कविता - 🌷 ' साक्ष ' तारिख - २७ जानेवारी २०२४
कविता - 🌷 ' साक्ष ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - २७ जानेवारी २०२४ वेळ - ११ वाजून ५५ मि. श्रीनटवर निरंजन नंदलाल हा नटला ... थेट हृदयीच, लबाड जाऊनी बसला ... सिंहासनस्थ श्रीरंग नाद-निनाद करी ... अष्टौ-सिद्धी वीणा-वादने, साथ करी ... ओठी वेणू विराजित, स्वर-झंकार करी ... मंत्रमुग्ध होत गोधेनु, दुग्ध-पान्हा सोडी ... गोप-गोपी घडे घेऊन जाती यमुनातीरी ... रम्य-सांजवेळ-अवतरले सांजरंग भूवरी ... हिरव्या-वनांतरी घन-दाट हिरवी झाडी ... राधासवे कान्हा, अलगद खोड्या काढी ... नभी टिपूर चांदणं, चंद्रही चम-चम करत ... झुळुझुळु वाही यमुना-जळ मूक साक्ष देत ... 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