कविता - भक्ति-गीत 🌷 ' हाताळणी ' तारिख - गुरुवार, ८ फेब्रुवारी २०२४

कविता - भक्ति-गीत 🌷 ' हाताळणी '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - गुरुवार, ८ फेब्रुवारी २०२४
वेळ - दुपारी १२ वाजून ४९ मि.

शत-शत-रंगात, रंगले हेरंब श्रीगजानन
त्यां दर्शन-मात्रे, निज चित्त झाले पावन ...

सुखाच्या मृगजळापाठी मन होई मलीन
नाम-स्मरणाच्या-घोषात होतसे तल्लीन ...

दु:खाच्या सावटाने, तन-मन होते खिन्न
सत्कर्म-सत्कार्य करुन, होतसे ते प्रसन्न ...

नानाविध सूक्ष्म रूपांत, तो परिक्षा घेतो
विविध स्तरांवर, तो पारखून घेत असतो ...

नारळ जसा वाजवून तपासून घेती कसून
दुष्काळ-पूर-रोगादी-विपदांनी भेडसावून ...

विपरीत स्थितीत शांत राहण्याची कसोटी 
कठीण समस्येवर मात करण्याची हातोटी ...

सर्व गोष्टींची साक्षी-भावाने अशी हाताळणी
ही भक्ताची ईश्वरीय-तत्वांशी हात-मिळवणी ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆



























Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "