Posts

Showing posts from January, 2024

कविता - 🌷 ' लक्ष्मी-नारायण ' तारिख - बुधवार, ३१ जानेवारी २०२४

कविता - 🌷 ' लक्ष्मी-नारायण ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - बुधवार, ३१ जानेवारी २०२४ वेळ - रात्रीचे १० वाजून ३९ मि. पतीच्या असण्याने घराला घरपण मिळते ... त्यामुळेच नव्या दमाची नवीन-पिढी होते ... तक्रारही न करता तो नोकरी-धंदा करतो ... सर्वांसाठी मुक्त हस्ताने पैसेही खर्च करतो ... घरी कुणी आजारी असता, काळजी घेतो ... न सांगता-सवरताच सगळं समजून करतो ... एरव्ही थोडासा सैलढैल असलाही जरी तो, पाहुणे असताना शहाण्यासारखाच वागतो ... घरातल्यांना फिरायला न्हेऊन-लाड पुरवतो ... नाटक-सिनेमा-खवैयेगिरी सगळंच जमवतो ... प्रत्येक वाढदिवस दणक्यात साजरा करतो ... सहल-परदेश-वारी-आदी योजनाही आखतो ... स्वारी खुशीत असताना, फुले-गजरे आणतो ... कठीण प्रसंग आला, ठाम भूमिका निभावतो ... पत्नी गृह-लक्ष्मी म्हणून मानली-तिला साजेसा ... पति-परमेश्वर-नारायण, हा जणू तिला शोभेसा ... सगुण असल्यावर एखादा दुर्गुणही असणारच ... सर्व-गुण-संपन्न-व्यक्ती मिळणं, हे दिवास्वप्नच ... लग्नाच्या-गाठी, त्या देवानंच बांधलेल्या असतात ... प्रत्येक पति-पत्नी जणू लक्ष्मी-नारायण-स्वरुपात ... अखेरीस काय-संसार-रथ उत्तमपणे हाकण्यासा...

कविता - 🌷 ' हवेहवेसे ' तारीख - मंगळवार, ३० जानेवारी २०२४

कविता - 🌷 ' हवेहवेसे ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारीख - मंगळवार, ३० जानेवारी २०२४ वेळ - ११ वाजून १९ मि. हवेहवेसे वाटते सारे, झणी कवेत कवटाळावे ... सुरक्षित ठेवावे त्या, कधी न निसटू द्यावे ...   क्षणभंगुर ते क्षण सुखाचे, मुठीत घट्ट पकडूनी घ्यावे ... दु:खाची कधी हवा पसरता, हवेत त्यांना विरू न द्यावे ... इवले-इवले जीव कोमल, अलगदपणे हाताळावे ... काचेसम तडका जाऊन, कधीही भंग न होऊ द्यावे ... सूक्ष्म, सुंदर, ईश्वरीय ... शुभ-संकेत ते ओळखावे तरल संवेदना झंकारता, तन-मन त्यात तल्लीन व्हावे ... 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता - 🌷 ‘ पिंगा‘ तारीख - शुक्रवार, २० सप्टेंबर २०१९

कविता - 🌷 ‘ पिंगा‘ कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारीख - शुक्रवार, २० सप्टेंबर २०१९ माणसांत जेवढे गुण असतात ... तेवढे दोषही भरलेले असतात ... कळत-नकळतच चुका होतात ... नंतर त्यांची प्रश्नचिन्ह बनतात ! त्यावेळी टाकलेली दोन पावलं ... हळहळ बनून मग फेरा धरतात ... काय चूक होतं अन् काय बरोबर, या संभ्रमातच, कैक वर्षं सरतात ... बुडत्याला जसा काडीचा आधार ... डोळे कारणांचा वेध घेत राहतात ! गुंता-गुंत मनातली किचकट फार ... अशानं स्वप्नं कशी होणार साकार ? मुठीत पकडून एखादं फुलपाखरू, तळवा आपसूक रंगीत होऊन जातो ... निष्पाप जीव मात्र कासावीस होऊन, जगण्यासाठी शर्थीनं, धडपड करतो ... जे जे घडायचं होतं ते घडून गेल्यावर, सारा आसमंत होई एकदम शांत शांत ... दर्याकिनारी लाटा करती अविरत दंगा ... मनांतरी मात्र विचारांचा सततचा पिंगा ... 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता : बालगीत 🌷' चीव-चीव ' तारीख : २० मार्च २०२३

कविता : बालगीत 🌷' चीव-चीव ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारीख : २० मार्च २०२३ वेळ : १२ वाजून ३४ मि. चिमणा-चिमणा असूनही जीव, सतत करतात, चीव-चीव-चीव ... चोचीत पकडून काडी-न्-काडी, ऊबदार असं घरटं बनवून सोडी ... नवजात पिल्लं घरट्यात राहून, वाट बघती, त्यांची 'आ' वासून ! चिऊताईच्या इवल्याशा जीवनात, विवंचनेला थाराच नसतो, कामात ... रात्रंदिवस कष्ट उपसती आनंदानं ... पण नाहीच माहीत, त्यांना थकणं ... चोची मधून आणतात दाणा-पाणी, पिल्लांना भरवतात चिमणा-चिमणी ... आयुष्य मोठं असो वा असो लहान, प्रत्येक क्षण-न्-क्षण हवा दैदिप्यमान ... 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆 

