कविता 🌷 ' कवयित्रीच्या नजरेतून '


कविता - ,🌷 " कवयित्रीच्या नजरेतून "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - १ जानेवारी २०१७
वेळ - दुपारी २ वाजता 

"दशाननाला दहा शिर, वीस हात व वीस पाय "

या वर्णनाचा मतितार्थ भिन्न भिन्न रूपानं 
दहा-डोकी असलेला, दसपट बुद्धिमान 
वीस हात-पाय म्हणजे, दसपट बलवान 
एकटा रावण ताकदीनं, दहांच्या समान !

फुलांच्या ऐवजी, रावणाने महादेव-आराधनेत,
स्वतःचं एकेक शीर-कमल शंभोस अर्पण केलं ...
त्याच्या,याकृतीचा प्रतिकात्मक स्वरूपाचा अर्थ,

विद्वान-पांडित्य व बुद्धी-चातुर्यामुळं, रावणानं,
मनं, बुद्धी, मानस, चित्त, अहंकार व अंत:करण,
या दश मनोदशांचा-वृत्तींचा केला-त्याग संपूर्ण
अपेक्षे-प्रमाणे प्रकटले, देवाधिदेव होऊन प्रसन्न !

महर्षी वेद-व्यास यांच्या प्राचीन 'रामायण' 
या महा-काव्याचा खलनायक, हा रावण ...

जितका रावण अहंकारी, त्या विरुद्ध
सुशांत विनयशील राजकुमार श्रीराम 
एकवचनी, एक-पत्नी, आज्ञा-धारक,
सर्वांना आपलंसं करणारा, प्रभूश्रीराम 

पालनकर्ता पुत्रधर्म-पतिधर्म-राजधर्माचा 
सुशीलमहा-पराक्रमी सुपुत्र कौसल्येचा 

रावणाने ज्यांना अत्यंत-तुच्छ लेखून,
पूर्ण वगळलं ब्रह्माच्या अभय-दानातून,
ते म्हणजे मनुष्य व वानर, ज्यांच्याहातून,
कधी काळी त्याचा मृत्यू होण्याचा संभव !

रावणाने सोन्याची बनवून लंका ...
श्रेष्ठतम बुद्धीजीवींना,आश्रय दिला ...
त्यानं अधीन करुन ठेवलं, नवंग्रहांना
जणू काळावरही मायावी-जय मिळवला ...

रावणाच्या अधिपत्या-खाली,
दानव-मंडळी फारच माजली ...

त्यामुळे त्याच्या राज्यात दानवी-राक्षसी,
दुष्ट प्रवृत्तींच्या थैमानानं केलं त्राही-त्राही
दुष्ट प्रवृत्तींनी बहकुन केलं होतं त्राही-त्राही
तिन्ही लोकी प्रचंडं दहशत निर्माण झाली ..
त्रिलोकात प्रचंडं दहशत निर्माण झाली ...

त्या सगळ्यांवरही कहर म्हणून,
रावणाने सीतेला,पळवून नेऊन,
आयुष्याचं,अंतिम दुष्कृत्य केलं ...

कार्यारंभी, रामाने पूजा केली रामेश्वराच्या सागराच्या तटी, 
स्थापना-वाळूच्या लिंगाची-आद्यशिव-शंभूची अर्चना केली, 

जांबुवंताच्या आदेशानुसार, नल-नील भावा-भावांनी,
वानर- सेना गोळा केली-मनोमन"जय श्रीराम"म्हणत,
एकेक शिला जळी टाकून, बांधला समुद्र-पूल, लंकेपर्यंत

त्यावरुन लीलया समुद्र लांघून, रामाने सेनेसह लंकेत डेरा टाकला 
एक मनुष्य, वानर-सेनेसह समुद्र लांघून, लंकेला येईल लढायला 

हे रावणाच्या ध्यानीमनीही नव्हतं- त्याचं मनोधैर्य पार खच्ची झालं !
पोटात भीतिचा गोळा येऊन-आत्म-विश्वास साफ डळमळीत झाला

लंका हे बेट आहे, चारी बाजूंनी पाणी,
त्यावरून हल्ला करू न शकत कोणी ...
हा भ्रमाचा-भोपळा पूर्ण-फुटला आणि,
त्याच्या तोंडचं खरोखरचं,पळालं पाणी !

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Comments

Popular posts from this blog

कविता - 🌷 " परी या-सम-हा " तारिख - १० डिसेंबर २०१६

कविता 🌷 " एहसास "

Poem - 🌷 " Live in Alignment " Date - 31 March 2025