कविता : 🌷 ' चौफेर प्रतिबिंब शिवाचे ' तारिख : १८ फेब्रुवारी २०२३
कविता : 🌷 ' चौफेर प्रतिबिंब शिवाचे ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : १८ फेब्रुवारी २०२३ वेळ :. १० वाजून १० मि. शिव-शक्तीस समर्पित दिन हा अति-पवित्र ... शिव-पार्वती विवाह म्हणून 'महा-शिवरात्र' ! पुष्प, चन्दन, भस्म, जलाभिषेक, बिल्वपत्र ... झळकतो वैश्विक उर्जेचा प्रचंड स्रोत सर्वत्र ! अथक प्रयत्नान्ती भगीरथ घेऊन आला, थेट स्वर्गातून पृथ्वीवरती आणले गंगेला ! शंकराने त्वरित जटेत धारण केले तिला, म्हणून 'गंगाधर' नावानं ओळखला गेला ! अमृत-मंथनात चौदावं रत्न, हे जहरी विष निघालं ... भोळ्या शंकरानं ते 'हलाहल’ प्राशन करुन टाकलं ! सृष्टीवरील भयाण संकटाचं तत्काल निवारण केलं ... तेव्हापासूनच 'नीलकंठ' हे नावही त्याला मिळालं ! शिव-तांडव नृत्य जगात आहे सुप्रसिध्द ... निसर्गही हवं ते देतो, भरभरुन मुक्तहस्त ! कधी कोपला तर मात्र, होऊन तो क्रुद्ध ... थैमान घालून तांडव-नर्तन करतो संत्रस्त ! शिव-शंकर-भोलेनाथ, निसर्गाचं जणू प्रतिकात्मक रूप खास ! सुनामी, ज्वालामुखी, चक्रीवादळं, भूकंप यांनी सृष्टीचा विनाश ... त्रिलोचन-शिव तिसरा डोळा उघडून तांडव करतो विनासायास ... एक नि...