कविता - 🌷 " सुसंस्कारांची शब्दांजली " तारिख - सोमवार, २४ जून २०१७


कविता - 🌷 " सुसंस्कारांची शब्दांजली "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले 
तारिख - सोमवार, २४ जून २०१७ 

मातृभाषेचे ते शब्द-वैभव अनुभवुनी,
ऊर अभिमानाने अक्षरशः येतो भरुनी...

मराठी-मनाचा हर्ष सदा दुथडी भरूनी...
अति-आनंदाने जाई पुरताच ओसंडूनी ...

परि, 

इंग्रजाळलेल्या पिढीची अशुध्द बोली...
ऐकून नेमकी भाषा कोणती, शंका येई 

माय-मराठीची ती भ्रष्ट-बोली ऐकूनी, 
प्रत्येक काळजाचं होई, "पाणी-पाणी" 

चार-चौघात मातृभाषेची बूज न राखी, 
ही जन-मानसाची व्यथा-बोचरी-दुखरी 

तोडकं-मोडकं इंग्रजी बोलून धन्य होणे...
कुबड्या घेत, काय जीणे ते लाजिर-वाणे

जगभर या लोकांचे, होत्याचे नव्हते होते...
तेंव्हा मात्र त्यांच्या "तोंडचे पाणीच पळते"...!

माय-बोलीचा सन्मान करण्याचे सुसंस्कार...
खात्रीनं बाल-मनांस देतील सुयोग्य आकार !

🌷@तिलोत्तमा विजय लेले 
🙏🕉️🔆





















Comments

Popular posts from this blog

कविता - 🌷 " परी या-सम-हा " तारिख - १० डिसेंबर २०१६

कविता 🌷 " एहसास "

Poem - 🌷 " Live in Alignment " Date - 31 March 2025