कविता - 🌷 " परी या-सम-हा " तारिख - १० डिसेंबर २०१६
कविता - 🌷 " परी या-सम-हा "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - १० डिसेंबर २०१६
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ...
नाव घेताच स्वाभिमानाचे, रोमांच सर्वांगावर ...
" ने मजसी ने, परत मातृभूमीला ...सागरा प्राण तळमळला,सागरा ..."
शब्द, अंतर्मन हलवून सोडणारे, थेट काळजाला हात घालणारे ...
शब्द, अत्यंत प्रभाव पाडणारे-शंभर नंबरी लख्ख सोन्यासारखे ...
वयाच्या पंधराव्या वर्षापासून समर्थ लेखणी ...
काव्य तथा लेख एकदम मुद्देसूद, छान मांडणी ...
नाट्य-काव्य-संगम- देशप्रेमाची उपजत लेणी ...
ओजस्वी- वक्ता, प्रभावशाली, ओघवती वाणी ...
एक कवी, लेखक, नाटककार म्हणून श्रेष्ठ ...
एक नेता, स्वातंत्र्य-सेनानी म्हणून उत्कृष्ट ...
एकनिष्ठ प्रखर- देशभक्त म्हणून, अत्युत्कृष्ट ...
माणूस म्हणून महान, कार्यकर्ता, बुद्धिनिष्ठ ...
किर्तीची अजिबात हाव नाही ...पैशाचा बिल्कुल मोह नाही ...
पदासाठी खेच-ताण नाही ...वेड फक्तं देशाच्या स्वातंत्र्याचं ...
सार्थ अभिमान हिंदूत्वाचा-आंतरिक तळमळ फक्तं मातृभूमीची ...
त्याकाळातही आग्रह धरला हिंदू-संस्कृतीतून, जातीयवाद संपूर्ण-समूळ उच्चाटन करण्यासाठी ...
धर्मान्तरीत बांधवांना, हिंदू-धर्मात परत घेणं-संकुचित चालीरीतींचं अंधानुकरंण बंद करण्यासाठी...
देश-व्यापी प्रतिकारात्मक,चळवळ सुरु करुन, देशातील युवकांना प्रेरित करुन, एकत्रीत-करण्यासाठी ...
पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी-शिष्यवृत्ती घेऊन, इंग्लडहून बॅरिस्टरची पदवी ...
इंग्लडमध्ये, इंडिया-हाऊसमधून देशसेवा केली-भारतीय तिरंगी-झेंड्याची योजना-रचना केली ...
मदनलाल धिंग्रा सारखी, सक्रिय, शिष्य-मंडळी जमवून, देश-हीतासाठी झटण्याची प्रेरणा दिली ...
प्रदीर्घ कारावासाच्या काळात तसेच, आयुष्यभरात सर्व प्रकारचं उत्कृष्ट लेखन-कार्य केले ...
नाटकं,कथा,लघुकथा,कविता,पुस्तकं,कादंबऱ्या, आत्म-चरित्र," माझी जन्मठेप ","अथांग " ...
सक्तमजुरी दिवस-रात्र केल्यावरही जिद्दीनं सह-कैद्यांना लिहिण्या-वाचण्यास शिकवले-
अथक प्रयत्नांन्ती कैद्यांसाठी वाचनालय सुरु केले ...प्रचंड मेहनतीचं फळ मिळाले ...
सन १९२१ मध्ये, तात्या सुटले ... ब्रिटिश-सरकारने, हजार-अटिंमध्ये त्यांना जखडायचा चंगं बांधला-
अत्यंत बुद्धिवंत स्वातंत्र्य-सेनानीला असं बांधून ठेवणं त्या ब्रह्मदेवाला अशक्य, तिथे ब्रिटिशांची काय कथा ...
ठिक-ठिकाणी सभांचं आयोजन करुन गोंधळलेल्या, तरुणांना अमूल्य मार्ग-दर्शन केलं ...
फाळणीला," क्वीट-इंडिया"ला सक्त विरोध केला- जन-हितार्थ व्याख्यानं दिली
२६ फेब्रुवारी, १९६६ ला, आत्म-समर्पण केलं, अन्न-पाणी-औषधं-फळं सगळ्याचा त्याग केला ...
एक तळपता सूर्य कायमचा अस्ताला गेला-स्व-इच्छेनं जणू आधुनिकरित्या-"समाधीस्थ झाला ...
त्या असामान्य-अद्भुत तेजाचा "वाङ्मयीन-प्रकाश" सर्वांस लाभला ...
झाले बहु, होतील बहु, परी या सम हा ...
दुसरा असा कोणी " सिद्ध-हस्त, द्रष्टा युग-पुरुष ", होणे नाही ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Comments
Post a Comment