कविता - 🌷 " असाही एक वाढ-दिवस " तारिख - १२ मे २०१७
कविता - 🌷 " असाही एक वाढ-दिवस "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - शुक्रवार, १२ मे २०१७
कितीही ठरवलं तरी सर्वच्या सर्व गोष्टी,
ठरलेल्या त्या-त्यावेळी होतीलच असं नाही ...
त्या जिद्दीनं तशा घडवून आणणं, वेगळं,
अन् सगळं आपोआप घडून येणं, निराळं ...
दोन्ही मध्ये अंतर आहे जमिन-अस्मानाचं ...
आपोआप सारं-काही जुळून घडण्यावरच,
तिचा नेहमीच, अधिकाधिक असायचा भर ...
झुकतं माप कायम अध्यात्मिक "अधिष्ठानावर" ...
तिच्या जरुरी-कामांची यादी तर लांबच लांब ...
ती लवकर संपायचं काही नव्हतं नामोनिशाण ...
उलटपक्षी हनुमानाच्या शेपटी-सारखी यादी,
दरेक दिवशी, खूप लांब वाढंतच जात होती ...
शेवटी चार डिसेंबरचा उगवला खास-दिवसही,
अन् मैत्रिणींच्या घोळक्यात, मजेत गेला जरी ...
तिचा हा पहिलावहिला असा होता वाढ-दिवस,
जो तिच्या प्राणप्रिय पिल्लांपासून, खूपखूप दूर ...
साजरा केला गेला होता, एकटिनं ओढून-ताणून ...
चेष्टा-मस्करीत, चेहर्यावर हसरा-मुखवटा चढवून ...
वाढदिवशी देहानं जरी, बिल्कुल मुंबापुरीतच होती,
केंव्हाच भुर्रकन उडून ती, मनानं रमली होती परदेशी ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Comments
Post a Comment