कविता- 🌷 ' आदिमाया-मुक्ताबाई ' तारिख - २९ फेब्रुवारी २०२४
कविता- 🌷 ' आदिमाया-मुक्ताबाई ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - २९ फेब्रुवारी २०२४ वेळ - दुपारी, ४ वाजून १३ मि. निंदा, उपेक्षा सहूनही, आत्म-सामर्थ्याची तेजोमय वाटचाल... स्वतःसह सर्वांस तारुन चार-भावंडांनी दिव्यज्ञान केले बहाल ! मुक्तेची जन्मजात-जिज्ञासा, अलौकिक प्रतिभेने तेजाळलेली ज्ञानेश्वरांच्या खांद्यास खांदा लावून अध्यात्मिक धुरा वाहिली ! 'संन्याशाची-मुलं'म्हणून बहिष्कृत-अवहेलनेमुळे चिंतामग्न... निर्गुणाचा स्तर गाठून, स्वसाधनेच्या फल-स्वरुपे आत्ममग्न ! लोकांची हेटाळणी सहूनही-भावंडाना आत्मतेजाची झालर ... भावंडात लहान मुक्ताईंनी, पोक्तपणे घातली मायेची पाखर ... ज्ञानेश्वरांच्या बोधामृताने उघडली, मुक्ताईंची ज्ञान-कवाडे ... आजपावेतो भारतभूमीत अभिमानाने गाती त्यांचे पोवाडे ... निर्जीव-भिंतीवर बसून स्वागतास आले ज्ञानदेव, विनाकष्ट हे पाहून खजील-चांगदेवांचा गर्व चूरचूर होऊन झाला नष्ट ! खजील चांगदेव नत-मस्तक, घेतली-लोळण-ज्ञानेश्वर-चरणी... "यासी करा आत्मज्ञानी" म्हणंत, मुक्ताईंकडे केली पाठवणी ! मुक्ताबाईंची थोरवी अगाध-त्यांचे अपरंपार योग-सामर्थ्य-बळ... मुक्त...