कविता - 🌷 " सोन्याहून पिवळं " तारिख - १७ में २०१७
कविता - 🌷 " सोन्याहून पिवळं "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - बुधवार, १७ मे २०१७
दरवर्षी मे महिन्याचा रविवार येतो,
हुरहुर लावून "मदर्स डे" घेऊन येतो
यावर्षीचा रविवार खरंच खास होता ...
जशी आई बाळांचे लाड पुरवते
अगदि तशाच-धर्तीवर लाड केले,
मदर्स-डेला, अमित बाळाने त
अजूनी बाळ आईची डिट्टो काँपी करतं
नीट-लिस्ट बनवून,त्यावर अंमल करतं
सर्वात प्रथम भेट दिली -सिडनी-फिश-मार्केट ...
हे ठिकाण जगप्रसिद्ध ...
त्यामुळे टूरीस्ट लोकांचा, प्रचंड खच-भरपूर खाऊन, घरी पार्सल न्यायचं
गेल्या टूरमधे, राहीलं होतं तेथे जायचं आपल्याकडे बघायलाही न मिळणारे
"जेम्स बाँड मुव्हीत" पाहिल्याप्रमाणे, वइंग्लीश कथा-कादंबरीत,वर्णन केलेले,
ऊत्तम प्रकारचे,ताजे, खूप मोठ्या आकाराचे
जसे आपणास हवे तसे-बनवून,गरमा
त्यात भुर भुर पावसाने, अजूनच रंग भरले होते ...
त्यानंतर ट्रेन-ट्रँवल करून,मस्त
" सर्क्युलर की " च गाठली थेट ...
सगळे टूरिस्ट, तेथे जग-भरातले, गोळा होऊन,फोटोमधे होते रमले ...
त्या एकाच ठिकाणी, वर्ल्ड फेमस, सिडनी ब्रिज,सिडनी-ऑपराहाऊस
आणि सिडनी-बोटँनिकल गार्डन्स ...पुन:प्रत्ययाचा निराळा,अनोखा हर्ष
सुंदर, स्वच्छ हवेचा तजेला, सागरकिनारा,एका-बाजूला ...
तर दुसरीकडे गारीगार,हिरवा ...हिरवळीचा मखमली गालीचा ...
पावलांसह,डोळ्यांनाही थंडावा
मैलोंन् -मैल पसरलेली सुरेखशी बाग, जणू स्वर्गीय वाटावा असा हा,भूभाग
निसर्ग-मानवी-कलेचा सर्वोत्तम संग पहाणारा थबकून, होऊन जातो दंग
त्यात भर म्हणून, घेऊन दिलं, चाँकलेट-आईसक्रीम भलंमोठ्ठं, श्
आस्वाद घेताना, कौतुकामुळं आईला झालं, , सोन्याहून पिवळं ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🌅🕉🌷🙏
Comments
Post a Comment