कविता - 🌷 " सुसंस्कारांची शब्दांजली " तारिख - सोमवार, २४ जून २०१७
कविता - 🌷 " सुसंस्कारांची शब्दांजली " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - सोमवार, २४ जून २०१७ मातृभाषेचे ते शब्द-वैभव अनुभवुनी, ऊर अभिमानाने अक्षरशः येतो भरुनी... मराठी-मनाचा हर्ष सदा दुथडी भरूनी... अति-आनंदाने जाई पुरताच ओसंडूनी ... परि, इंग्रजाळलेल्या पिढीची अशुध्द बोली... ऐकून नेमकी भाषा कोणती, शंका येई माय-मराठीची ती भ्रष्ट-बोली ऐकूनी, प्रत्येक काळजाचं होई, "पाणी-पाणी" चार-चौघात मातृभाषेची बूज न राखी, ही जन-मानसाची व्यथा-बोचरी-दुखरी तोडकं-मोडकं इंग्रजी बोलून धन्य होणे... कुबड्या घेत, काय जीणे ते लाजिर-वाणे जगभर या लोकांचे, होत्याचे नव्हते होते... तेंव्हा मात्र त्यांच्या "तोंडचे पाणीच पळते"...! माय-बोलीचा सन्मान करण्याचे सुसंस्कार... खात्रीनं बाल-मनांस देतील सुयोग्य आकार ! 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