कविता 🌷 ' झाली कृष्णमया ' तारिख - ८ डिसेंबर २०१६
कविता - 🌷 " झाली कृष्णमया "
कवयित्री -तिलोत्तमा विजय लेले
तारिख - ८ डिसेंबर २०१६
रात्रं- दिवस ध्यास लागता मना ...
बिंब स्वयं, प्रतिबिंब आज दिसेना ...
दोन्ही रूपं होऊन एकच,कळेना ...
विराट स्वरूपा पाहून, बोध होईना,
चिंब झाला हिंदोळा ...
राधा-धारा, धारा- राधा, राधा- राधा
सर्व विश्वं गुंग झालं, राधा-कृष्ण नामा
पुष्प-झुला उंच-गेला,स्पर्शून जाई नभा ...
आल्हाद दिव्य प्रकाश,कृष्णाची आभा
पाहता सुंदर,मोहक असं ते मोर-पिस ...
भुरळ घालूनी मनास करी वेडं- पीसं ...
त्याच्या निळ्या- निळ्या रंगात मनं झालं निळं ...
सावळा तो घननिळा आठवे ते कृष्ण- कमळ ...
मग मन होऊनी राधा, पुकारे कान्हा, कन्हैया ...
साद कानी पडे बासुरीच्या मधुर स्वरां -स्वरा ...
गोप-गोपिकां परतून येता म्हणती राधा- राधा ...
राधा विसरून अवघ्या विश्वा,झाली कृष्णमया ...
मनात चाले हरीचे चिंतन,
ओठी नाम देवकी- नंदन ...
रुण-झुण करती, पायी पैंजण ...
हरी- हरी करती, हाती कंकण ...
नयनी लपला तो घनश्याम ...
चैन पडेना, सुचेनाच काम ...
यमुनेच्या - तीरावर, राधा जाता
बावरी होऊन गोविंदास, शोधता ...
यमुनेच्या जळी,प्रतिबिंब दिसता ...
स्व-बिंबातच घन-श्याम, असता ...
हा भास की सत्य,याचा प्रत्यय येता ...
राधा- कृष्ण, एक- बिंब,एक-आत्मा ...
हे त्रिकालाबाधित-सत्य अंती उकलंता ...
धन्य झाले तिन्ही लोक,पटूनी सत्यता ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Comments
Post a Comment