Posts

Showing posts from October, 2023

कविता - 🌷 ' सिलसिला खुशियों का '

कविता - 🌷 " सिलसिला खुशियों का "  कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले    तारिख - २८ नोव्हेंबर २०१६ पाहायला गेलो तर शेवटी प्रत्येकाचं, आयुष्य जातं विशिष्ट चाकोरीतूनच  ... एक ठराविकच जीवन-क्रम असतो ... दिवस, आखलेल्या चालीनंच जातो ... मग प्रत्येक दिवसाचा चेहरा-मोहरा,  का भासतो नवा-आगळा-वेगळासा ?  एक अख्खा-दिवस असतो प्रचंड मोठा  त्यात लपलेला-अगणित क्षणांचा साठा ! पहाट, सकाळ, दुपार, सायंकाळ, रात्र  दिनक्रम म्हणजे, शेवटी नैसर्गिक-सत्र ... खंड नाही त्यात, अखंड चाले अहोरात्र  हर्षाची चाहूल होता रोमांचित गात्र-गात्र खरा आनंद मिळवायचा असेल तर ... तो आधी, थोडासा "वाटायला" हवा ... "वाटल्यावरच" होतो तो द्विगुणित, अन् पुढे वाढत जातो कैक-पटीत ...! एखाद्याच्या-वाट्याचा इवलासा हिस्सा, व्यापून टाकू शकतो, अवघ्या-विश्वा ...! एक आनंद, दुसऱ्यास काही "देण्याचा"... एक आनंद, दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा ...! एक आनंद, स्व-मध्ये फुटलेल्या पाझराचा ... सर्व आनंद मिसळून, झालेल्या गोळा-बेरजेचा ! या सगळ्याचा क्लिष्ट हिशोब, कुणी बरं ठेवायचा ? उमलत्या फुलांचा दरवळणारा सुगंध, कुणा रोखत...

कविता -🌷 " अपेक्षाओं का दायरा ". तारिख - २१ नोव्हेंबर २०१६

कविता -🌷 " अपेक्षाओं का दायरा ".   कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - २१ नोव्हेंबर २०१६ हम हरदम हर-एक से  और हमेशा, हर चीज से  खूब अपेक्षाएं हैं रखते ... अपेक्षा रखना कोई बुरी बात तो नहीं ,  लेकिन सिर्फ एकतरफा सोचना, ... अवास्तव अपेक्षाएं बोझ बनकर,  रिश्तों मे दरार डालें, यह अच्छी बात नही अपनी माँ सें सदा,   "समझ" लेने की अपेक्षा चाहे कुछ भी हो दायरा- ममता बरसाने की अपेक्षा ... अपने जन्मदाता-पितासे,   सदा सहारे की अपेक्षा ... सहारा, चाहे हो शब्दों का सहारा, चाहे हो "अर्थ "का ... या फ़िर उनकी प्रॉपर्टीज का ... अपने बडे भाई से अपेक्षा,  सदा प्यार और भाई-चारा ... बचपन का याद रखना,   हर छोटा-बडा वाकया, हर-एक, प्यार-भरा लम्हा ... अपने छोटे भाई से अपेक्षा,  स्वयं का हरएक लब्ज, मान कर आज्ञा पालन करना, बर्ताव को रखना सदा - प्यार- मुहब्बत-अदब से-आनंदभरा ... अपनी बडी बहन से अपेक्षा ... माँ-जैसी उस की लगती मुरत मन का लगाव भी हो माँ-जैसा ... गलतीको चुटकीमें माफ़ कर, सदा अपनाए सहनशिलता ... अपनी छोटी- बहन से अपेक्षा ... बच्ची-जैसा चाल-चलन,...

कविता - 🌷" सुवर्ण-संधी " तारिख - २२ नोव्हेंबर २०१६

कविता - 🌷 " सुवर्ण-संधी " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - २२ नोव्हेंबर २०१६ सदा मोहोजाळ घालूनी वेटोळे ... अंगा वेढूनीया बसे, हेही न कळे ... अळू-पानासम जर मन असे तृप्त ... पाण्याच्या थेंबापरि राही, अलिप्त ... अतृप्तीच सर्वं वासनांचं खरं तर मूळ ... दुःखी-कष्टी करी जीवा, लावूनी खूळ ... बिलगून बसे मुंगी जशी, न सोडी गूळ ... मन-अधीन भरकटे, होऊनी दिशाभूल ... या अज्ञानाची असती अगणित झापडं ... मति-मंद, होई बंद, डोळे उघडे सताडं ... बुध्दी-भ्रष्ट-वागणं-बोलणं-करणं, बेबंद ... चुकीच्या जागी, मग शोधीत बसे आनंद ... अंतर्यामी बाळगून फुकाचाच उग्र दर्प ... महा-भयंकर फुत्कार मारी विषारी सर्प ... पापं करून-सवरूनही, करीतसे शंखं ... नेमकी संधी साधून हमखास मारी डंखं ... जमवल्या पापांच्या अगणित अशा राशी ... उन्मत्तपणा भरीस-भर, होताच तो राशी ... आता कितीही मोठी जरी झाली उपरती ... येणं शक्य नाही परत, निसटून गेली रेती ... सरळ-मार्गी जीवांना पडे, अति-संभ्रम ... न कळे, नेमकं काय करावे, होई विभ्रम ... मुजोर जीव मात्र सोकावें, बनूनी बेशर्म ... सोडी पूर्णच ताळतंत्र, लाज अन् शरम ... पापं करण्याचं पण ल...

कविता - 🌷 " अंतर्-गाभाऱ्यात " तारिख - मंगळवार, ७ फेब्रुवारी २०१७

कविता - 🌷 " अंतर्-गाभाऱ्यात "    कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले  तारिख - मंगळवार, ७ फेब्रुवारी २०१७ अगणित छोट्या-छोट्या गोष्टी ... अगदी लहान- सहान अतिसूक्ष्म-कृती ... विनासायास, अलगद, आपोआप, सहज ... क्षणार्धात पोहोचतात त्या विधात्यापर्यंत, नक्की ... तो पण देतो त्याची पोच-पावती ... विविध-रूपांनी, भिन्न-भिन्न अलौकिक रीतींनी ... श्वास रोधून, डोळे विस्फारून मंत्रमुग्ध करणा-या सृष्टी-सौंदर्यानी झाडांच्या हलक्याश्या, सळसळीतून ... पक्षांच्या कर्ण-मधुर जादूई किलबिलीतून ... सूर्याच्या सोनेरी, कोवळ्या-कोवळ्या उन्हातून ... उगीच अंगभर पसरणाऱ्या हलक्याशा-गोड शिरशिरीतून ... मोहक निरागस हास्यातून ... आकाशाच्या गर्द निळाईतून ... झुळकीबरोबर डोलणाऱ्या, वेलींतून ... उमलणाऱ्या फुलांच्या, दरवळणाऱ्या सुगंधातून ... चंद्र-चांदण्यांच्या आकर्षक लुकलुकण्यातून ... बी मधून बाहेर फुटणाऱ्या, अंकूरातून ... सूर्याच्या उगवण्या-मावळण्यातून ... हिमाच्छादित पर्वत-रांगांतून ... डौलात वाहणाऱ्या नद्यांमधून ... धबधब्याच्या कोसळणाऱ्या शुभ्र जलातून ... डोहाच्या सखोल, संथ-संयत अचल स्थिरतेतून ... देहात नखशिखांत झंक...

