कविता - 🌷 " भक्त आणि भगवन्त " तारिख - ६ डिसेंबर २०१६

कविता - 🌷 " भक्त आणि भगवन्त "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - ६ डिसेंबर २०१६

भक्त जेव्हा संकटी ...
धावून येई जगजेठी ...
तुकोबा लिखीत अभंग ...
त्यानं ठेविले "अ-भंग "!

स्वतः जळात लपून ...
अभंग ठेविले जपून ...
न दिले त्यांना भिजून ... 
सांभाळ केला कसून !

संत-जनांसाठी, झडकरी ...
जळी-स्थळी- वास करी
अपार कष्ट करी मुरारी ...
माय-बाप, कुंज-बिहारी ...

घारीसारखे संपूर्ण लक्ष, भक्तांवर ठेवून ...
सर्व संकटे वरच्यावरच अलगद  झेलून ...

भक्तांना सदैव सांभाळले ...
त्यात जात-पात न पाहिले ...
लहान-थोर भेदाभेद न केले ...

रोहिदास भक्तासाठीच रंगविले चर्म ...
मदत करण्या भक्तां, केले हरेक कर्म ...

थोर ते भक्त, अन् महा-थोर भगवन्त ...
सहज ओळखू येती, साधू आणि संत ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆














Comments

Popular posts from this blog

कविता - 🌷 " परी या-सम-हा " तारिख - १० डिसेंबर २०१६

कविता 🌷 " एहसास "

Poem - 🌷 " Live in Alignment " Date - 31 March 2025