कविता : 🌷 ' पोटची माया '

कविता - 🌷‘ पोटची माया ‘
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारीख - सोमवार, १६ सप्टेंबर २०१९
वेळ : ८ वाजून ४२ मि.

जाणीवा बोथट झाल्या तरी
अंतरीचा सल काही जात नाही

अदृश्य जखमा संपल्यावर ही
वेदना काही थांबत नाहीत

आनंददायी मस्त मनालाही
चरे पाडणारे सोडंत नाहीत

स्वच्छ वाहणाऱ्या झर्यालाही
गढूळ होण्यातून सुटका नाही

मुकामार दिसत नसला तरी
ठणका पाठ काही सोडत नाही

नशिबाचे फासे खासे असूनही
सोंगट्यांकडून घात थांबत नाही

एका छताखाली रहात असूनही
दोन मनांतील अंतर संपत नाही

मानापमानाची नाटकं पचवूनही
पोटातील माया काही आटत नाही!

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆



Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "