कविता - 🌷 " परिणीती आणि फलश्रुती " २९ डिसेंबर २०१६

कविता - 🌷 " परिणीती आणि फलश्रुती "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - २९ डिसेंबर २०१६

मुंबईत जसे गल्लो- गल्ली पान-वाले,
तसे घरी येऊन देणारे,अंडी-पाववाले ...
सायकलची घंटा किण-किण-वाजवंत,
दिवसांतून किमान चार-पाच वेळा येत

सोसायटीत चक्कर,त्यांच्या पोतडीत,
अठरा- पगड गोष्टींचा भरणा घेऊन,
तमाम गृहिणीना खूप खुश करतात 

अगदी " चना-जोर गरम "पासून,अंड्यांपर्यंत,
" सब-कुछ-अंडर- वन- रूफ "जादूनं मिळतं ...

हल्ली," राजू " नावाचा हसरा चेहरा,
अंडी-पाव घेऊन सोसायटीत यायचा ... 

त्याचा प्रसन्न चेहरा छानच वाटायचा ...
"भोनी करो"म्हणून पिच्छा,पूरवायचा ...

"आपके हाथ लगनेसें सारा माल, फटाफट होता है खत्म", म्हणत ...
प्रत्येकास जणू हरभऱ्याच्या झाडावर चढवायचा ...
एवढ्या लहान वयात,"मार्केटिंग स्किल"दाखवायचा ...

घरी पाव- भाजीचा होता बेत, म्हणून त्याला आधीच सांगून
जास्तीचे "लादी-पाव" मागवून, मग सुटकेचा निःश्वास टाकला 
दुसऱ्या दिवशी सकाळी, बेल मारून दरवाज्यात उभा राहिला ...

दरवाजा उघडताच,नेहमीचा हसरा चेहरा, होता लांब-लचक झालेला 
प्रश्न विचारला तरी,तो गप्पच बसला, निरखून पाहिलं तर डोळे ओलसर 
"क्या हुआ,बता तो जरा "म्हटलं तर, त्याचा अंड्यांचा- ट्रे, रस्त्यात पडून,
अंडी फुटून,खूप नुकसान झालेलं, नुकताच धंदा सुरु केला होता त्यानं

१५/१६ वर्षांचं त्याचं कोवळं वय, "कितना घाटा हुवा"जेव्हा विचारलं,
दुकानदाराने माल देणंच बंद केलंय, हे समजल्यावर ओळखीच्या,
ठोकभावात अंडी-विक्री-दुकानदाराला चिठ्ठी लिहून, पाठवलं त्याला 
दुकानातुन फोन आल्यावर, त्याचं काम झालं 

दुकान-दाराची खात्री पटली, त्यानं "क्रेडिट"वर अंडी दिली,
तेव्हा कुठे राजुची कळी मग परत, खुलली ...

त्याच्या चेहऱ्यावरचं नेहमीचं, दिलखुलास "हास्य" पाहून,
उगीचच मला खूप बरं वाटलं, तसं पाहिलं, तर एक शब्द,
टाकण्या पलीकडे, फारसं असं काहीच केलं नव्हतं ...

त्याची लगेच,इतकी छान परिणीती ...
काहीही विशेष न करताही,फलश्रुती ...
ही " खुषी " मात्र काही औरच होती ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆













Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "