कविता 🌷 ' संत-महंतांची पारख ' तारिख - ६ डिसेंबर २०१६

कविता - 🌷 " संत-महंतांची पारख "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - ६ डिसेंबर २०१६

रसाळ ओघवती असे वाणी ...
भक्ति- रसाने परीपूर्ण गाणी ...
ओळखावा संत, तोची जनीं ...
त्याच्या, भाळी टिळा नसूनही ...!

सच्चा अनुभवी सज्जन ...
भावनापूर्ण त्याचं कथन ...
करीतसे सर्वां, मार्गदर्शन ...
ओळखू येई तो, गुरू-जन ...
त्यां, पायी खडावा नसूनही ...!

पर-स्त्रीचा करूनी पूर्ण सन्मान ...
तिज देई आई- बहिणीचा मान ...
न पाही डोळा, वर करून मान ...
ओळखावा, शिवछत्रपती महान ...
कमरेस भवानी-तलवार नसूनही ...!

अंतर्यामी संतुष्ट, सरळमार्गी, एकनिष्ठ ...
पर-धन पाहुनी, जरा न होतसे आकृष्ट ...
डोळे मिटून घेतसे, तंद्री लागे ध्यानस्थ ...
पै-पैका, सोनं-नाणं ज्यास वाटे नि:कृष्ट ...
साधू तोची ओळखावा, माथी जटा नसूनही !

निंदा-नालस्तीचा उलटाच होई प्रभाव ...
आनंदे नाचे, जणू स्तुतीचा झाला वर्षाव ...
अशी वल्ली ओळखावी, संत-पदा भूषवीं ...
जरी नसे टाळ हाती, गळा माळ नसूनही ...!

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆


































Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "