कविता - 🌷 " अखंड-ओघ " तारिख - शनिवार, १३ मे २०१७
कविता - 🌷 " अखंड-ओघ "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - शनिवार, १३ मे २०१७
हां हां म्हणता दिवस-महिने भरधाव जात होते ...
पण तिची साचलेली कामं संपण्याचे नाव नव्हते ...
अष्टभुजा देवी-समान सदा-चौफेर दाही दिशांना,
बारकाईने लक्ष देऊन, कामांचा उरक पाडताना ...
प्रत्येक-न्-प्रत्येक दिवसाचे अगदी चोवीस तासही
कामांना हाता-वेगळे करताना, तिला पडायचे कमी ...
आला दिवस, कधी तो उगवला ...
अन् कधी आणि कसा तो मावळला ...
याचा अक्षरशः थांगपत्ता नसायचा ...
कामाच्या प्रत्येक टप्प्यावर आव्हानं असूनही,
तितक्याच ताकदीने-आनंदाने सामोरे जायची ...
तिची एक गोष्ट मात्र अतिशय विलक्षण होती,
प्रत्येक क्षण-न्-क्षण करीत असे तिला आनंदी ...
अडचणीच्या अत्यंत कर्म-कठीण-प्रसंगी सुद्धा,
मदतीचा अखंड-ओघ, तिला मिळत राहायचा ...
दृश्य-अदृश्य रूपात अचानक मिळे मदतीचा हात ...
सहजगत्या संकटांतून तारून, देई मोलाची साथ ...
सुरक्षित किनारी, सुखरूपरित्या-अलगद आणून,
विजयाचं पुरेपूर माप टाकायचा, तिच्याच पदरात ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Comments
Post a Comment