कविता -🌷 ll" ओजस्वी विचार-सरणी "ll

कविता -🌷 ll" ओजस्वी विचार-सरणी "ll कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - १३ जानेवारी २०१७ स्वामी विवेकानंदांचा १५३ वा,वाढ-दिवस, १२ जानेवारी, हा आहे त्यांचा,जन्म-दिवस, तो, साजरा करतात,नॅशनल-यूथ-डे म्हणून उत्तम,छाप पाडणारं,उमदं असं व्यक्तिमत्वं, इंग्रजी, बांगला,हिंदी,भाषांवर प्रचंड प्रभूत्वं ... बुद्धिचं प्रखर तेज रामकृष्णांचं पट्ट-शिष्यत्व  एकमेव-अद्वितीय-अशी, उदंडं- स्मरण-शक्ति त्यांना प्रिय,होतं इंग्लिश-लिटरेचर,फिलॉसॉफी ओजस्वी विचार-सरणी, नीटसर केली मांडणी  पेंटर-कवी-गायक-वक्ता म्हणून उत्कृष्ट कामगिरी  या सगळ्या गोष्टींचं समीकरणं म्हणजे स्वामी विवेकानंद  त्यांचं मूळ नाव नरेन्द्रनाथ दत्ता वडिलोपार्जित-होती सुबत्ता भाषणात त्यांचं व्यक्तिमत्व, अन् सडेतोड विचार-मांडणं, विषयाचा सखोल अभ्यास अवाक करेल,असं वाक-चातुर्य  होऊन मंत्र-मुग्ध, प्रेक्षक-वर्ग तासंतास खिळून राही ऐकत ... प्रेक्षक-वर्ग, कोलकाताचा असो, मुंबापुरीचा किंवा शिकागोचा  असो जगातील कोणत्याही देशाचा, प्रांताचा, जातींचा-धर्माचा  संपूर्ण व्यासपीठ काबीज करुन, मुद्देसूद बोलत त्यांचं भाषण  हातोट...

कविता - 🌷 " अभूत-पूर्व जोडी "

कविता - 🌷 " अभूत-पूर्व जोडी "          कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - बुधवार, ८ मार्च २०१७ राधे शिवाय कृष्ण अधूरा ... शक्ति शिवाय शिव अपूरा ... सीते शिवाय राम अधूरा ... लक्ष्मीविना विष्णू अपूरा ... सृष्टी शिवाय विश्वाला नाही पूर्णत्वं ... नारी शिवाय नरास नाहीच पूर्णत्वं ... अवघ्या विश्वाचा गाडा, आहे अधूरा अन अपूरा ... रथ हा, त्या जगन्नाथाचा ... हलतो, डुलतो, चालतो दिवस अन् रात्र, या जोडीच्या शक्ति-युक्ति आणि बुध्दिनं ... जगन्नाथाच्या गाड्याची ... ही अभूतपूर्व अशी जोडी ... एकमेकां शिवाय दोघेही ...  सर्वथा अधूरी अन् अपूरी ...  🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🌅

कविता - 🌷 " विचार-मंथन "

कविता - 🌷 " विचार-मंथन "... कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले  तारिख - शुक्रवार, ८ सप्टेंबर २०१७ विसरणं कठीण आहे ते डोळे वटारून बघणं खोड्या करणार्यांना खडू नेम धरून मारणं खोडसाळ विद्यार्थ्याला पट्टीने चोपून काढणं  गृहपाठ न केल्यास, ओणवं धरुन उभं ठेवणं कविता पाठ नसली तर वर्गाच्या बाहेर काढणं गलका झालाच तर डस्टर टेबलावर आपटणं त्यांच्या सेंडॉफच्या दिवशीचं त्यांचं गहिवरणं सगळं काही  मनापासून, त्यात दिखावा नसणं आत्तासारखं फक्त वरवरचं,  बेगडी असं काहीच नव्हतं, सगळं कसं स्वच्छ, पारदर्शक  वावच नव्हता दिखाऊपणास  सर्व शिक्षक अन् विद्यार्थी-वर्ग साधे-सरळ, ध्येयानं भारलेले ... आज जर का मागे वळून पाहिले, तर समजेल नक्की काय हरवले  सरळसोट विचार, संस्कार  आज किती दुर्लभ झालेत ... या स्वार्थी बाजारू जगात, आज किती दुर्मिळ झालेत ... त्यांची कमतरता या जगतीं,  कशी होणार सांगा भरपाई ? जाणीव होतेय, फिर-फिरूनी सुदैवे लाभलेल्या त्या छत्राची ... त्या आदर्श शिक्षकांची स्मृति  पूर्वपुण्याईची ही ईश्वरी नाती शिक्षक-दिन साजरा करतानाचं विचार-मंथन   सगळ्या शिक...

कविता - 🌷 " तेंव्हाच सार्थकी लागे ही निर्मिती "

कविता - 🌷 " तेंव्हाच सार्थकी लागे ही निर्मिती " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - ३ सप्टेंबर २०१६ विधात्याने केले माणसाला निर्माण, पूर्ण असूद्या या एका गोष्टीची जाण... मन म्हणजे गुण-दोषांची आहे खाण, कुणी नसे मोठा व कुणीही नसे सान  प्रत्येक अवयव असतोच महत्वाचा... त्याचं कार्य, भागच ईश्वरी योजनेचा... एव्हढसं पोट, पण फुकाचा गाजावाजा... इवलीशी जीभ, पण सततची  तोंड-पूजा... नियम एकच आखून दिलेला, भुके इतकाच घास असतो दिलेला... अति अधीन झाल्यास घात आहेच ठरलेला... भूकेला मूठभर कोंडा अन् धोंडा हवा निजेला... वरती आभाळी जर असेल चांदणं... तर संताना होई जणू गगन थेंगणं... आता कसलं पुन्हा जाणं अन येणं... प्रभूपदी सर्वतोपरी एकरुप होणं... जन-निंदा असे ती क्षणभंगुर,  महत्व न देता दुर्लक्षावी जरूर... न ठेंवावा दुराभिमान वा गुरूर... कोणत्याही कारणे न व्हावे मगरुर... आपणच ठरवावे योग्य जीवन-सार... चालत रहावे अथक योजनं अपरंपार... आत्मानन्दास मग न उरेल पारावार... सर्वत्र मग 🕉कार नादब्रह्म ओंकार... आधी करूनी नेटकासा संसार... साथीला असावे सद-आचार-विचार... नाही मग उणे त्या सज्जनास फार... विचार...

कविता - 🌷 " बाल-विश्व "

कविता - 🌷 " बाल-विश्व " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख २२ सप्टेंबर २०१६ आपल्याला वाटतं, बिचारी लहान मुलं ... पण अगदी काही साधं-सुधं काम  नसतं ... त्यांचं सुद्धा एक खास बाल-विश्व असतं ... त्यांच्या आई-भोवतालीच, ते विश्व फिरतं ... त्या विश्वात चुकून जरी कोणी केला हस्तक्षेप, त्यावर त्यांच्यापरीने, त्यांचं "प्लॅनिंग" ही असतं ... ही गोष्ट सुरु"मिरजे"पासून, जिथं हे सर्वच घडलं  विश्वास नसेल बसत, तर मग पहा आता गंमत ... अस्मादिक घरचा "लाडोबा," कारण शेंडेफळ  बिल्कुल "टॅन्ट्रम्स" शिवायच, मनासारखं सगळं ... बालपण एकूण लाडाकोडात सुरळीत चाललेलं ... पाहुणीच्या येण्यानं कौतुक थोडं घटू  होतं  लागलं ! हां-हां म्हणता मग पालटू लागलं चित्र ... घरी आलेली आत्ते-भाची होती विचित्र ... जन्मापासूनच आईचं नव्हतं तिला छत्र ... आईविना-पोर-म्हणून, मामीकडे सुपूर्त ... तिची मामी म्हणजे, माझी आई ... आईची वाटणी मला मंजूर नाही ... माझ्या बालबुद्धीने काही प्रयत्न केले ... आता मात्र वाटतं ते फार "बालिश"होते ... पाहुणी म्हणून ४/५ दिवस ठीक होतं ... पण तिला माझ्...

कविता - 🌷 ll " तथास्तु " ll

कविता - 🌷 ll " तथास्तु " ll कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - १२ जानेवारी २०१७ जीवनातील सुंदरशी ती शिकवण, अशाप्रकारे मिळता, मन आनंदलं  अनामिक-अनुभूतीनं, प्रसन्न झालं ... आधी फुल-वाल्याला विचारुन ठेवलेलं  " येथे सात्विक-अन्न, कोठेसं मिळेल? " गेलो त्यानं सांगितलेल्या,भाटिया- लॉजला  स्वच्छ पण छोटेखानी,धाब्याटाईपची जागा प्रवेश-द्वाराजवळ,एक वयस्क गृहस्थ उभे होते, आम्हाला पाहून,शुभ-आशीष वरदहस्ताने दिले शिर्डीभर सर्वत्र मागणारे हातच दिसले होते, हे गृहस्थ,काही न मागता,दुवा मात्र देत होते  सहजपणे मी त्यांना म्हटलं,   " बाबा, कुछ खाओगे ? " उत्तराची वाट न पाहता,  रेस्टॉरंटच्या मालकाला, सांगीतलं," या बाबांना  व आमच्या मामा ड्रायवरला, जे जे हवंय ते सर्व द्या   पण   बिल, माझ्या बिलात टाका "   सर्वांचं व्यवस्थित खाऊन झाल्यावर,   स्वादिष्ट-सात्विक पदार्थांवर ताव मारून, मालकाला"शुक्रियां" बोलून बिल भरून,  जात असताना, तो मालक म्हणाला, मॅडम, यह बंदा यहां हररोज है होता,   कई सालोंसे हम सबने उसे है देखा ... पर आज तक कभी, अंदर नहीं आया -...

कविता -🌷 " सु-संस्कारांचं सिंचन " ३० डिसेंबर २०१६

कविता -🌷 " सु-संस्कारांचं सिंचन "    कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले   तारिख - ३० डिसेंबर २०१६ खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही-  आमच्या शाळेच्या हेड-मास्तरांनी, विद्यार्थ्याना "प्रोत्साहित" करण्याची,   एकमेव अभिनव-शक्कल लढविली  ८० टक्के-गुण मिळताच नावाची-पाटी शाळेच्या भिंतीवर कायमस्वरूपी  प्रत्येक इयत्तेतील पहिल्या पाच क्रमांकाची, त्यामुळे चांगलीच चुरस  विद्यार्थ्यात  लागलेली  की कोण ही अट पूर्ण करणार सर्वांत आधी ...  ही चुरस मात्र फारच निकोप स्वरूपाची होती  "भिंतीवर नाव-लागणे" याचा खरा अर्थ-काय,  हे समजण्याचं वय नसलं तरी ते महत्वाचं आहे,  एवढं बाकी अस्मादिकांना नक्की समजलं होतं,  शिवाय वर्ग-शिक्षकांचंही माझ्यावरंच लक्ष होतं !   त्यांच्या सगळ्या-आशा माझ्यावर होत्या केंद्रित  त्यांची मी "आवडती" असं सगळ्यांना वाटायचं  आईच्या कृपा-आशीर्वादाने-कर्मधर्म-संयोगाने, त्या वर्षीच्या वार्षिक परीक्षेत, मिळाले ८६ टक्के ! त्यामुळे माझ्या नावाची ठळक लाकडी-पाटी,  लिहून-रंगवून  खूप उत्साहात तयार ...

कविता - 🌷 " या लोभस वळणावर "...

कविता - 🌷 " या लोभस वळणावर " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले  तारिख - गुरूवार, ४ मे २०१७ मन तुडुंब भरलं काठोकाठ ... बहुधा हीच ती पाऊल-वाट ... जणू स्वर्गातील ही सोन-पहाट ... आकंठ आनंद वाहतोय अफाट ... काहीबाही विचार नाही, चिंतेचाही लवलेश नाही ... निर्विचार, शांत अशा मनी, कसलाही, कल्लोळ नाही ... सर्वत्र निरव अशी शांतता, अंतर-बाह्य एक समानता  सुरेख, निळं-निळं आभाळ, जणू खुणावणारं मोहजाळ ... आयुष्याच्या या लोभस वळणावर, खुळं मन भान विसरुन सुखावणार ... 🌷@तिलोत्तमा विजय लेले  🙏🕉🔆

कविता - 🌷 " परिणीती आणि फलश्रुती " २९ डिसेंबर २०१६

कविता - 🌷 " परिणीती आणि फलश्रुती " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - २९ डिसेंबर २०१६ मुंबईत जसे गल्लो- गल्ली पान-वाले, तसे घरी येऊन देणारे,अंडी-पाववाले ... सायकलची घंटा किण-किण-वाजवंत, दिवसांतून किमान चार-पाच वेळा येत सोसायटीत चक्कर,त्यांच्या पोतडीत, अठरा- पगड गोष्टींचा भरणा घेऊन, तमाम गृहिणीना खूप खुश करतात  अगदी " चना-जोर गरम "पासून,अंड्यांपर्यंत, " सब-कुछ-अंडर- वन- रूफ "जादूनं मिळतं ... हल्ली," राजू " नावाचा हसरा चेहरा, अंडी-पाव घेऊन सोसायटीत यायचा ...  त्याचा प्रसन्न चेहरा छानच वाटायचा ... "भोनी करो"म्हणून पिच्छा,पूरवायचा ... "आपके हाथ लगनेसें सारा माल,   फटाफट होता है खत्म", म्हणत ... प्रत्येकास जणू हरभऱ्याच्या झाडावर चढवायचा ... एवढ्या लहान वयात,"मार्केटिंग स्किल"दाखवायचा ... घरी पाव- भाजीचा होता बेत,  म्हणून त्याला आधीच सांगून जास्तीचे "लादी-पाव" मागवून,   मग सुटकेचा निःश्वास टाकला  दुसऱ्या दिवशी सकाळी,  बेल मारून दरवाज्यात उभा राहिला ... दरवाजा उघडताच,नेहमीचा हसरा   चेहरा, होता लांब-लचक झालेला...

कविता - 🌷 " मदत-दाता "

कविता - 🌷 " मदत-दाता "  कवयित्री- तिलोत्तमा विजय लेले तारिख - १४ डिसेंबर २०१६ फ्रँकफर्टहून पॅरिसला गेलो होतो,  पॅरिसच्या मध्यवर्ती भागात आमचं वास्तव्य  सर्व प्रेक्षणीय स्थळं अगदी हाकेच्या अंतरावर  रोज फिरत-फिरत, तब्बेतीनं एकेक स्थळ सुशागात पाहणं  रेस्तराँमध्ये, काचेतून रस्त्याकडे बघत, मजेत खाणं-पिणं ! एकदम मस्त कार्यक्रम चालला होता मध्यंतरी फ्री-कुपॉन्स मिळाली आम्हाला  ती कधी वापरायची,प्रश्न "गहन"होता- प्लॅन "व्हर्साय-पॅलेस" ला जायचा ठरला  चक्क एका दगडात दोन-तीन पक्षी- फ्री-कुपॉन्सचा वापर निदान-पक्षी ! सर्वांनाच फ्री-गोष्ट एवढी प्रिय का- खास करून आम्हा,महिला-वर्गाला ! एक भला-मोठा न सुटणारा यक्ष-प्रश्न हा ... खरं म्हटलं तर,फ्री वगैरे काही मिळत नसतं,  त्या साऱ्या "मार्केटिंग-गिमिक्स" असतात  हे माहीत असूनही,फ्रीचा मोह,नाही आवरत ... सकाळी लवकर उठून,हेवी-ब्रंच करून,   आम्ही गेलो पॅरिसच्या मेट्रो स्टेशन-वर  कुपॉन्स वापरून गेलो प्लॅटफॉर्मवर,  पूर्ण स्टेशनभर फक्त फ्रेंच भाषेचा वापर ! लेखी वा बोली भाषा सगळीकडे फक्त एकच,  आमचं फ्रे...

कविता - 🌷 " मन-मोहक त्रिमूर्ती " १३ डिसेंबर २०१६

कविता - 🌷 " मन-मोहक त्रिमूर्ती "  कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले  तारिख - १३ डिसेंबर २०१६  मार्गशीर्ष महिना महत्वाचा व आनंदाचा  पौर्णिमेच्या शुभ- दिनी जन्म दत्तात्रेयाचा  अनुसूया आणि अत्री ऋषींच्या या,पुत्राचा  बाल- स्वरूपात जन्म घेणाऱ्या त्रिदेवांचा  ब्रह्मा-विष्णू-महेश यांचा हा विशेष अवतार  एकूण चोवीस गुरु केले लहान- पणापासून  प्रत्येकाकडून विशेष" ज्ञान "ग्रहण केले ... संपूर्ण चरा- चरात ऐच्छिक भ्रमण केले ... सजीव-निर्जीव दरेक वस्तू व वास्तुमध्ये, स्थित,एकच " आत्म-तत्व ", सिद्ध केले ... औदुुंबराच्या थंड छायेखाली ... शांत, मन-मोहक अशी,त्रिमूर्ती ... नेहमी त्यांच्या स- भोवताली ... कामधेनू व चार श्वान असती ... भक्तांचे मनोगत ओळखून ... दत्त-गुरु करतात तेच पूर्ण ... त्यांना जे मनोभावे पूजतात, त्या सर्वांना श्री दत्त,पावतात ... गाणगापूर येथे श्री दत्तात्रेयांची पाऊले ... स्पष्टपणे उमटलेली पाहण्यास मिळतात ... याच सुमारास, दत्त-गुरुनी अवधूत रुपात  कैक भूभाग संचारकरून,केला ज्ञान-प्रसार ... माहूर, गिरनार, कुरवपूर,कारंजा,पिठापूर औदुंबर, गाणगापूर...

