कविता - 🌷 " जीव जेथे गुंतला " तारिख - १० नोव्हेंबर २०१६
कविता - 🌷 " जीव जेथे गुंतला " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - १० नोव्हेंबर २०१६ जीव जेथे गुंतला ... तेथेच लागला लळा जलात सुगंधी वाळा ... सदा प्रेम लाभे प्रेमळा ... जीव जेथे गुंतला ... तेथे अरुणोदय झाला प्रेमाचा सूर्य उगवला ... भक्तिचा उजेड पसरला ... जीव जेथे गुंतला ... गौमातेस पान्हा फुटला वासरु झेप घेई दुग्धपानाला गायीसह बछडा, तृप्त झाला ... जीव जेथे गुंतला ... काडी काडी केली गोळा ... खोपा, पिल्लांसाठी केला ... "आ"वासलेल्या पिल्लाला, दाणा-दाणा तिनं भरवला ... शब्द जरी एकच "जिव्हाळा", दरेक नात्यातील भाव निराळा ... माय-लेक मायेचा ओलावा, पिता-पुत्र-पुत्री लाडाचा सोहळा ... भावा-बहिणीच्या नात्यात, सूक्ष्मभाव जे स्पर्शती काळजाला ... देवानेच तिच्या रक्षणा योजिला-सदैव ढाल होऊनी लढायला ... प्रियकर-प्रेयसीच्या नात्याला, हा तर असे " दिलका मामला " विधात्याने तरल-भाव निर्मिला, जीव ओतून प्रेम करायला ... पती-पत्नीच्या नात्याला, जणू भगवंतच बांधे ब्रह्म-गाठीला ... प्रेम-ओढ-कर्तव्य-भावनेच्या त्या स्वर्गीय पवित्र-बंधनाला ... लेकरं असती सोबतीला, तेव्हाच ...