुढे निघालो, खूप खाली उतरून गेलो आम्ही... पोट-तिडकी...

कविता 🌷 ' भाव-विश्व ' तारिख - १२ जून २०१७

कविता - 🌷 "  भाव-विश्व  " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले  तारिख - सोमवार, १२ जून २०१७  ऊनं-पावसाचा हा खेळ चाले गं आयुष्यात,  किती किती आठवांवं मनं हिंदोळे झोक्यात ... मना अनिवार ओढ, सुखावल्या त्या क्षणांची  कशी विसरुन जाऊ खुण-न्-खुण सौभाग्याची  सुदैवानं हाती लागलं काल-यंत्र एखाद्याच्या, भुर्रकन् उडून पुन्हा रमेल विश्वात बालपणीच्या   भाबंड्या गं त्या आठवणी, भाबडं ते लहानपणं   भाबडं ते विश्वंच सारं, नको नको गं ते मोठ्ठं होणं   मोठेपणी का गं होई, जग सगळं धूसंर धूसंर ... मोठेपणीचा बडेजाव, खोटा फुकाचाच गं धूर  वय वाढता-वाढता विश्वाची कक्षाही विस्तारते ... पण भाव-विश्व संकोचून  मनाची वाढ का खुंटते ? बोथटं होती संवेदना, जाती थिजून भाव-भावना ... अशा गायब का गं होती, तरल-सुकुमार कल्पना फुलं अन् फुल-पाखरं, सारं काही सुंदर-कोमलं  हळुवार हळवं मनं, आठवेना केंव्हा कसं लोपलं ... संपताच बाल-विश्वं, सुरु होई स्वप्निल तारूण्य   स्वप्नवत् भासे अवघी दुनिया, पूर्वजन्मीचं पुण्य  🌷@तिलोत्तमा विजय लेले  🙏🕉️?...

कविता - 🌷 " अखंड-ओघ " तारिख - शनिवार, १३ मे २०१७

कविता - 🌷 " अखंड-ओघ "  कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले  तारिख - शनिवार, १३ मे २०१७  हां हां म्हणता दिवस-महिने भरधाव जात होते ... पण तिची साचलेली कामं संपण्याचे नाव नव्हते ... अष्टभुजा देवी-समान सदा-चौफेर दाही दिशांना, बारकाईने लक्ष देऊन, कामांचा उरक पाडताना ... प्रत्येक-न्-प्रत्येक दिवसाचे अगदी चोवीस तासही  कामांना हाता-वेगळे करताना, तिला पडायचे कमी ... आला दिवस, कधी तो उगवला ... अन् कधी आणि कसा तो मावळला ... याचा अक्षरशः थांगपत्ता नसायचा ... कामाच्या प्रत्येक टप्प्यावर आव्हानं असूनही, तितक्याच ताकदीने-आनंदाने सामोरे जायची ... तिची एक गोष्ट मात्र अतिशय विलक्षण होती, प्रत्येक क्षण-न्-क्षण करीत असे तिला आनंदी ... अडचणीच्या अत्यंत कर्म-कठीण-प्रसंगी सुद्धा, मदतीचा अखंड-ओघ, तिला मिळत राहायचा ... दृश्य-अदृश्य रूपात अचानक मिळे मदतीचा हात ... सहजगत्या संकटांतून तारून, देई मोलाची साथ ... सुरक्षित किनारी, सुखरूपरित्या- अलगद  आणून, विजयाचं पुरेपूर माप टाकायचा, तिच्याच पदरात ... 🌷@तिलोत्तमा विजय लेले  🙏🕉️🔆

कविता -🌷 " संडे की-मिठास " तारिख - १९ डिसेंबर २०१६

कविता -🌷 " संडे की-मिठास "     तारिख - १९ डिसेंबर २०१६ कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले सुबह-सुबह ईमेल देखा आया,   सिंगापूर, हाँगकाँग और पटाया ... लकी-ड्रॉमें, मेरा नंबर लग गया-इस टूरका फ्री-टिकट मिल गया ... आजकल नसीब कुछ जोरों में- ख़ुशीके मारे कुछ सूझ नहीं रहा ... अब सामने खडी बडी समस्या- टूर का फ्री टिकट है दो जनोंका ... अब सोचना पडेगा किसे ले जाऊं मेरे साथ- ये कैसी नौबत आयी ... सोचमें पड गयी किसे ले जाऊं मेरे साथ, साथ चलनेको नहीं कोई ... दो-टिकट लक्झरी-टूर की-बिल्कुल मुफ्त़- ऍडव्हान्स बुकिंग की हुई ... अब जोरों-शोरों से तलाश करनी होगी जारी, मेरे टूर के साथी की ... पिछले कुछ साल गुजर गये थे यूॅं- पता भी न चला, कैसें और क्यूँ  प्रॉपर्टीके मसलोंमें यूं उलझी- जो अपना हैं, उसकी रक्षा  करनी जरुरी थी ऐसे में, इतने व्यस्त जीवन में-किसी संगी-साथी के लिये जगह ही कहां थी? दुनिया का उसूल है-अगर आप एक बिझी,   तो  समझो  दुनिया दस-गुना बिझी  अब जाके कुछ लग रहा है,   कि सारें दोस्त-सहेेलियां ... सब जन पिछे छुट गयें और समय यूँ बढता चला गया ... आगे...

कविता - 🌷 " अस्सल-नायक शापित कर्ण " तारिख - ९ डिसेंबर २०१६

कविता - 🌷 " अस्सल-नायक शापित कर्ण "    तारिख - ९ डिसेंबर २०१६ कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले उदारतेचं मूर्तिमंत उदाहरण ... म्हणजेच " सूत- पुत्र " कर्ण  महाभारतात त्याच्या इतका   पराक्रमी, शूर, लढवैय्या योद्धा शोधूनही सापडणं कठीण ... दुर्दैवाचा फेरा, त्याच्या जन्माच्या - आधी-पासूनच सुरु झाला बहुधा ... कुमारी- माता कुंती व सूर्य यांचाच- हा तेजस्वी,मनस्वी व अद्वितीय पुत्र ... समाजाला घाबरून, तत्कालीन रुढींना - डावलून, काही करणं अशक्य असताना, कुंतीने मनावर दगड ठेवून  त्याग केला, लाकडी पेटीत  जन्मजात तान्ह्या  अर्भकाचा वाहत्या जलाशयात सोडलं त्यास गुपचूप- हे "काळंकुट्ट-कृत्य"केलं,रात्रीच्या अंधारात  कालांतरानं एका निपुत्रिक जोडप्याला,   हा दैवानं पाठवलेला खजिना सापडला ... त्यांचा आनंद गगनात मावेना - राजमहालाऐवजी एका साध्या सारथ्याच्या छोट्याशा घरातच,   दुर्दैवानं कर्णाचं बालपण गेलं ... त्याला आईचं वात्सल्य  राधेकडून मिळालं- म्हणून पुढे त्याचं   नाव "राधेय-कर्ण" पडलं ... जन्मत: एकही गोष्ट त्यास सहज ना मिळाली- अगदी माता-पित्याची छत्रछ...

कविता - 🌷 " आनंदाचा कंद " तारिख - १५ डिसेंबर २०१६

कविता - 🌷 " आनंदाचा कंद " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - १५ डिसेंबर २०१६ क्षण आपणा मिळती ... क्षण आपणा दिसती ... क्षण क्षण मिसळुनी ... आयुष्या ते उजळती ... श्वास रोधून मनं झालं गं स्थिरं ... श्वास सोडून मनं होतसे पसारं ... श्वास-न्-श्वास मिळवूनं, आयुष्याचं सुटतं गणितं ... चित्त आनंदी, चित्त स्वच्छंदी ... बागडे सर्वत्र, लेवुनिया धुंदी ... चित्त डोलते गं, चित्त नाचते ... इंद्रधनूच्या रंगामध्ये ते खेळते ... बुद्धी तेज-कुशाग्र, बुद्धी-तल्लखं ... ब्रह्मानंदी तल्लीन, परि ती चलाखं ... ध्यास लागला, ध्यास धरिला ... ईश्वराच्या चरणी, मोगरा वाहीला ... स्वप्नं रंगीत, स्वप्नं संगीतं ... स्वप्नं- स्वप्नातं येऊन, डोळ्यां अति सुखावंतं ... सूर सुरेल-मधुर, सूर-संगत-अमूर्त ... सूरांमध्ये सूर मिसळून, संगीत करी  सार्थकं  ... जीव एकला, जीव आपला ... जीवात जीव मिसळून, तो आनंदाचा कंद झाला ... 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता 🌷 ' गरुडाची झुंज ' तारिख - ११ डिसेंबर २०१६

कविता - 🌷 " गरुडाची झुंज "  कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - ११ डिसेंबर २०१६ गरुड, श्रीविष्णूंचं लाडकं वाहन ... मोठं डोकं, पक्षी असून बुद्धिमान  दूरची दृष्टी-तीक्ष्ण नजरेचं वरदान ... आकाराने, वजनाने मोठा-गरुड हाच पक्षांचा राजा संपूर्ण आकाशात त्याच्या करारनाम्यांचा गाजावाजा  अंगात शक्ति, ताकदीचा जोर ,  वरचढ म्हणून, होतो शिरजोर सर्वत्र त्याचा भयंकर दरारा लहान-थोर-पक्ष्या-प्राण्यांवर साप, कासव, माकडं पकडून,   भर्रकन घेतो भरारी उंचा-वर ... त्याच्या अंगात दांडगी-शक्ति -  मोठया पंखामध्ये प्रचंड गती ... उंचीचं त्यास खास आकर्षण- अन्य पक्षांहून मोठी आकारमिती  मोठे टपोरे डोळे, अत्यंत तीक्ष्ण नजर,   उंचावरूनच हेरतो " गाफील " सावज, संपवतो त्याचं आव्हान, अचानक  घालून जीवघेणी  झडप  ... घिरट्या मारतो पंज्यांत भक्ष्याला उचलून, अणकुचीदार चोचीनं, मग समाचार घेऊन ... फडशाच पाडतो त्याचा, खूप उंचावर नेऊन ... उंचच उंच डोंगरी ... कड्या अन् कपारी, शोधून, बांधतो घरटी - उंच उंच झाडांवरी भन्नाट वाऱ्यावर होऊन स्वार,   सुसाट वेगात उडे नभी  बघता-...

कविता - 🌷 " कुछ दृश्य-कुछ अदृश्य दीवारें " तारिख - १ डिसेंबर २०१६

कविता - 🌷 " कुछ दृश्य-कुछ अदृश्य दीवारें " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - १ डिसेंबर २०१६ बहुत सुंदर, प्यारी तस्वीरें देखी सीनरी की ... गौरसे देखा,पता चला-थी चायना-वॉल की ... दुनियाका एक अजूबा- चायना-वॉलका नजारा ! बहुत पुराने जमानेमें   सब   लोग   शत्रूओंकें हमलोंसे ... बचने के एकमात्र हेतुसेही  उंची तटबंदीयां बनाते थे ... आजके नये इस दौरमें ... मनुष्य स्वयं के इर्दगिर्द ... पूरी तरहसे, बूरी तरहसे ...कईं दीवारें खडी करके, भिन्न-विभिन्न दीवारोंसे, स्वयंके अहंको बढावा देता है ... इसी भीतरी हेतूसे, तन-मन को पूरी तरहसे ढंक लेता है ... और मन-ही-मनमें सुलगते- अंगारोंको हवा देता रहता है ! दो देशोंके बिचकी दीवार,  कहलाती है सरहद-देशकी सीमा,  दो इन्सानोंके बीच  द्वेष-गुस्सेकी दिवार, हीनता-कटुता-शत्रूता ! जात- पातकी दीवारें ... उंच - नीचकी दीवारें ... अमिरी-गरिबीकी दीवारें ... भेद-भाव-की दीवारें ... ऐसी कईं अनगीनत-अनदेखी-अकल्पनीय दिवारें ... बिना वजह ही, रातों-रात में यूँ ही खडी हो जाती हैं ... मानो जहरीली-मशरूम की भान्ती पूरे खेतमें फैल जाती हैं ! ...

कविता - 🌷 ' दर्शन '

कविता - 🌷 ' दर्शन ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - बुधवार, ८ नोव्हेंबर २०२३ समय - १० बजकर १० मि. कल सपने में पधारे बाल गजानन ओंकार रूप में पाया उनका दर्शन बरसातमें छाता लिये निकले वो घूमने खडे-खडे लगे, पैरों से पानी उछालने पीठ पे बस्ता, चले पाठशालामें पढ़ने अपनी धुनमें मगन मस्त हो कर झूमने नन्हीसी सूंड और चेहरेपे प्यारी मुस्कान हाथमें पकडे मोदक, बडे-लंबे हैं कान रूप है निख़रा-निख़रा, तेज सूर्य-समान खुशीकी लहर जो सीधी पहुँची आस्मान बाल गणेश करते हैं नर्तन-गायन-वादन झूमने लगते सब राजा-प्रजा-मूषक-वाहन वेद-शास्त्रों का है उन्हें पूरा-पूरा ज्ञान, बुद्धि से ही करते हैं वो हर-एक काम महादेव और गौरीके वो हैं लाडले नन्दन, बडे उनके ठाठ हैं, त्रिलोक करते सम्मान 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता 🌷 ' झाली कृष्णमया ' तारिख - ८ डिसेंबर २०१६

