कविता - 🌷 ll " तथास्तु " ll

कविता - 🌷 ll " तथास्तु " ll
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - १२ जानेवारी २०१७

जीवनातील सुंदरशी ती शिकवण,
अशाप्रकारे मिळता, मन आनंदलं 
अनामिक-अनुभूतीनं, प्रसन्न झालं ...

आधी फुल-वाल्याला विचारुन ठेवलेलं 
" येथे सात्विक-अन्न, कोठेसं मिळेल? "

गेलो त्यानं सांगितलेल्या,भाटिया- लॉजला 
स्वच्छ पण छोटेखानी,धाब्याटाईपची जागा
प्रवेश-द्वाराजवळ,एक वयस्क गृहस्थ उभे होते,
आम्हाला पाहून,शुभ-आशीष वरदहस्ताने दिले

शिर्डीभर सर्वत्र मागणारे हातच दिसले होते,
हे गृहस्थ,काही न मागता,दुवा मात्र देत होते 

सहजपणे मी त्यांना म्हटलं, " बाबा, कुछ खाओगे ? "
उत्तराची वाट न पाहता, रेस्टॉरंटच्या मालकाला,
सांगीतलं," या बाबांना व आमच्या मामा ड्रायवरला,
जे जे हवंय ते सर्व द्या पण बिल, माझ्या बिलात टाका "
 
सर्वांचं व्यवस्थित खाऊन झाल्यावर, स्वादिष्ट-सात्विक पदार्थांवर ताव मारून,
मालकाला"शुक्रियां" बोलून बिल भरून, जात असताना, तो मालक म्हणाला,
मॅडम, यह बंदा यहां हररोज है होता, कई सालोंसे हम सबने उसे है देखा ...
पर आज तक कभी, अंदर नहीं आया-न कभी उसने कुछभी मांगा या खाया ...

दुवांए सदा वो हर-एकको देता रहेता है ...आपपर उपर-वालेकी मर्जी जरूर है 
तेव्हा माझ्या "अहो-आई "म्हणाल्या, लगेच

 " तथास्तु ll "

त्यानंतर मस्त मजेत, आमच्या गतीने, मुंबईस
दहा दिवसांची नाशिक- शिर्डी- सहल करून,

अध्यात्मिक-अनुभवानं अधिक श्रीमंत-होऊन,
ताजे-तवाने होऊन,पुनः रुटीन मधे झालो व्यस्तं ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
















Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "