कविता - 🌷 ‘ गढूळ ‘ तारिख - १६ सप्टेंबर २०१९
कविता - 🌷 ‘ गढूळ ‘
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेलेतारीख - सोमवार, १६ सप्टेंबर २०१९
जाणीवा बोथट झाल्या तरी,
सल काही केल्या जात नाही ...
अदृश्य जखमा संपल्यावरही,
वेदना काही थांबत नाहीत ...
आनंददायी मस्त-मनालाही,
चरे पाडणारे सोडंत नाहीत ...
वाहणाऱ्या स्वच्छ पाण्यालाही,
गढूळ होण्यातून सुटका नाही ...
मुकामार दिसत नसला तरी,
ठणका पाठ काही सोडत नाही ...
नशिबाचे फासे खासे असूनही,
सोंगट्यांकडून घात थांबत नाही ...
एका छताखाली रहात असूनही,
दोन-मनांतील अंतर संपत नाही ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Comments
Post a Comment