कविता : 🌷 ' शब्दांजली ' तारिख - ७ फेब्रुवारी २०२३

कविता : 🌷 ' शब्दांजली '
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : ७ फेब्रुवारी २०२३
वेळ : ८ वाजून २० मि.

श्रुतीन्-श्रुती का बरं आज रुसली ?
साक्षात् सरस्वती कुठं असेल लपली ?
सर्व रसिक मंडळीं झाली रडवेली ...
गान-कोकीळा हे जग सोडून गेली !

अवघं विश्वच जणू काही पोरकं झालंय् 
सुरांविना शब्दही फिके, एकाकी झालेत !
सुरात्मा गेला आता उरली फक्त पोकळी, 
हिंदवी गान-कोकीळा हे जग सोडून गेली 

घरादाराचा भार, 'गात-गात' पेलणारी
साधं-सरळ-हसरं व्यक्तीमत्व असलेली
असामान्य कर्तृत्वाने दीपवून टाकणारी 
लाडकी कोकीळ-कंठी अंतर्धान पावली !

सुरेल आवाजाने काळीज छेदणारी
संपूर्ण जगाची, 'लता-दीदी' असलेली,
देवादिकांना रिझविण्या सम्राज्ञी गेली,
आपली गान-कोकीळा अजरामर झाली !
आपली गान-कोकीळा अजरामर झाली !

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
















Comments

Popular posts from this blog

कविता - 🌷 " परी या-सम-हा " तारिख - १० डिसेंबर २०१६

कविता 🌷 " एहसास "

Poem - 🌷 " Live in Alignment " Date - 31 March 2025