कविता - 🌷 " आनंदाचा कंद " तारिख - १५ डिसेंबर २०१६

कविता - 🌷 " आनंदाचा कंद "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - १५ डिसेंबर २०१६

क्षण आपणा मिळती ...
क्षण आपणा दिसती ...
क्षण क्षण मिसळुनी ...
आयुष्या ते उजळती ...

श्वास रोधून मनं झालं गं स्थिरं ...
श्वास सोडून मनं होतसे पसारं ...
श्वास-न्-श्वास मिळवूनं,
आयुष्याचं सुटतं गणितं ...

चित्त आनंदी, चित्त स्वच्छंदी ...
बागडे सर्वत्र, लेवुनिया धुंदी ...
चित्त डोलते गं, चित्त नाचते ...
इंद्रधनूच्या रंगामध्ये ते खेळते ...

बुद्धी तेज-कुशाग्र, बुद्धी-तल्लखं ...
ब्रह्मानंदी तल्लीन, परि ती चलाखं ...
ध्यास लागला, ध्यास धरिला ...
ईश्वराच्या चरणी, मोगरा वाहीला ...

स्वप्नं रंगीत, स्वप्नं संगीतं ...
स्वप्नं- स्वप्नातं येऊन,
डोळ्यां अति सुखावंतं ...

सूर सुरेल-मधुर, सूर-संगत-अमूर्त ...
सूरांमध्ये सूर मिसळून,
संगीत करी सार्थकं ...

जीव एकला, जीव आपला ...
जीवात जीव मिसळून,
तो आनंदाचा कंद झाला ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
















Comments

Popular posts from this blog

Poem - 🌷 " Live in Alignment " Date - 31 March 2025

कविता 🌷 " एहसास "

कविता - 🌷 " अनछुआ आसमां "