कविता -🌷 " अध्यात्मिक- विचारांचा चष्मा " २५ नोव्हेंबर २०१६

कविता  -🌷 " अध्यात्मिक- विचारांचा चष्मा " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - २५ नोव्हेंबर २०१६ जसा चष्मा लावू, तशीच दिसेल दुनिया  नजरेत असेल प्रेम, अंतरी दाटेल माया भगभगित उन्हात, भासेल शितल छाया  क्षणन्-क्षण मोलाचा-न  कधी  जाई  वाया सर्वत्र जणू " वैकुंठ " वाटेल, वाळवंटी सुद्धा स्वर्ग भासेल ... बर्फाच्छादित कैलाश, जणू भाळी दिसेल निळाशार-शांत मानसरोवर स्वकंठी वसेल  विशाल मन दशदिशा विस्तारेल ज्यात संपूर्ण विश्वंच सामावेल ! देशप्रेमाबरोबर, विश्वप्रेम बरसेल दरेक कृतीतून भक्तिरस पाझरेल सृष्टीतील प्रत्येक जीव-जंतू-पशू-पक्षी-प्राणी, कोणत्याही रंगाचा वा आकाराचा,   उपद्रवी-निरुपद्रवी असला-नसला तरी कायम वाटेल "आपलेपणा"- एक-अदृश्य-समान-सूत्र "जिवंतपणा " ! त्या प्रत्येकाच्या डोळ्यांत तीच चमक प्रकटते, जी दरेक जीवंत-डोळ्याच्या बाहूलीतून दिसते काऊ-चिऊ-माऊ अन्य जीव कैक त्यांच्यातंलं " देखणेपण "जाणवतं त्यांना खूप काही समजतं- कळतं मनुजा ते कळण्या, योजनं लागतात अशा नाना नवं-जाणीवा होऊ लागतात सूक्ष्म-पातळीवर"आत्मतत्व" दिसू शकतं विराट-स्वरूपी...

कविता - 🌷 " मनं तुडुंब भरलंय " २३ नोव्हेंबर २०१६

कविता - 🌷 " मनं तुडुंब भरलंय " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - 23 नोव्हेंबर २०१६ कालचा दिवस काहीसा आगळा-वेगळा होता ... अपेक्षेनुरुप  "आज" क्षणा-क्षणांनी जात आहे उद्याचा सूर्य, शुभ-कारक सुखद असणार प्रत्येक क्षण नवा-कोरा-करकरीत असणार  सृष्टीचं काल-चक्र अविरत फिरतच राहणार ... स्वतःचा एक स्वतंत्र चेहरा-मोहरा घेऊन, त्याच्या आगळ्या-वेगळ्या अस्तित्वासह  शंभर टक्के तो खूप काही येणार घेऊन ! मी तीच, सूर्य तोच, निसर्ग सदा-बहार रमणीय ... कालचं झाकोळलेलं आभाळ पार नाहीसं झालं  कालचं गढूळ मन काही अंशी थोडंसं शांत झालं  स्वच्छ असा संधी-प्रकाश दाही दिशांना पसरलाय ... प्रत्येक क्षणी जसं सृष्टीचं रूप पालटत जातं ... क्षणो-क्षणी, आपलं भाव-विश्वं बदलंत जातं ! छानशा झोपेनंतर सगळं कसं ताज-तवांनं वाटतं  जसं,पावसाची सर पडून गेल्यावर वातावरण होतं दिवाळीच्या दिवसात,अभ्यंग-स्नान करून वाटतं, ताज्या-फराळावर ताव मारून, मस्त गप्पांत रमतं  झर- झर वाहणारा निर्झर ... झुळु-झुळू वाहणारं वारं ... सळ-सळ करणारी झाडं ... खळ- खळ वाहणारं जल ... सगळी नाद-दृश्य-चित्रं, मनास लावतात ओढ ... प...

कविता 🌷 ' कवयित्रीच्या नजरेतून '

कविता - ,🌷 " कवयित्रीच्या नजरेतून " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - १ जानेवारी २०१७ वेळ - दुपारी २ वाजता  "दशाननाला दहा शिर,   वीस हात व वीस पाय " या वर्णनाचा मतितार्थ भिन्न भिन्न रूपानं  दहा-डोकी असलेला, दसपट बुद्धिमान  वीस हात-पाय म्हणजे, दसपट बलवान  एकटा रावण ताकदीनं, दहांच्या समान ! फुलांच्या ऐवजी, रावणाने महादेव-आराधनेत, स्वतःचं एकेक शीर-कमल शंभोस अर्पण केलं ... त्याच्या,याकृतीचा प्रतिकात्मक स्वरूपाचा अर्थ, विद्वान-पांडित्य व बुद्धी-चातुर्यामुळं, रावणानं, मनं, बुद्धी, मानस, चित्त, अहंकार व  अंत:करण, या दश मनोदशांचा-वृत्तींचा केला-त्याग सं पूर्ण अपेक्षे-प्रमाणे  प्रकटले, देवाधिदेव  होऊन प्रसन्न ! महर्षी वेद-व्यास यांच्या प्राचीन 'रामायण'  या महा-काव्याचा खलनायक, हा रावण ... जितका रावण अहंकारी, त्या विरुद्ध सुशांत विनयशील राजकुमार श्रीराम  एकवचनी, एक-पत्नी, आज्ञा-धारक, सर्वांना आपलंसं करणारा, प्रभूश्रीराम  पालनकर्ता पुत्रधर्म-पतिधर्म-राजधर्माचा  सुशील ,  महा-पराक्रमी सुपुत्र कौसल्येचा  रावणाने ज्यांना अत्यं...

कविता 🌷 ' बाप्पाचं मनोगत ' ६ सप्टेंबर २०१६

कविता - 🌷 " बाप्पाचं मनोगत " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - ६ सप्टेंबर २०१६ प्रत्येक जण येतो,   मला सांकडं घालतो  कधी कोणी मणभर सोन्यानं ही मढवतो  तर कधी कोणी चांदीची ' तुला 'सुद्धा करतो ! जितके भक्त तितके नानाविध प्रकार ... कुणा एकीला हवा " नवलखा हार "  तर कुणाला हवी नवी, महागडी कार ... सारा येऊन जाऊन फक्त व्यवहार ... मी बाप्पाला हे देईन अन् ते देईन ... सुरुवात होते ती,  " मी  एक-भुक्त राहीन " अथवा " दिवसभर मी अगदी  उपाशी राहीन"  मग मजल जाते ती थेट, " मी निर्जळी करीन" ! हर एक जण म्हणतोय  " बाप्पा तू मला पाव " मग भले तो कोणीही असो,  रंक अथवा राव  अगदी असला जरी तो अट्टल  चोर अथवा साव  कोणताही असो त्यांचा प्रदेश, शहर अथवा गाव ... करतात धावा, " देवा धाव रे धाव "... कुणी नाही विचारत, " देवा, तुला काय हवं...." सहन करूनही महागाईचा बेसुमार भडीमार, प्रत्येक प्रसादात तेल, तूप अन साखरच फार ! का हो वाढविता तुमच्या-माझ्या तनुचा भार ? लोकल चुकल्यावर, बॉसला द्याल कारणं हजार नको वाह्यात नाचगाणी अन्  नको क...

कविता - 🌷 ' शब्द व त्यांचे सामर्थ्य '

कविता - 🌷" शब्द व त्यांचं सामर्थ्य " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले  तारिख - सोमवार, २३ जूलै २०१७  वेळ - दुपारी, १२ वाजून ४८ मि. शब्द जगता, आला पाहिजे ... भिष्माच्या प्रतिज्ञेसारखा ... शब्द जागवता, आला पाहिजे ... कर्णाच्या उदारतेसारखा ... शब्द फेकता, आले पाहिजेत ... कसलेल्या नटसम्राटासमान ... शब्द पाळता,  आले पाहिजेत ... एकलव्याच्या त्यागासमान ... शब्द-वैभव जोपासता  आले पाहिजे  स्वातंत्र्यवीर सावरकरांसमान ... शब्द फुलवता, आले पाहिजेत ... महाकवी कालिदासासमान ... शब्द-न्-शब्द गाता,  आला पाहिजे ... गान-कोकिळेसारखा ... शब्द पिसारता,  आले पाहिजेत ... मयुराच्या पिसा-यासमान ... शब्द-न्-शब्द भिडवता, आले पाहिजेत ... कुसुमाग्रजांच्या लेखणीसमान ... शब्द टोलवता,  आले पाहिजेत ... सचिनच्या षट्कारांसमान ... शब्द-न्-शब्द दरवळवता, आले पाहिजेत ... प्राजक्ताच्या सड्यासमान ... शब्द-न-शब्द जतन करता,  आले पाहिजेत ... बकुळीच्या फुलांसमान ... शब्द-ब्रह्म साकारता,  आलं पाहिजे महर्षि वेद-व्यासांसमान ... शब्द पथ-दर्शक,  झाले पाहिजेत ... अ...

कविता - 🌷 ' एहसास ' शनिवार, ९ सप्टेंबर २०१७

कविता - 🌷 " एहसास "... कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले  तारिख - शनिवार, ९ सप्टेंबर २०१७ समय - दोपहर १२ बजकर २० मि. यूँ अपनीही धूनमें, सागर-किनारे टहलनेका मझा ही कुछ और है ... समय कोई भी हो, चाहे दिन हो या रात हो ... मौजोंका नजारा, तन-मनको एकदमसे तरो-ताजा कर देता है ... नजर जहाँतक पहुँच पाये, दूर-दूर तक बस्स पानी ही पानी ... कभी हलके हरे, कभी भुरे नीले गगन की तरह ... आस्मान मानो पानीके साथ कुछ लुकाछुपी खेलता हुआ ... समुंदर हमे सीखाता है जीने का एक बिल्कुल नया अंदाज ... जब जैसा समय आये, जिंदगीका रुख बदलकर समयके अनुसार ढाँल देना ! अगर पवन जोरोंसे बहती हो, मौजोंको उपर उँचाई पर, उछाँल देना ... मानो निले-निले अंबरको छूँ लेनेकी दिलकी तमन्ना पूरी कर लेना ... ! जब मंद-मंद गति से हवाएँ चल रही हो,  तो स्वयं बिल्कुलही शांतीसे पेश आना ... चुपचाप से बहते रहना और अपनी ही " मौज "में बस्स " मस्त " रहना ...!!! जिंदगी भी कितनी हँसीन, दिलरुबा  जैसी है ... उसकी मात्र आहट भी, होटोंपर पलभरहीमें मुस्कान लाती है ... तो दूसरेही पल हसते-हसते आँखोंसे ओझल होकर, कुछ पागल-म...

कविता 🌷' मोल आणि अनमोल '

कविता - 🌷 " मोल आणि अनमोल " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले  तारिख - १३ सप्टेंबर २०१७ " दाम करी काम वेडया दाम करी काम...." प्रत्येक गोष्टीला "मोल" नक्की असतं, पण ती "अनमोल" असेलच असे नाही. आईची कूस, अनमोल ... तिने केलेलं संगोपन अनमोल... तिचे संस्कार बहुमोल ... तिचं ऋण, अनमोल ... याउलट पाळणाघर, जरूरीचं  अन् मोलाचंही ... पण ' मामला मात्र सोयीचा '... वडीलांचं छत्र कणखर, प्रेमळ व मजबूत ... चिमुकल्या हातात घट्ट पकडलेलं त्यांचं बोट, त्या इवल्याश्या जीवाला किती आश्वस्त करणारं ... एखाद्या काका-मामा-दादा याचा सहवास  मोलाचा, पण बाबांची सर त्यास खचितच नाही ... पोटाला चिमटा घेऊन, काटकसर करून, मुलांचं उच्च शिक्षण, त्यासाठी परदेशी गमन यासर्व गोष्टीचं " शिव-धनुष्य " पेलणं ... केवळ अनमोल, त्यास तोडच नाही ... त्याची सर, बँका-पतपेढ्या  यांच्या दसपट कर्जाला, कदापि येणे नाही ... वेळोवेळी आप्त-स्वकीय-मित्र-मैत्रिणींचं मार्गदर्शन जरी 'मोलाचं ' तरी  " वेळीच " पोट-तिडकीने दिलेला  जन्मदात्यांचा अनमोल सल्ला ... केवळ बहुमोल ... दुष्काळ-ग...

कविता 🌷- ' त्याला माणूस कधी म्हणू नये '

कविता - 🌷 " त्याला माणुस कधी म्हणू नये " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारीख- ७ सप्टेंबर २०१६ वेळी मदतीचा हात नाकारतो उलट, पायही खेचतो त्यास, सहयोगी कधी समजू नये ... दोघात भांडण लावून, लांबून मजा बघतो त्यास, मित्र कधीही म्हणू नये ... डोळ्यांवर पट्टी बांधून न्याय-निवाडा होतो त्यास, न्याय-देवता म्हणू नये ... अन्यायाकडे डोळेझाक  अन् गुन्ह्यांकडे करी पाठ त्यास,  न्यायाधीश कधी मानू नये ... मोठी मोठी वचनं देऊन गरीबांची करी दिशाभूल त्यास, पुढारी कधी म्हणू नये ... सेवेच्या नावाखाली स्वतःची तुंबडी भरतो त्यास, नेता कधी म्हणू नये ... बाया-बापड्यांना फसवतो दिशाहीन ही करतो त्यास, साधू कधी म्हणू नये ... देवा-धर्माच्या नावानं जो अराजक माजवतो त्यास, संत कधी म्हणू नये ... मुलीचा गर्भ मारून टाकते  त्या निर्दयी बाईस, माता कधी म्हणू नये ... हुंड्यासाठी सुनेला छळते, लोभांधाने जाळते अशा सासूला, स्त्री कधी म्हणू नये ... पैश्याच्या लोभापायी  अपार छळ करणाऱ्यास, पती कधी म्हणू नये ... पोटची पोरं विकणाऱ्या  निर्लज्ज, बेरड कसायास, बाप कधी म्हणू नये ... भोळ्या-भाबड्यांना लुटून  महाल-म...

