कविता - 🌷" सुवर्ण-संधी " तारिख - २२ नोव्हेंबर २०१६
कविता - 🌷 " सुवर्ण-संधी " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - २२ नोव्हेंबर २०१६ सदा मोहोजाळ घालूनी वेटोळे ... अंगा वेढूनीया बसे, हेही न कळे ... अळू-पानासम जर मन असे तृप्त ... पाण्याच्या थेंबापरि राही, अलिप्त ... अतृप्तीच सर्वं वासनांचं खरं तर मूळ ... दुःखी-कष्टी करी जीवा, लावूनी खूळ ... बिलगून बसे मुंगी जशी, न सोडी गूळ ... मन-अधीन भरकटे, होऊनी दिशाभूल ... या अज्ञानाची असती अगणित झापडं ... मति-मंद, होई बंद, डोळे उघडे सताडं ... बुध्दी-भ्रष्ट-वागणं-बोलणं-करणं, बेबंद ... चुकीच्या जागी, मग शोधीत बसे आनंद ... अंतर्यामी बाळगून फुकाचाच उग्र दर्प ... महा-भयंकर फुत्कार मारी विषारी सर्प ... पापं करून-सवरूनही, करीतसे शंखं ... नेमकी संधी साधून हमखास मारी डंखं ... जमवल्या पापांच्या अगणित अशा राशी ... उन्मत्तपणा भरीस-भर, होताच तो राशी ... आता कितीही मोठी जरी झाली उपरती ... येणं शक्य नाही परत, निसटून गेली रेती ... सरळ-मार्गी जीवांना पडे, अति-संभ्रम ... न कळे, नेमकं काय करावे, होई विभ्रम ... मुजोर जीव मात्र सोकावें, बनूनी बेशर्म ... सोडी पूर्णच ताळतंत्र, लाज अन् शरम ... पापं करण्याचं पण ल...