Posts

Showing posts with the label देवी-देवता

कविता - 🌷 " ज्ञान-अमृत " तारिख - बुधवार १४ फेब्रुवारी २०२४

कविता - 🌷 " ज्ञान-अमृत " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले  तारिख - बुधवार १४ फेब्रुवारी २०२४ वेळ - दुपारी, २ वाजून १९ मि. वसंत ऋतूच्या स्वागतासाठी ... वसंत-पंचमी ऋतुराजासाठी ... वीणा-वादिनी, देवी सरस्वती ... संगीत-वाणी-कला-बुद्धिदाती ! शिक्षण आणि ज्ञानाची देवता ... शुभ्र-वसना-श्रीसरस्वती माता ... कोणत्याही कार्यामध्ये सफलता, सखोल ज्ञानाचीच आवश्यकता ... श्रीसरस्वती मातेचे शुभाशिर्वाद, ज्ञानार्जनास जरुरीचे-निर्विवाद ... सरस्वती-देवीच्या कृपा-प्रसादे, ज्ञानार्जन निर्विघ्नपणे पूर्ण होते ... माणूस हा, आजन्म विद्यार्थी ... देवी-पूजेत भाव हवा निस्वार्थी ... मनोभावे पूर्ण-आराधना देवीची ... प्रसन्न होत देवी-ज्ञान-अमृत देई  ... 🌷@तिलोत्तमा विजय लेले  🙏🕉️🔆