कविता - 🌷 " जीव जेथे गुंतला " तारिख - १० नोव्हेंबर २०१६
कविता - 🌷 " जीव जेथे गुंतला "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - १० नोव्हेंबर २०१६
जीव जेथे गुंतला ...
तेथेच लागला लळा
जलात सुगंधी वाळा ...
सदा प्रेम लाभे प्रेमळा ...
जीव जेथे गुंतला ...
तेथे अरुणोदय झाला
प्रेमाचा सूर्य उगवला ...
भक्तिचा उजेड पसरला ...
जीव जेथे गुंतला ...
गौमातेस पान्हा फुटला
वासरु झेप घेई दुग्धपानाला
गायीसह बछडा, तृप्त झाला ...
जीव जेथे गुंतला ...
काडी काडी केली गोळा ...
खोपा, पिल्लांसाठी केला ...
"आ"वासलेल्या पिल्लाला,
दाणा-दाणा तिनं भरवला ...
शब्द जरी एकच "जिव्हाळा", दरेक नात्यातील भाव निराळा ...
माय-लेक मायेचा ओलावा, पिता-पुत्र-पुत्री लाडाचा सोहळा ...
भावा-बहिणीच्या नात्यात, सूक्ष्मभाव जे स्पर्शती काळजाला ...
देवानेच तिच्या रक्षणा योजिला-सदैव ढाल होऊनी लढायला ...
प्रियकर-प्रेयसीच्या नात्याला, हा तर असे " दिलका मामला "
विधात्याने तरल-भाव निर्मिला, जीव ओतून प्रेम करायला ...
पती-पत्नीच्या नात्याला, जणू भगवंतच बांधे ब्रह्म-गाठीला ...
प्रेम-ओढ-कर्तव्य-भावनेच्या त्या स्वर्गीय पवित्र-बंधनाला ...
लेकरं असती सोबतीला, तेव्हाच "घरपण" येई घरा-दाराला ...
मित्र-मैत्रिणीच्या नात्याला जणू ईश्वरी-आशिष असे लाभला ...
तोड नाही निःस्वार्थ-मैत्रीला-जरुरी आहे जी सुंदर जगण्याला ...
भक्त व परमेश्वर यांच्या अपूर्व नात्याला, मन:पूर्वक केलेल्या भक्तिला ...
भव-सागर पार करण्याला, त्या दिव्य प्रकाश-झोतात विलीन व्हायला ...
जन्म-मृत्यु-फेऱ्यातून सुटायला,आप-पर-भाव मिटून,एकरूप व्हायला ...
जंग-जंग पछाडले पण योग्य नावच न मिळे, या "शब्दातीत-नात्याला" ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Comments
Post a Comment