कविता - 🌷 "निरागस-जीव, इवले-इवले" तारिख - १८ में २०१७
कविता - 🌷 "निरागस-जीव, इवले-इवले"
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - गुरुवार, १८ मे २०१७
वाढदिवसाचा तो पूर्ण दिवसच अमितने,
व्यवस्थित आखणी करून, सुंदररितीने ...
साग्रसंगीत साजरा केला होता हिरीरीने ...
फारसा गवगवा नाही, उगीचचं स्तोमही नाही ...
एक अत्याधुनिक छानसा फोन
त्याने तिला आधीपासून देऊन,
तिच्या आवडीचे खास हेडफोन्स
असं बरंचसं काही आणलं होतं ...
अलास्का-टूरसाठी जास्त ऊबदार,
खास बनावटीच्या थर्मल्सची भैट,
ही तर अफलातून कल्पना त्याचीच ...
सरते शेवटी, रेड-वाईनची बॉटल
तोहफेपर "तोहफा" चौफेर भडीमार ...
अख्खा दिवसच भुर्रकन् उडून गेला ...
तिकडे राहूलने "संपूर्ण वॉर्डरोब नवा,
एकही ड्रेस चालणार नाही जुन्यातला" ...
असं निक्षून सांगितलेलं होतं तिला ...
"मदर्स डे"ला, लेकरांच्या प्रेमामुळे
तिला अतिशय भरून आलं होतं
तिचं अंतर-मन नितांत सुखावलं ...
आई होण्यातलं खरं सुख गवसलं ...
नऊ महिने ओटीपोटी, असलेले,
दोन निरागस-जीव, इवले-इवले ...
कधी एव्हढे मोठे, जाणते झाले,
तिला बिल्कुल नाही कधी कळले ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Comments
Post a Comment