कविता - 🌷 " अभूत-पूर्व जोडी "

कविता - 🌷 " अभूत-पूर्व जोडी "         
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - बुधवार, ८ मार्च २०१७

राधे शिवाय कृष्ण अधूरा ...
शक्ति शिवाय शिव अपूरा ...

सीते शिवाय राम अधूरा ...
लक्ष्मीविना विष्णू अपूरा ...

सृष्टी शिवाय विश्वाला नाही पूर्णत्वं ...
नारी शिवाय नरास नाहीच पूर्णत्वं ...

अवघ्या विश्वाचा गाडा,
आहे अधूरा अन अपूरा ...
रथ हा, त्या जगन्नाथाचा ...

हलतो, डुलतो, चालतो दिवस अन् रात्र,
या जोडीच्या शक्ति-युक्ति आणि बुध्दिनं ...

जगन्नाथाच्या गाड्याची ...
ही अभूतपूर्व अशी जोडी ...

एकमेकां शिवाय दोघेही ... 
सर्वथा अधूरी अन् अपूरी ... 

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🌅

















Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "