कविता - 🌷 "अद्वितीय, दिव्य रसायन " तारिख - १५ मे २०१७

कविता - 🌷 "अद्वितीय, दिव्य रसायन "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले 
तारिख - सोमवार, १५ मे २०१७ 

ती संमिश्र भाव-भावनांनी सजलेली ...
दोन मे ची अद्भूत अशी पहाट उगवली ...

एकीकडे,

भुर्रकन् उडून, अखेर पिल्लांकडे जाण्याचा
तो सुदिन, वास्तवात येऊन उभा ठाकलेला ...
यामुळे प्रचंड आनंद, मनोमनी होता दाटला ...

तर दुसरीकडे,

लग्न करून, शुभ-विवाहानंतरच्या अनंत ...
अत्यंत नाजुक, हळुवार आठवणी व क्षण ...

या सगळ्याला साक्षिदार असणार्या,
सुंदरशा या शुभ-शकुनी वास्तुला,
तिच्या हक्काच्या या "गृहलक्ष्मीला"...

आता मात्र बराच काळ मुकावं लागणार ...
देहानं दूरदेशी पण मन इथेच रेंगाळणार ...
'घर' म्हणून हीच वास्तु समोर साकारणार ...

तिचा प्रिय सुंदर निसर्ग, निगडीत या वास्तुशी  
फुल-झाडं, किचन-गार्डन जी तिने लावलेली ...
या वास्तुतील काऊ-चिऊ पोपट-मैनादी पक्षी ...

खूप हलकं वाटत होतं, जरुरी कामं पूर्ण झाली ...
तिने मना-पासून, आवडीने, सुशोभित केलेली
प्रत्येक गोष्ट, कोनाकोपरा अन् खोली-न्-खोली

या सर्वांना पाहताना डोळे भरून ...
तिचं हळवं मनही भरून आलेलं ...
साश्रू डोळ्यांपुढे सगळं चित्रं धुसर झालेलं ...

जुन्या वाँचमनला बोलावून घेऊन  ...
शेवटी मनाचा हिय्या करून,
सर्व कुंड्यातील झाडं, वेली छाटून ...

तळ-मजल्यावर, सगळ्या सुखरूपपणे नेऊन ठेवल्या 
काही-काही शेजारी-पाजारी यांच्यात वाटून टाकल्या ...

गॅलरी खिडक्या ग्रिल्स सर्व-काही रिकामं-रिकामं ...
सगळं काही साफ-सुथरं, एकदम रिक्त-आोकंबोकं  
शून्य नजरेनं त्याकडे बघताना, उगीचच विनाकारण

एक हलका-किंचितसा-विषण्णतेचा स्वर डोकावला 
तत्क्षणी आभास मनी अत्यंत अनमोल ठेवा हरवल्याचा 

" मानवी-मन " हे एक, असंच विलक्षण
अत्यंत महान, अद्वितीय, दिव्य रसायन  
ज्याचा थांग लावणं, महा-कर्म-कठीण ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले 
🙏🕉️🔆















Comments

Popular posts from this blog

कविता - 🌷 " परी या-सम-हा " तारिख - १० डिसेंबर २०१६

कविता 🌷 " एहसास "

Poem - 🌷 " Live in Alignment " Date - 31 March 2025