Posts

Showing posts with the label माय-मराठी/मातृभाषा/मायबोली

कविता - 🌷 " मातृ-भाषेचे ऋण " तारिख - सोमवार, २४ जून २०१७

कविता - 🌷 " मातृ-भाषेचे ऋण "  कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले  तारिख - सोमवार, २४ जून २०१७  मातृ-भाषेचे ते प्रचंड शब्द-वैभव अनुभवुनी, मराठी-ऊर अभिमानाने अक्षरशः येतो भरुनी... प्रत्येक मराठी-मनाचा हर्ष सदा दुथडी भरुनी... मातृभाषेवरील प्रेमाने- जाई पुरताच ओसंडूनी... असे असूनही, इंग्रजाळलेल्या पिढीची अशुध्द-धेडगुजरी बोली... ऐकता, नेमकी ही भाषा कोणती-दाट शंका येई... माय-मराठीची ती भ्रष्ट-स्वरुपातील बोली ऐकूनी,  प्रत्येक स्वाभिमानी काळजाचं होई,"पाणी-पाणी" ... फॅशन म्हणून चार-चौघात, भाषेची बूज न राखी... ही मराठी-जन-मानसाची व्यथाच-बोचरी-दुखरी... तोडके-मोडके चुकीचे इंग्रजी बोलून धन्य वाटणे... उसन्या कुबड्या घेत, काय जीणे ते लाजिर-वाणे...! जगभरात या लोकांचे जेव्हा होत्याचे नव्हते होते, तेंव्हा मात्र अशा लोकांच्या "तोंडचे पाणीच पळते"...! मराठी शिकून-बोलून तयार होतील लखलखते हिरे... स्वच्छ-सुस्पष्ट-उच्चार, वाणीवर होती संस्कार गहिरे... मायबोलीचा यथार्थ सन्मान करण्याचे होता सुसंस्कार, खात्रीने सर्व बाल-मनांना देतील सुंदर-सुयोग्य-आकार ! म्हणूनच अत्यावश्यक, मातृभाषा-माध्य...