कविता - 🌷 " झाली कृष्णमया " कवयित्री -तिलोत्तमा विजय लेले तारिख - ८ डिसेंबर २०१६ रात्रं- दिवस ध्यास लागता मना ... बिंब स्वयं, प्रतिबिंब आज दिसेना ... दोन्ही रूपं होऊन एकच,कळेना ... विराट स्वरूपा पाहून, बोध होईना, चिंब झाला हिंदोळा ... राधा-धारा, धारा- राधा, राधा- राधा सर्व विश्वं गुंग झालं, राधा-कृष्ण नामा पुष्प-झुला उंच-गेला,स्पर्शून जाई नभा ... आल्हाद दिव्य प्रकाश,कृष्णाची आभा पाहता सुंदर,मोहक असं ते मोर-पिस ... भुरळ घालूनी मनास करी वेडं- पीसं ... त्याच्या निळ्या- निळ्या रंगात मनं झालं निळं ... सावळा तो घननिळा आठवे ते कृष्ण- कमळ ... मग मन होऊनी राधा, पुकारे कान्हा, कन्हैया ... साद कानी पडे बासुरीच्या मधुर स्वरां -स्वरा ... गोप-गोपिकां परतून येता म्हणती राधा- राधा ... राधा विसरून अवघ्या विश्वा,झाली कृष्णमया ... मनात चाले हरीचे चिंतन, ओठी नाम देवकी- नंदन ... रुण-झुण करती, पायी पैंजण ... हरी- हरी करती, हाती कंकण ... नयनी लपला तो घनश्याम ... चैन पडेना, सुचेनाच काम ... यमुनेच्या - तीरावर, राधा जाता बावरी होऊन गोविंदास, शोधता ... यमुनेच्या जळी,प्रतिबिंब दिसता ... स्व-बिंबातच घन-...

कविता 🌷 ' परमानंदात खरं जगणं ' तारिख - ४ डिसेंबर २०१६

कविता -🌷 " परमानंदात खरं-जगणं " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख -४ डिसेंबर २०१६ नेमेची येतो मग पावसाळा ... तसा, नेमेची येतो वाढ-दिवस ... दर-वर्षी साजरा होतो वाढ-दिवस- अगदी जन्मल्यापासूनच ! पहिल्या महिन्या पासूनचीच प्रथा ... घरापुरता साजरा दर महिन्याला  यात आई-बाबा, आजी-आजोबा,   यांचाच उत्साह असतो महादांडगा ...  पहिल्या वर्षाला मात्र तो होतो दणक्यात ... इथून पुढे बाळाला समजते त्यातली गंमत ... दरवर्षी उत्सवमूर्तीचं, वाट बघणं सुरु होतं ... हळूहळू त्याला, शिंगंही फुटायला लागतात ... वयानुसार मागण्या सुद्धा वाढायला लागतात ... अन् दरवर्षी त्या चढत्या-क्रमातच असतात ...! तरीही वाढ-दिवस नक्की साजरा होतो ... कधी-खूप उत्साहात-धूमधडाक्यात ... तर कधी कधी काहीसा थोडक्यात ... तरीही वेळ कसा जातो नाही समजत, धमाल दंगा-मस्ती, हसण्या-खिदळण्यात ... भुर्रकन उडतो आनंदात-गप्पा-टप्पात ... वास्तविक पाहता, वाढतच असतो आपण ... जन्मल्यापासून प्रत्येक क्षणा-क्षणाला ... जर एक वर्ष पूर्ण करणं हा "मैलाचा-दगड" मानला, तर वाढ-दिवस साजरा होणं योग्यंच,  दर-वर्षाला ! तसं पाहिलं तर,   आपण नुसतं वय...

कविता 🌷' अंतरंग -बहिरंग '

कविता - 🌷 " अंतरंग - बहीरंग " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - २ डिसेंम्बर २०१६ अख्खं जगच भूलतं बाह्य-स्वरूपावर ... पण बहीरंग असू शकतं फसवं अनावर ... मीठ अन् साखर ... दोन्ही रंगांनं पांढरं  एकाची चव मधुर ... एक मात्र वाटे खारं  दूधही असतं पांढरं ... पण त्याचं तंत्रच न्यारं  चवीला लागे खासे-खास ... तब्बेतीसाठी असे झकास ... दिसायला पण असे, सुंदर ... पोषण-तत्वं,असती भरपूर ... ऊस जरी बाह्यरूपी वाकडा- त्याचा रस मात्र,मधाळ-गोडा  धनुष्याचा आकार जरी वाकडा,  त्यातून सुटलेला बाण नसे वाकडा ... अचूक नेमानुसार वेध तो घेई, न जाई वाकडा-तिकडा ... नदी वाहते सागराच्या दिशेनं- वाट सापडेल तशी घेत, नागमोडी वळणं  तिचं अंतरंग म्हणजे जलं-अथवा जीवन ... गोड असतं अमृता-समानं कोकणचा खास मेवा-फणस- बाहेरून असतो काटेरी ... पण अंतरी, गऱ्यांची माधुरी- चकितच करी सर्वतोपरी ... त्याच्या,अंतरंगाची ही थोरी ... अननसाला बाहेरुन, काटेच काटे- मधुर रसाचे, अंतरंगात झरे फुटे  एक असे गोड-लिंबू ... अन दूजे कडू- लिंबू ... गोड-लिंबू पेक्षा,अधिक... कडू- लिंबू खूप उपयुक्त ... त्यात,आहेतऔषधी कैक ...