कविता : 🌷' मंगलमूर्ती ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : बुधवार, ७ जून २०२३
कविता : 🌷' मंगलमूर्ती ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : बुधवार, ७ जून २०२३ वेळ : १२ वाजून १४ मि. कृष्ण-पक्षात येणारी चतुर्थी म्हणजे 'संकष्ट'चतुर्थी कठीण प्रसंगातून सुटका करणारी म्हणून 'संकष्टी' प्रथम पूज्य-गणेशाचं पूजन-वंदन आणि पुष्पवृष्टी उकडीच्या मोदकांच्या नैवेद्याने गणरायाची संतुष्टी शुक्ल-पक्षातल्या चतुर्थीला म्हणतात ' विनायकी ' मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला म्हणतात 'अंगारिकी' दुःखापासून मुक्तीसाठी भक्त संकष्टीचं व्रत करतात सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत उपवास-पूजा करतात ! सात्विक आहार-विचारांनी वाढतं आंतरिक मनोबळ संकटांशी दोन हात करण्यासाठी, अंगी संचारतं बळ मनाची अशांती-अस्वस्थता-असुरक्षितता काढती पळ जीवनातील कूट-समस्याही मग आपसुक होती सरळ ! अत्यंत चतुर अन् कुशाग्र-बुद्धीचा गौरी-पुत्र-गजानन हसत-हसत जिकलं त्यानं पृथ्वी-प्रदक्षिणेचं आव्हान जरी निघाला मयूर-वाहनावर कार्तिकेय जलद-गतिने शिव-पार्वतीला-प्रदक्षिणा घातली बुद्धिशाली गणेशाने ! महाकाय मंगलमूर्ती आरुढ होऊन मूषक वाहनावर दूर करतो सगळी विघ्नं म्हणून आनंद पसरतो भूवर प्रिय दुर्वांकुर व...