तारिख - २५ सप्टेंबर २०१७ कविता - 🌷' विठ्या '

कवितेचं नाव - 🌷" विठ्या "... कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - २५ सप्टेंबर २०१७  वेळ - सायंकाळी ५ वाजून १८ मि. गाडेकरवर असताना,एक मनीमाऊ होती न पाळलेली असूनही, घराला धरुन होती पहाटे,मागच्या दरवाज्याशी खर्-खर्-खर् त्याचा परिणाम न झाल्यावर, गुर्-गुर्-गुर् आतूनच आई, " विठ्या, थांब थोडासा " त्यावर बाहेरून, अगदि अस्पष्टंसं " म्याँ " कायम आश्चर्य, यांचा संवाद कसा साधतो ? अन् मुक्या-प्राण्याला कसा बुवा समजतो ?! थोड्या वेळाने, वाजायची दरवाजाची कडी टक-टक ऐकून, "विठ्या, कळ काढ थोडी" त्यावर मध्यम-लयीतलं मियाऊँ, होकारार्थी दरवाज्याशी चाहूल ऐकून, "म्याऊँ" सर्वार्थी कान उभे,  टवकारून - डोळे अर्धोन्मिलीत तिरप्या डोळ्यांनी आईच्या हालचाली टिपत सरते शेवटी विठ्याची चिकाटी कामी आली आईने दूध ओतून बशी त्याच्यासमोर ठेवली पुढ्यात बशीत दूध बघूनही, स्वारी चुपचाप ! आईने, "विठ्या,आता कसली वाट पहातोस" विठ्या आपला गप्प, एक नाही की दोन नाही आईने चहाचा एक घोट घेताच, स्वारी खुलली  जिभल्या चाटत बशी रिक्त स्वच्छ-चकचकीत मग तो बसला पंजाने तोंड-नाक-डोळे, पुश...

कविता 🌷 ' किमया चंद्रकोरीची '

कविता -🌷 ' किमया चंद्रकोरीची ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - गुरुवार २८ सप्टेंबर २०१७  नाजूकशी कोर  चंद्राची  आभाळी डोकावते, मंद मंद प्रकाशाला, कवेत घेऊन खुणावते ! ती नाजुक-नवतरुणीच्या भाळी खास शोभते, अन् तिच्या सौंदर्याला अधिकच मोहक बनविते  भाळीच्या त्या चंद्र-कोरीवर पडता एक नजर, नव-युवकांच्या तना-मनाचा होतो धुंद भ्रमर ! कोणी रोज जीन्स-टीशर्ट मध्येच वावरणारी, नऊवारी साडी नेसून नटून-थटून सणावारी, निघाली चंद्र-कोर कोरून, मध्यमशा लयीत शेंकडों पाहणार्यांच्या जणू हृदयांना चिरीत ! दोष कोणाचा, ना त्या मुलीचा वा युवकांचा सर्व मामला आहे, त्या सुरेखशा चंद्र-कोरीचा ! भोळा कान्हा-खट्याळ चंद्र-खुणावे वेळीअवेळी धुंद-वेड लावी जिवा-बावरी झाली राधा-भोळी दोष नसे यमुनेचा, ना राधेचा-अथवा रजनीचा सगळाच खेळ आहे हा, लबाडशा चंद्र-कोरीचा ! बागडत राही नभी, हळूवार छेडी चांदण्यांना  मिचकावून  डोळे,  पांघरूण घाली खोड्यांना ! सर्व प्रेमिकांचा लाडका, देखणा असा हा शशी वाटतो नित्य-नवा, जरी दिसतसे दरेक-दिवशी ! ही किमया सारी प्रेमाची, कोणीच नाही दोषी अनभिषिक्त राजे-महाराजे-नभी...

कविता 🌷 ' सुदिन '

कविता - 🌷 ‘ सुदिन ‘ कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारीख - सोमवार, ९ सप्टेंबर २०१९ समय - १० बजकर ४२ मि. एक था कल बिता, वह दिन और एक है आज का सुदिन सब कुछ था उलटा-पुलटा मानो आस्मान ही था टूटा चारों ओर अंधेरों का डेरा ये कौनसे जनम का फेरा? कल रवी का वार होते हुए भी नाम मात्र का ही उजाला था आंखों में आसुं तो छलक गये, बस बारिश होने का इंतजार था मन पानी-पानी सा हो गया था मानो वक्त कुछ सीखा रहा था ! हर एक लम्हा अलग ही है होता, बिता जो पल फिर लौट न आता ! आज का दिन बडा रंगीन सुनहरा  हंसी-खुशीमें यूॅं बिता, पता न चला  कब शुरू हुआ और कब का गुजरा, बुरे कर्मों पर अच्छाई का था पहरा ! आज की तरह, यूॅं ही कटे जिंदगी हॅंसते-गाते, कर लेनी है कुछ बंदगी हर दिल में प्रेम की एक ज्योती जले अंधेरों को मिटा के, रोशन कर डालें  🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता 🌷 ' तलाश '

कविता - 🌷 ' तलाश ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - 10 जून 2019 समय - रात्री के १० बजे स्नेह सकल हो, भाव अटल हो  मन को साचे मन की तलाश हो बिना कुछ बोले बिना कुछ सुने,  पल में जो दिल का हाल पहचाने वही मन का सच्चा मीत होवे, बुलाने पर तो पराये भी आवे हैं  पर बिन बुलाये बिन कुछ कहे, सब कुछ जान, दौडा चला आये एक नज़र में मनकी व्यथा जाने  वही तो 'अपना सच्चा' मित है ना झूठा बड़प्पन ना कोई दिखावा  ना कोई दुनियादारी न कोई शिकवा  लग़न हो सच्ची, मनका भाव हो प्यारा मिलकर बन जाए हर सूर दुलारा चाहें सख्त़ धूंप हो या ठंडी छांव कभी आंच न आने दे, सहे सारे घाव  आंधी आवे या आये कोई तुफांन    साये जैसा साथ निभाना नहीं आसां 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆     

कविता - 🌷 ' नटखट '

