कविता -🌷 " नातं म्हणजे एक कोमल तंतू ". दिनांक - २७ ऑगस्ट २०१६
कविता -🌷 " नातं म्हणजे एक कोमल तंतू " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले दिनांक - २७ ऑगस्ट २०१६ नातं म्हणजे एक कोमल तंतू ... रेशीम-किड्या मधून नुकताच निघू लागलेला, भाव-बंधनानी ओलाचिंब झालेला ... आणि तरीही काहीसा निराळा ... आई आणि तिचे बाळ यांचा कधीही न संपणारा एक जिव्हाळ्याचा जीवन-प्रवास ... तान्हुल्यानं घट्ट पकडून ठेवलेल्या इवल्याश्या मुठीत ... अन् आईच्या उबदार कुशीत ... भावा-बहिणीचा एक अवर्णनिय असा, लडिवाळ जीवन-प्रवाह...... राखी-भाऊबीजेच्या औक्षणाने संतत तेवणाऱ्या नंदादीपा सारखा, शान्त, अखंड व अक्षय..... दोन भावा-भावा मधला एक हवाहवासा वाटणारा ... लुटुपुटूच्या भांडणानी अजुनच अधिक भक्कम होत जाणारा, विलक्षण अवर्णनीय बंधू -भाव ... पति आणि पत्नीची जन्मोजन्मीची एक अतूट जोडी ... आणि त्या गूढ-बंधनातली अवीट, अगम्य अशी गोडी ... वडील आणि मुलं यांच्यातील हळुवार बंध ... एक बिंब तर दुसरे त्याचेच हुबेहूब प्रतिबिंब ... जणू लाड व शिस्त यांची अचूक अशी सांगड ... वडील आणि लेक यांच्यातील लडिवाळ बंध ... दूधा-वरच्या त्या साईचे केव्हढे कोड-कौतुक ... इथं शिस्त-बिस्त नाही हं, लाडच होतात फ...