Posts

Showing posts with the label भक्ति-गीत

कविता - भक्ति-गीत 🌷 ' हाताळणी ' तारिख - गुरुवार, ८ फेब्रुवारी २०२४

कविता - भक्ति-गीत 🌷 ' हाताळणी ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - गुरुवार, ८ फेब्रुवारी २०२४ वेळ - दुपारी १२ वाजून ४९ मि. शत-शत-रंगात, रंगले हेरंब श्रीगजानन त्यां दर्शन-मात्रे, निज चित्त झाले पावन ... सुखाच्या मृगजळापाठी मन होई मलीन नाम-स्मरणाच्या-घोषात होतसे तल्लीन ... दु:खाच्या सावटाने, तन-मन होते खिन्न सत्कर्म-सत्कार्य करुन, होतसे ते प्रसन्न ... नानाविध सूक्ष्म रूपांत, तो परिक्षा घेतो विविध स्तरांवर, तो पारखून घेत असतो ... नारळ जसा वाजवून तपासून घेती कसून दुष्काळ-पूर-रोगादी- विपदांनी भेडसावून ... विपरीत स्थितीत शांत राहण्याची कसोटी  कठीण समस्येवर मात करण्याची हातोटी ... सर्व गोष्टींची साक्षी-भावाने अशी हाताळणी ही भक्ताची ईश्वरीय-तत्वांशी हात-मिळवणी ... 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता 🌷 ' आराधना ' तारिख - बुधवार, २४ जानेवारी २०२४

कविता 🌷 ' आराधना ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - बुधवार, २४ जानेवारी २०२४ वेळ - दुपारी २ वाजून २२ मि. करता कार्यारंभीच, श्री गणेश-वंदना ... सफल-संपूर्ण होई सकल मनोकामना ... आळविता मनोभावे त्या श्रीगजवदना, करूनी मानस-पूजा आणि आराधना ... दृष्य-अदृष्य-क्लेषांचे निरसन करी तो ... न मागता, सिध्दि-बुध्दी-यशश्री देई तो ... न सांगता-सवरताच अंतरंग ओळखतो ... निस्सीम भक्ति-भाव-अचूक तो जाणतो ... चराचरात-स्थित, रात्रं-दिन तो पारखतो ... अंतर्यामी-स्थित क्षण-न्-क्षण अनुभवतो ... उडिदामाजी काळे-गोरे अचूकपणे हेरतो ... स्वार्थी-संधीसाधू-भोंदुंना शासनही करतो ... सत्कार्य-परोपकार हेच, महत्त्वपूर्ण मानतो ... स्वच्छ सुंदर अंत:करणातच तो खरा रमतो ... खोटा-भपका-पैशांचा चुराडा यांनी रुष्ट होतो ... भक्तिपूर्ण-आराधनेनेच तो सत्वर प्रसन्न होतो ... 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆 कविता 🌷 ' आराधना ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - बुधवार, २४ जानेवारी २०२४ वेळ - दुपारी २ वाजून २२ मि. करता कार्यारंभीच, श्री गणेश-वंदना ... सफल-संपूर्ण होई सकल मनोकामना ... आळविता मनोभावे त्या श्रीगजवदना, कर...