Posts

Showing posts with the label राधा - कृष्ण

कविता - 🌷 " आप-पर-भाव " तारिख - २५ ऑगस्ट २०१६

कविता - 🌷 " आप-पर-भाव " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - २५ ऑगस्ट २०१६ झुंझु-मुंझु झालं आणि, गोड साद आली कानी, धुंद-मधुर त्या स्वरांनी ... काळजाचं झालं पाणी ... माध्यान्हीच्या शांत वेळी,  द्वाड कान्हा, शीळ घाली ... खट्याळ हरीच्या खोड्यांनी, पुरती बावरली  राधा-भोळी  ... तीन्ही सांज होऊ घातली, गायी-वासरे घरा परतली ... ऐकूनी कान्हाची मुरली, सृष्टीही देहभान विसरली ... रजनीचा प्रहर काळा, सावळाच तो घन-निळा ... राधेलाही विसर पडला ... आप-पर-भाव मिटला ... कोण ही राधा अन् कोण कन्हैया ... कोण देवकी, कोण यशोदा मैय्या ... कणा-कणात आहे, सुंदरसे स्वप्न मना-मनात नांदे  सदा  राधा-कृष्ण ... राधा-कृष्ण गोपाल-कृष्ण... राधा-कृष्ण गोपाल-कृष्ण... युगानु-युगांपासून चालत आला हा खेळ ... प्रत्येक स्त्री-पुरुष जणू राधा-कृष्ण-मेळ ... 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