कविता - 🌷 " मन-मोहक त्रिमूर्ती " १३ डिसेंबर २०१६

कविता - 🌷 " मन-मोहक त्रिमूर्ती " 
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले 
तारिख - १३ डिसेंबर २०१६ 

मार्गशीर्ष महिना महत्वाचा व आनंदाचा 
पौर्णिमेच्या शुभ- दिनी जन्म दत्तात्रेयाचा 
अनुसूया आणि अत्री ऋषींच्या या,पुत्राचा 
बाल- स्वरूपात जन्म घेणाऱ्या त्रिदेवांचा 

ब्रह्मा-विष्णू-महेश यांचा हा विशेष अवतार 
एकूण चोवीस गुरु केले लहान- पणापासून 

प्रत्येकाकडून विशेष" ज्ञान "ग्रहण केले ...
संपूर्ण चरा- चरात ऐच्छिक भ्रमण केले ...
सजीव-निर्जीव दरेक वस्तू व वास्तुमध्ये,
स्थित,एकच " आत्म-तत्व ", सिद्ध केले ...

औदुुंबराच्या थंड छायेखाली ...
शांत, मन-मोहक अशी,त्रिमूर्ती ...
नेहमी त्यांच्या स- भोवताली ...
कामधेनू व चार श्वान असती ...

भक्तांचे मनोगत ओळखून ...
दत्त-गुरु करतात तेच पूर्ण ...
त्यांना जे मनोभावे पूजतात,
त्या सर्वांना श्री दत्त,पावतात ...

गाणगापूर येथे श्री दत्तात्रेयांची पाऊले ...
स्पष्टपणे उमटलेली पाहण्यास मिळतात ...
याच सुमारास, दत्त-गुरुनी अवधूत रुपात 
कैक भूभाग संचारकरून,केला ज्ञान-प्रसार ...

माहूर, गिरनार, कुरवपूर,कारंजा,पिठापूर
औदुंबर, गाणगापूर, माणगाव, गरुडेश्वर
नृसिहवाडी,अक्कलकोट,माणिक, नगर ...
सर्व ठिकाणं त्यांच्या वास्तव्यामुळं पवित्र ...

ज्या परिसरात,त्यांच्या झाला संचार,
सुप्रसिद्ध तीर्थस्थानं झाली साकार ...
सगळे भाविक-भक्त-जन दर्शनास,
आतुरतेने गोळा होऊन,धन्य होतात ...

ते अवधूत स्वरुपात,रूप बदलून
कित्येक जणांना, अलग रीतीनं,
" दर्शन "देतात,जीवनाचं-सार्थक ...
जीवन सफल झाल्याचं समाधान ...

ते भक्त-जनांना भेटून, त्यांच्या मनातील भाव
ओळखून तसा अनुभव देतात, अनुग्रह करतात ...

सारी मनोरथे पूर्ण करतात ...
काही न मागताही बरंच ...  
कल्पनातीत, देऊन जातात ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले 
🙏🕉️🔆















Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "