कविता -🌷 " सु-संस्कारांचं सिंचन " ३० डिसेंबर २०१६


कविता -🌷 " सु-संस्कारांचं सिंचन "  
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले 
तारिख - ३० डिसेंबर २०१६

खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही- आमच्या शाळेच्या हेड-मास्तरांनी,
विद्यार्थ्याना "प्रोत्साहित" करण्याची, एकमेव अभिनव-शक्कल लढविली 
८० टक्के-गुण मिळताच नावाची-पाटी शाळेच्या भिंतीवर कायमस्वरूपी 

प्रत्येक इयत्तेतील पहिल्या पाच क्रमांकाची,
त्यामुळे चांगलीच चुरस विद्यार्थ्यात लागलेली 
की कोण ही अट पूर्ण करणार सर्वांत आधी ... 
ही चुरस मात्र फारच निकोप स्वरूपाची होती 

"भिंतीवर नाव-लागणे" याचा खरा अर्थ-काय,
 हे समजण्याचं वय नसलं तरी ते महत्वाचं आहे,
 एवढं बाकी अस्मादिकांना नक्की समजलं होतं,
 शिवाय वर्ग-शिक्षकांचंही माझ्यावरंच लक्ष होतं !
 
त्यांच्या सगळ्या-आशा माझ्यावर होत्या केंद्रित 
त्यांची मी "आवडती" असं सगळ्यांना वाटायचं 
आईच्या कृपा-आशीर्वादाने-कर्मधर्म-संयोगाने,
त्या वर्षीच्या वार्षिक परीक्षेत, मिळाले ८६ टक्के !

त्यामुळे माझ्या नावाची ठळक लाकडी-पाटी, लिहून-रंगवून खूप उत्साहात तयार केली गेली
उत्साहात मुख्य अतिथींनी भिंतीवर लावली भव्य समारंभ होऊन कौतुकाची भाषणेही झाली 

शिक्षक वर्ग-मित्र मैत्रिणींना, प्रचंड आनंद व अभिमान वाटला 
थोडी गंमतीची गोष्ट म्हणजे  त्यानंतर कित्येक वर्षे कोणालाही,
त्या भिंतीवर एकच नाव, अन्य कोणास स्थान मिळालंच नाही

नंतर ती गोष्ट, साफ विसरले-कॉलेजचे सोनेरी दिवसही संपले 
जॉबनंतर बिझनेसमधे रंगले -यथावकाश मग शुभ-लग्न झाले 
विशेष अशी घटना म्हणजे, त्यावर्षी शाळा हे मतदान केंद्र होते,
माझे सासर-माहेरचे-नातेवाईक मतदान करण्यास शाळेत गेले 

मतदान करुन आल्यावर केवढ्या कोडकौतुकाने नव्या सुनेचं,
शाळेत शिरताच ठळक नाव पाहिल्याचं रसभरीत वर्णन करुन,
आल्या-गेल्या प्रत्येकाला सांगत होते-सुनेच्या हुशारीचं कौतुक !
मनोमन मी आमच्या हेड-मास्तरांना-शिक्षकांना संपूर्ण श्रेय दिलं

नतमस्तक होऊन त्या भन्नाट कल्पनेला कोटी-कोटी प्रणाम
धन्य ते मुख्याध्यापक आणि धन्य-धन्य ते सगळे वर्गशिक्षक 
ज्यांनी अविरत परिश्रम करून, सु-संस्कारांचंच केलं सिंचन !
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆














Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "