कविता - 🌷 " दिव्य-प्रकाशाचा मागोवा " तारिख - शनिवार, २५ मार्च २०१७
कविता - 🌷 " दिव्य-प्रकाशाचा मागोवा " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - शनिवार, २५ मार्च २०१७ दुसर्याही पत्नीच्या आकस्मित निधनामुळं, आमचे आजोबा पार हतबल झाले त्यामुळं, मानसिक धक्क्याने मनस्थिती होती दुर्बल ... त्यात घरच्या स्त्रीवर्गानी जणू चंगच बांधला वधू-संशोधनाच्या कार्यात पुढाकारच घेतला शेवटी त्यांच्या धोशामुळे त्यांनी होकार दिला आजोबांनी पुन्हा लग्न करण्यास संमती दिली शांताची नव्यानं घरी आलेली-सावत्र-आईही, आधीच्या आईचीच जणू नवीन आवृत्ती होती ... ती येता शांताच्या आयुष्यात खळबळ उडाली शांताची शाळा तर फार पूर्वीच बंद केली होती, तिच्या तीन भावंडांची व सगळ्या घरकामाची, संपूर्ण जबाबदारी, एकट्या चिमुरड्या शांताची ... आता शांता रात्रंदिन कामात जुंपली गेली होती त्यात भरीस भर वाढीव कामाची जबाबदारी, सतत टोचून बोलणारी नवी सावत्र-आई होती दैव-गति असं समजून, सर्व सहन करीत होती पण त्याचबरोबर स्वयं श्रीगणेशा शिकत होती ! शांताची शाळा बंद पण भावंडांची शाळा अखंड हा कोणता न्याय, त्या भाबड्या जीवाला न कळे शांता तीक्ष्ण बुद्धिची, नुसते ऐकून सर्व ज्ञान...