कविता 🌷' अंतरंग -बहिरंग '
कविता - 🌷 " अंतरंग - बहीरंग "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - २ डिसेंम्बर २०१६
अख्खं जगच भूलतं बाह्य-स्वरूपावर ...
पण बहीरंग असू शकतं फसवं अनावर ...
मीठ अन् साखर ...दोन्ही रंगांनं पांढरं
एकाची चव मधुर ...एक मात्र वाटे खारं
दूधही असतं पांढरं ...पण त्याचं तंत्रच न्यारं
चवीला लागे खासे-खास ...तब्बेतीसाठी असे झकास ...
दिसायला पण असे, सुंदर ...पोषण-तत्वं,असती भरपूर ...
ऊस जरी बाह्यरूपी वाकडा-त्याचा रस मात्र,मधाळ-गोडा
धनुष्याचा आकार जरी वाकडा, त्यातून सुटलेला बाण नसे वाकडा ...
अचूक नेमानुसार वेध तो घेई, न जाई वाकडा-तिकडा ...
नदी वाहते सागराच्या दिशेनं-वाट सापडेल तशी घेत, नागमोडी वळणं
तिचं अंतरंग म्हणजे जलं-अथवा जीवन ...गोड असतं अमृता-समानं
कोकणचा खास मेवा-फणस-बाहेरून असतो काटेरी ...
पण अंतरी, गऱ्यांची माधुरी-चकितच करी सर्वतोपरी ...
त्याच्या,अंतरंगाची ही थोरी ...
अननसाला बाहेरुन, काटेच काटे-मधुर रसाचे, अंतरंगात झरे फुटे
एक असे गोड-लिंबू ...अन दूजे कडू- लिंबू ...
गोड-लिंबू पेक्षा,अधिक...कडू- लिंबू खूप उपयुक्त ...
त्यात,आहेतऔषधी कैक अन् कित्येक गुण-तत्वं ...
जरी बाहेरुन खडबडीत कारले, चवीनंही कडू-कडू जरी असले ...
औषधी गुण, खूपच त्यात भरले ...नुसतं बाह्य रंग-रूप पाहू नये ...
अन त्यावर उगाच भाळू नये ...
अंतरी डोकावल्यावर ...खरा भाव दिसल्यावर ...खरी,प्रचिती घेतल्यावर ...
मगच उमगते कोण कसे ...वेळ आली की समजते ...कोण चांगले की वाईट ते ...
फशी पडू नये बाह्य-आवरणा ...अंतरंगी असती कळा-नाना ...
काळा- गोरा असतो कातडीचा रंग ...तो नाहीच महत्वाचा ...
निर्मळ-अंत:करणी, नको काळं-बेरं-मनाचा रंग महत्वाचा ...!
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Comments
Post a Comment