कविता - 🌷 " या लोभस वळणावर "...


कविता - 🌷 " या लोभस वळणावर "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले 
तारिख - गुरूवार, ४ मे २०१७

मन तुडुंब भरलं काठोकाठ ...
बहुधा हीच ती पाऊल-वाट ...

जणू स्वर्गातील ही सोन-पहाट ...
आकंठ आनंद वाहतोय अफाट ...

काहीबाही विचार नाही,
चिंतेचाही लवलेश नाही ...

निर्विचार, शांत अशा मनी,
कसलाही, कल्लोळ नाही ...

सर्वत्र निरव अशी शांतता,
अंतर-बाह्य एक समानता 

सुरेख, निळं-निळं आभाळ,
जणू खुणावणारं मोहजाळ ...

आयुष्याच्या या लोभस वळणावर,
खुळं मन भान विसरुन सुखावणार ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले 
🙏🕉🔆

Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "