कविता 🌷 ' आराधना ' तारिख - बुधवार, २४ जानेवारी २०२४


कविता 🌷 ' आराधना '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - बुधवार, २४ जानेवारी २०२४
वेळ - दुपारी २ वाजून २२ मि.

करता कार्यारंभीच, श्री गणेश-वंदना ...
सफल-संपूर्ण होई सकल मनोकामना ...

आळविता मनोभावे त्या श्रीगजवदना,
करूनी मानस-पूजा आणि आराधना ...

दृष्य-अदृष्य-क्लेषांचे निरसन करी तो ...
न मागता, सिध्दि-बुध्दी-यशश्री देई तो ...

न सांगता-सवरताच अंतरंग ओळखतो ...
निस्सीम भक्ति-भाव-अचूक तो जाणतो ...

चराचरात-स्थित, रात्रं-दिन तो पारखतो ...
अंतर्यामी-स्थित क्षण-न्-क्षण अनुभवतो ...

उडिदामाजी काळे-गोरे अचूकपणे हेरतो ...
स्वार्थी-संधीसाधू-भोंदुंना शासनही करतो ...

सत्कार्य-परोपकार हेच, महत्त्वपूर्ण मानतो ...
स्वच्छ सुंदर अंत:करणातच तो खरा रमतो ...

खोटा-भपका-पैशांचा चुराडा यांनी रुष्ट होतो ...
भक्तिपूर्ण-आराधनेनेच तो सत्वर प्रसन्न होतो ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆



































कविता 🌷 ' आराधना '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - बुधवार, २४ जानेवारी २०२४
वेळ - दुपारी २ वाजून २२ मि.

करता कार्यारंभीच, श्री गणेश-वंदना ...
सफल-संपूर्ण होई सकल मनोकामना ...

आळविता मनोभावे त्या श्रीगजवदना,
करूनी मानस-पूजा आणि आराधना ...

दृष्य-अदृष्य-क्लेषांचे निरसन करी तो ...
न मागता, सिध्दि-बुध्दी-यशश्री देई तो ...

न सांगताही तो अंतरीचे-रंग ओळखतो ...
निस्सीम भक्ति-भाव-अचूक तो जाणतो ...

चराचरात-स्थित, रात्रं-दिवस पारखतो ...
अंतर्यामी-स्थित क्षण-न्-क्षण तो हेरतो ...

स्वार्थी-संधीसाधू-भोंदुंना दंडही तो देतो ...
सद्भाव-सत्कार्य-परोपकार तोच मानतो ...

स्वच्छ सुंदर अंत:करणात तो खरा रमतो ...
भक्तिपूर्ण-आराधनेने तो खरा प्रसन्न होतो ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆









































Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "