कविता - 🌷 " सिकंदर - पौरस " तारिख - १२ डिसेंबर २०१६

कविता - 🌷 " सिकंदर - पौरस "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - १२ डिसेंबर २०१६

कधी शत्रूही जाऊ शकतो भारावून,
उच्च- तम जीवन- मूल्यांना पाहून ...
रणयुद्ध थांबवून, अभय-दान देऊन
जन्म-भराच्या मैत्रीचं वरदान देऊन ...

जग-ज्जेता व्हायचं एकमेव स्वप्नं ...
उराशी आला होता तो कवटाळून ...
सिकंदर सुसाट घुसला हिंदुस्तानात,
लढला संपूर्ण तयारी-निशी जोशात ...

पौरस व अंभी हे शेजारच्या राज्यांचे राजे ...
पण दोघांच्यामधून विस्तव सुद्धा जात नसे ...
एक दक्षिण-धृव दुसरा उत्तर-धृव असे होते ते...
पौरसचं सरळ मन, अंभी भ्याड-मतलबी-धूर्त
पौरस सुसंस्कृत,अंभी संधी-साधून सोडी मुहूर्त ...

हिंदुस्तानात घुसण्या आधी, खूप पूर्वी-पासून 
हुशार, महत्वाकांक्षी सिकंदरने गृह-पाठ करुन
दोघांचेही स्वभाव-विशेष ठेवले होते तपासून ...
आपसातल्या त्या दुष्मनीचा फायदा उचलून ...

एकाचवेळी दोघांच्याकडे शांती प्रस्ताव पाठवला ...
घाबरट, लालची अंभी त्याच्या जाळ्यात फसला ...
त्यामुळं युद्ध-शांती-करार सिकंदर-अंभीत झाला
शूर-वीर पौरसने प्रस्ताव साफ शब्दात फेटाळला ...

सिकंदर-पौरसचा जेव्हा झाला आमना-सामना, 
सिकंदर मनी म्हणाला,"ये अलग मिट्टिसे है बना"
लोभी,स्वार्थान्ध-अंभीहून किती वेगळा आहे हा ...

अंभी-सिकंदर युती होऊन, पौरसवर हल्ला केला 
त्याला दोन्ही बाजूंनी घेरुनही निडर-पौरस लढला ...
पौरसच्या शौर्याची शर्थ पाहून, तो चकितच झाला 
स्वार्थी अंभीपेक्षा, पौरसच मैत्रीसाठी योग्य वाटला ...

मनातून इतका हादरला की त्यानं पवित्राच बदलला ...
हिंदुस्तानातून गाशा गुंडाळून आला तसा मागे फिरला ...
भारतीय-संस्कृती-मुल्यांनी, सिकंदर प्रभावित झाला ...
पौरसच्या रुपात तर त्याला एक नवा दोस्तच मिळाला ...

दोन भिन्न व्यक्तिंमध्ये हवा किमान एकतरी समान धागा ...
जो महान कट्टर-शत्रूंमध्येही निर्माण करतो घनिष्ठ मित्रता ...!

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

































Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "