कविता -🌷 "ज्ञात" मधून"अज्ञात"कडे झेप. तारिख - ११ ऑक्टोबर २०१६

कविता -🌷 "ज्ञात" मधून"अज्ञात"कडे झेप
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - ११ ऑक्टोबर २०१६

नवरात्रीचं अत्यंत शुभ असं पर्व ...
दहाव्या दिवशी विजयश्रीचं पर्व ...
भारतीय संस्कृतिचा सार्थ गर्व ...
प्राचीन वेदांचं-ज्ञान सांगे अथर्व ...

विजयादशमी म्हणजे दहाव्या दिवशीचा विजय
रामे रावणाचा वध केला, लंकेचा दारुण पराजय 
नऊ रात्रींच्या घोर युद्धानंतर दुर्गादेवींचा दिग्विजय
पांडवांचा अज्ञातवास संपुन त्यांच्या हक्कांचा जय

दशानन रावण युद्ध हरला म्हणून " दश-हरा" ...
दहाव्या दिवशी वध केला देवीनं महिषासुरा
"विजयादशमी"स विजयाचा-जल्लोष सुरवरा ...
"आयुध-पूजा" करून वापरले शस्त्रा-अस्त्रा

पांडव लढले शमीच्या झाडावरून आयुधं काढून
सारे हक्क त्यांचे परत मिळवले दिग्विजयी होऊन 
जीवनातिल सर्व क्लेशांचे, कष्टांचे, पापांचे दहन ...
राम-लीलेत श्रीरामांनी केले रावणाचे गर्व-हरण ...

असत्यावर सत्याचा विजय ...पांडवांनी कौरवांचा पराजय ...
नऊ स्वरूपातील देवींचा जय-रामाचा लंकेशावर दिग्विजय ...

खलं-प्रवृत्तींचा समूळ संहार 
शौर्याचा-विरतेचा जयजयकार ...
नऊ दिवसाच्या उपवासा नंतर,
मिष्टान्न मेजवानीचा उपहार ...

दसरा हा भक्ति-समर्पणाचा सण 
अंतर्गत सर्व असुरी-शक्तिंचं मरण ...
सृजनशील वृत्तींना शुभ निमंत्रण ...
उत्साही,आनंदी जल्लोश सर्वजण ...

श्रद्धा-भक्ति-उल्हास यांचा त्रिवेणी-संगम ...
अध्यात्मिक प्रगतीमधे आश्चर्यजनक जम ...

वासनांपासून कायम मुक्ति
विविध सिद्धिंची दैवी शक्ति
सरस्वती-पूजन विद्या-भक्ति
आयुधं वृक्षी लपवीणं-युक्ति ...

नव-रात्रींच्या तपश्चर्येनं पुण्य जमतं ...
सत्याचा उदय व त्रिकाल-ज्ञान होतं ...

साधकाच्या मनातील पाप नष्ट होते ...
अध्यात्मिक-ज्ञान प्रगती दृश्य होते
"ज्ञात" मधून"अज्ञात"कडे झेप जाते

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🌅🕉🌷☘

Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "