कविता - 🌷 " अखंड-अविरत " तारिख - गुरूवार, ३० मार्च २०१७
कविता - 🌷 " अखंड-अविरत "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - गुरूवार, ३० मार्च २०१७
वर्षा मागून वर्षं येतात, वर्षं जातात ...
नवे दिवस येतात अन् पुढे सरकतात ...
ॠतुचक्र नित्य-नेमानं चालंतंच राहतं ...
विनाकारण कंटाळा करतो तो, फक्त माणूस ...
पण निसर्ग हा कदापिही कुचराई नाही करत ...
जशी सागराची नित्य भरती-ओहोटी चालते ...
चंद्राच्या उदय-अस्तावर, अखंड अविरत होते ...
त्यात अजिबात टाळाटाळ नाही वा खंडही नाही
ऊन-पाऊस, झाडं-झुडुपं, वृक्ष-वेली, अवघी सृष्टि
काटेकोरपणे पाळतात त्यांची-त्यांची वेळापत्रकं
ॠतु नंतर ॠतु, आपापलं काम चोख बजावतात ...
झाडं बहरतात, पानगळीत पूर्णतः निष्पर्ण होतात !
वसंत-ॠतुच्या चाहूलीनं, पुन्हा एकदा निखरतात ...
पाना-फुलांनी-कळ्यांनी डवरुन अत्यानंदे डोलतात ...
पक्षांना प्रेमानं आसरा देत, घरटी-पिल्लं सांभाळतात ...
रणरणत्या उन्हात सावली करुन सर्वां विसावा देतात ...
सुसाट वा-या-पावसात-सारे आस-याला विसावतात
युगानुयुगं रहाटगाडग्यासम चालू आहे हाच जीवनक्रम
श्रेय सर्वस्वी, निसर्गदत्त शिस्तबद्धतेचे अविरत परिश्रम
ब्रह्म-देवानी सृष्टिची रचना केल्यानंतर,
झाली,१ अरब,९७ कोटी ४० लाख वर्षं ...
हा नियम अलिखित असूनही, अबाधित
मानाचा हा त्रिवार मुजरा, काटेकोर नियम-बद्धतेला ...
कोटि-कोटि प्रणाम त्या, चराचरातील निसर्ग-देवतेला ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🌅
Comments
Post a Comment