कविता 🌷 ' गरुडाची झुंज ' तारिख - ११ डिसेंबर २०१६

कविता - 🌷 " गरुडाची झुंज " 
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - ११ डिसेंबर २०१६

गरुड, श्रीविष्णूंचं लाडकं वाहन ...
मोठं डोकं, पक्षी असून बुद्धिमान 
दूरची दृष्टी-तीक्ष्ण नजरेचं वरदान ...

आकाराने, वजनाने मोठा-गरुड हाच पक्षांचा राजा
संपूर्ण आकाशात त्याच्या करारनाम्यांचा गाजावाजा 

अंगात शक्ति, ताकदीचा जोरवरचढ म्हणून, होतो शिरजोर
सर्वत्र त्याचा भयंकर दरारा लहान-थोर-पक्ष्या-प्राण्यांवर
साप, कासव, माकडं पकडून, भर्रकन घेतो भरारी उंचा-वर ...

त्याच्या अंगात दांडगी-शक्ति - मोठया पंखामध्ये प्रचंड गती ...
उंचीचं त्यास खास आकर्षण-अन्य पक्षांहून मोठी आकारमिती 

मोठे टपोरे डोळे, अत्यंत तीक्ष्ण नजर, उंचावरूनच हेरतो " गाफील " सावज,
संपवतो त्याचं आव्हान, अचानक घालून जीवघेणी झडप ...
घिरट्या मारतो पंज्यांत भक्ष्याला उचलून,
अणकुचीदार चोचीनं, मग समाचार घेऊन ...
फडशाच पाडतो त्याचा, खूप उंचावर नेऊन ...

उंचच उंच डोंगरी ...कड्या अन् कपारी,
शोधून, बांधतो घरटी-उंच उंच झाडांवरी
भन्नाट वाऱ्यावर होऊन स्वार, सुसाट वेगात उडे नभी 
बघता-बघता त्याच्या वयाची, भरारीत उडून जाते चाळीशी ...

म्हातार-पणाचे लागतात मग वेध-सगळ्या गोष्टीत करु लागे धडपड
" भक्ष्य "मिळवणं होऊन जातं जड, भराऱ्या मारणंसुध्दा होतं अवघड ...

कमी- कमी होतं जातं, पंखातील बळ-पाय व पंज्यांची पक्कड होते सैल
उंच उडणं तर उरतो भूतकाळातील एक खेळ
जातं निसटून, कसेबसे सापडलेलं सावज ...
अणकुचीदार चोचीचं टोक पण होतं बोथट ...

एकेकाळच्या आभाळाच्या राजाचा, दरारा लागतो हळू-हळू ढासळायला
जीवन जगणंच होऊन बसतं कठीण, म्हातारं-पण लागतं नकोसं वाटायला  ...

शेवटी निर्णय होतो त्याचा पक्का, पिल्लावळ बघे टकामंका ...
त्यासर्वांचा घेतो साश्रु-निरोप, अन् जमेल तसे उडत- उडत
जागा करून,कड्या-कपारीत...गाठतो, उंचीच्या डोंगराचं टोक
जुनी चोच आपटून-आपटूनतोडून-मोडून, चक्काचूर करून

मनाचा हिय्या करून, देतो एकदाची फेकून
स्वतः,रक्त-बंबाळ होऊन, वेदना अपार सहन करुन
देतो भूतकाळ लांब फेकून-हे मोडणं, तोडणं, फेकणं
सर्व क्रिया पूर्ण करताना, खाणं-पिणं, मौज-मजा करणं,
सारं-काही एकदमच पूर्णपणे बंद ...

चोचीनंतर नंबर असतो जुन्या, शिणलेल्या, कमजोर-पंखांचा ...
नाकी दम येतो, त्यांनाही ओरबाडून, उपटून, काढता- काढता  ...

अखेरीस गरुडाची सत्व-परिक्षा एकदा संपते ...
जुनं समूळ गेल्यावर, नव-पर्वाची सुरवात होते ...
नवीन कोरी, अणकुचीदार चोच, पुन: येऊ लागते ...
नवे दमदार, भरारी घेणारे पंख फुटण्यास सुरवात होते ...
हांहां म्हणता, गरुडाचं नवं-विश्व जुन्या-मधून-पुन्हा उभं होतं 

सरते शेवटी गरूड, शून्यातून नवं विश्वं उभारतो !
उंच उंच भरारी घेत, स्वतः पुनर्निर्मिती करु शकतो,
त्याच्या नेहमीच्या डौलात अन् दिमाखात वावरतो,
अजून तीस वर्षे गगनी अधिराज्य गाजवू शकतो ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
















Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "