कविता- 🌷 ' देव तारी त्यास कोण मारी ? ' तारिख - मंगळवार, ५ मार्च २०२४
कविता- 🌷 ' देव तारी त्यास कोण मारी ? ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - मंगळवार, ५ मार्च २०२४ वेळ - दुपारी, ३ वाजून ५० मि. आजीचे कृष्ण-भक्तिचे सुसंस्कार होते मीरेच्या बाल-मनावर ... त्यामुळे मनोमनी तिचा ठाम विचार, कृष्ण हाच 'एकमेव वर' ! प्रत्यक्षात मीरेचा विवाह झाला-भोजराज-मेवाडचा-राजकुंवर ... दुर्दैवानं तिचं सौभाग्यच हिरावून घेतलं, लढाईने रणांगणावर ! अजाण, एकाकी मीरेने मग भक्ति-मय-विश्व उभं केलं मनात ... जगाची भ्रांतच नाही, रात्रं-दिन रममाण ती भजन-किर्तनात ! कृष्ण-भक्तित मग्न मीरा बघून, राजपूत राणा करी चीड-चीड ... कसंही करुन तिचा कांटा काढण्या-सोडली लाजलज्जा-भीड ... गाफील मीराबाईच्या गळ्यात घातला, सापाचा हार दुष्ट दिराने ... इजा न करताच हारातील विषारी साप पळाला-ईश्वरीय कृपेने ! मीराबाईच्या दुधाच्या पेल्यात महाभयंकर जहर घातले राणाने, कसलाही विचार न करता ते प्राशन केले, भाबड्या मीराबाईने ... खात्री करून घ्यावी म्हणून राणा येता, मूर्च्छित पडलेली मीरा ... तडक उठून, दिव्य-भक्तिमय-तंद्रीतच नाचू-गाऊ लागली मीरा ! असा अद्भुत भक्ति-योग की प्रत्यक्ष भगवंत नित्य असे रक्षणास ...