कविता - 🌷 ‘नटखट‘ कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारीख - ९ सप्टेंबर २०१९  समय - ९ बजकर ३५ मि. ये झिल-मिल करते तारे, मुझे याद क्यूँ हैं दिलाते ये दिन नहीं रात है प्यारे ये समां साजन को पुकारे सो गया है सारा जहां, तू क्यूँ जागे गम के मारे चांद भी चुपके-चुपके से कर रहा है अजब इशारे निंदीया कैसे आए नैनों में सपने सुहाने देख कर झूमे बन्सी बजाए बुलाए सांवरे  राधा के झांझर चुप न रहे कारी-काही रात जमुना-किनारे सुध-बुध खोयें दो नयन बावरे दिवानी बनके तक-तक निहारे नटखट नन्ही सी पानी की लहरें 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆  

कविता - 🌷 ' जाल '

कविता -🌷 ‘जाल‘ कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारीख - शनिवार, १५ सप्टेंबर २०१९ समय - रात के ९ बजे  सोचने की बात ये है की  ख्वाहिशें क्यूँ हैं रंग लाती कुछ धुंधली सी होती कुछ आधी अधुरी सी तो कहीं सुनी-अनसुनी अधखुली नैनों में बसी कभी बरसती आस्मानी तो कभी बनकर दिवानी कभी आंखोंसे बहे पानी कहीं यादोंकी मीठी निशानी मुठ्ठी में जकड कर रखी छबीयाॅं सुनहरे पलों की  जाने कैसे जीए जिंदगी सपनों के जाल में यूँ फंसी 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता : 🌷 ' पोटची माया '

कविता - 🌷‘ पोटची माया ‘ कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारीख - सोमवार, १६ सप्टेंबर २०१९ वेळ : ८ वाजून ४२ मि. जाणीवा बोथट झाल्या तरी अंतरीचा सल काही जात नाही अदृश्य जखमा संपल्यावर ही वेदना काही थांबत नाहीत आनंददायी मस्त मनालाही चरे पाडणारे सोडंत नाहीत स्वच्छ वाहणाऱ्या झर्यालाही गढूळ होण्यातून सुटका नाही मुकामार दिसत नसला तरी ठणका पाठ काही सोडत नाही नशिबाचे फासे खासे असूनही सोंगट्यांकडून घात थांबत नाही एका छताखाली रहात असूनही दोन मनांतील अंतर संपत नाही मानापमानाची नाटकं पचवूनही पोटातील माया काही आटत नाही! 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता 🌷 ' मॉडर्न अष्ट-भुजा-देवी '

कविता - 🌷' आधुनिक अष्ट-भुजा-देवी ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - १८ डिसेंबर २०१६   वेळ : १२ वाजून ५२ मि. गेल्या आठवड्यात बिल्डिंगचा वॉचमन, एका नव्या वयस्क-बाईला आला घेऊन  विचारातच पडले तिच्या वयाकडे पाहून  त्यामुळं मनस्थिती थोडीशी दोलायमान  काम अगदी स्वच्छ, पण बडबड फार  जणू हात व तोंड बरोबरच चालवणार  हां हां म्हणता कामांचा डोंगर केला पार उरक जरी दांडगा, चौकशांनी केलं बेजार  वयापरत्वे नवरा कामावरुन रिटायर झाला नातू इंजिनियरिंगला-लेक कॉम्पुटरकोर्सला  काबाडकष्टाने स्वतःचं घरदार चालवते आहे  जणू अष्ट-भुजा-देवीचा-अवतार वाटते आहे  ज्या वयात बायका "थकले बाई " म्हणंत, हळूहळू उठतात, "राहिलं काय आयुष्यात" असं म्हणत, दीर्घ नि:श्वास टाकत बसतात  पन्नास गेले-पाच राहिले-पालुपद लावतात ही बाई म्हणजे, बरोब्बर उलटाच प्रकार  प्रसन्न चेहरा, तरुणीसमान उदंड उत्साह  वेगात हालचाल, कामाचा नुस्ता धबधबा पाच गेले मजेत-पन्नास जातील आनंदात एवढं सगळं करून सर्व कामं सांभाळून, भजन- किर्तन, मनाचे श्लोक पाठ करणं  परिस्थितीस हसत तोंड देत सा...

कविता : 🌷 ' साकडे '

कविता - 🌷‘साकडे‘ कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारीख - शनिवार, १४ सप्टेंबर २०१९ वेळ - १० वाजून ५३ मि. आई अंबाबाई तुला घालिते गं साकडे, भूल-भुलैया दुनियेचे मोहमयी गं रूपडे अनोळखी रस्ते, अस्ताव्यस्त पसरलेले निरागस जीवाला फसविण्यास टपलेले अवघी अंधेर-नगरी कुणी कुणाचा नाही हळव्या पाडसांना तुझाच आधार गं आई  साता जन्मांची पुण्याई आली फळाला म्हणून तुझा वरद-हस्त आम्हां लाभला  तव दर्शनाच्या ओढीने जीव गं आतुरला तव कृपा-वर्षा होता भक्तिभाव अंकुरला सौभाग्याने पदरी चंद्र-सूर्य गं झळकले, झाकोळले कधी आकाश, तेज चमकले तुफानी लाटांनी जरी तांडव नृत्यही केले, तव आशिर्वादाने, मन कधी न डगमगले ! पहाटे-पहाटे अंधार संपून तांबडे फुटू दे सारं काही सुकर-सफल उजळून निघू दे अज्ञानी-अबोध लेकरांस सद्बुद्धी देई माते  वाट चुकलेल्या जीवांना, सन्मार्ग लाभू दे ! हाक मारली आता निश्चिंत मन हे झाले, सत्कर्मी जीव रमून जीवन-सार्थक झाले  आईच्या कुशीत मज निज-रूप ते दिसले ! डोळे मिटून सद्चिदानंदी एकरूप ते झाले 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆  

कविता : 🌷' मन-के-बोल '

कविता :🌷 ' मन-के-बोल ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : गुरुवार, १२ ऑक्टोबर २०२३ समय : रात के ८ बजे मनवा साई-नाथ साईं-राम बोल रे। सफल होंगेे, बिगड़े काम सब तेरे ।। माया मोह, जाल बिछाकर ताक रहें। हे मन, भूलके ना फंस उस जालमें।। रंग-रुप धन-दौलत नहीं काम आने। संत-वचन-सत् कर्म जरुरी हैं तारने।। सब भूलकर मगन हो जा भक्ति में। ईश्वर स्वयं आएंगे भक्तों से मिलने।। नाम-यज्ञ, सत्कर्म-योग हैं सच्चे साधन। इनके बिना कैसे होगा सफल ये जीवन।। 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