कविता - 🌷 ' पालवी ' तारीख - रविवार, २९ सप्टेंबर २०१९

कविता - 🌷 ' पालवी ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारीख - रविवार, २९ सप्टेंबर २०१९ वेळ - दुपारी - ४ वाजून २९ मि. अजून एक नवा करकरीत दिवस येतो, नव्या आशांची कोवळी पालवी लेऊन ! आशाळभूत होऊन, मुजरा करतो लवून ... अपेक्षांचं ओझं लादून, बदलांची जाणीव करुन ... पुसट विचार जातो चाटून ... अन् काटाच येतो सरसरून ... पाच गेले अन् पन्नास राहिले ... म्हणता-म्हणता आली पन्नाशी ! बदलत गेली सगळी परिस्थिती, बदलांची पुन्हा जाणीव होऊन ... असं वारंवार का बरं घडतं ? याच विचाराने मन पोखरतं ... अपेक्षा ठेवून निराश होऊन, पदरी एक नवा अनुभव येतो ... तरुण सळसळतं रक्त-नवा जोश ... नवनवीन योजना-आनंदी जल्लोष मग प्रश्नांची ही झुंड हवी कशाला ? झुंज न देता विषयाला बगल देऊन ... नवं-नवं सगळं हवं-हवंसं वाटतं ... जुनं-पानं मग निरूपयोगी ठरतं ! अनुभवाचे बोल वाटतात फोल ... सोईस्कर रित्या ऐकून-न ऐकून ... अजून एक नवा करकरीत दिवस येतो, नव्या आशांची कोवळी पालवी लेऊन ! 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता - 🌷 ' सपनों का जाल ' तारीख - शनिवार, १५ सप्टेंबर २०१९

कविता - 🌷 ' सपनों का जाल ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारीख - शनिवार, १५ सप्टेंबर २०१९ समय - दोपहर के ४ बजे  सोचने की बात ये है की, ख्वाहिशें क्यूँ हैं रंग लाती ... कुछ थोडी धुंधलीसी होती ... कुछ होती आधी-अधुरीसी ... तो कुछ कहीं सुनी-अनसुनी, कुछ अध-खुले नैनों में बसी ... कभी बरसती हैं आस्मानी ... तो कभी बन कर दिवानी ... कभी वें आंखोंसे बहे पानी ... या कहीं यादों की निशानी ... सपनों का एक माहोल होता, जो सुंदर-मधुर-लुभावनासा ... हर घडी-हर-लम्हा रंगीनसा ... हसी-खुषी-मुस्कानों से भरा ... मुठ्ठी में जक़ड कर रखी हैं ... छबीयाॅं उन सुनहरे पलों की, जाने कैसे जीए भी जिंदगी ... सपनों के जाल में, यूँ फसी ... 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता - 🌷 ' आशेचा किरण ' तारिख - २२ डिसेंबर २०१९

कविता - 🌷 ' आशेचा किरण ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - २२ डिसेंबर २०१९ माणसं अशी का बदलतात ? कोडं बनून गोंधळ घालतात ... सगळे उच्च कोटीचेच सद्गुण, हकनाक वाया का घालवतात ? राजबिंडं रूप, कुशाग्र बुद्धी ... वाक्-चातुर्य-स्वभाव-विनोदी, राजस हावभाव-सदैव आनंदी ... पिंजर्यात अडकून, झाला बंदी ! एकवेळ गंमत-गंमत म्हणून ... स्वत:च भोवती जाळं विणून, बेसावध क्षणी मग गुरफटून ... नकळत नौका जाई भरकटून ... धोक्यात जीव का टाकतात ? बरं-वाईट काहीं ना उमजून, वाईटाची कास का धरतात ... सुखाकडे पाठ का फिरवतात ? एका क्षणी प्रेमानं बिलगून ... हळव्या मना, का दुखवतात ? पोटतिडकीनं सांगून सुद्धा, काणा-डोळा का करतात ? रक्तबंबाळ विषण्ण झालं मन ... काय करावं-विचारांचं रणकंदन ... वणवा पेटला-कुठं शोधावं चंदन ... रात्र सरता, दिसे आशेचा किरण ... 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता - 🌷 ' निद्रिस्त ' तारिख - २ नोव्हेंबर २०१९

कविता - 🌷 ' निद्रिस्त ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - २ नोव्हेंबर २०१९ वेळ - संध्याकाळी ७ वाजून ५९ मि  कोणा सांगू ही अंतरीची कळ ही मुकीच, पश्चात्तापाची झळ साचलेली मनातील जळ-जळ पिच्छा पुरविते सदाची हळहळ  शिणलेल्या या तना-मनाला अव्यक्त वेदना ती अपरंपार काय करावे काहीच सुचेना टाकला दैवावरी सारा भार ... ऐन तारुण्याची ती सळसळ अन् का निराशेचा भस्मासुर गिळण्या टपला टाकूनी गळ ... दृश्य किती ते भयावह-भेसूर ... कळस बनवायचा घाट घातला, बावनकशी सोनं, बेगडी मुलामा बिन फायद्याचा फुकटचा ड्रामा नामधारी  विकतचे  काकामामा ... सगळंच होतं आखीव-रेखीव ... जणू होई साकार स्वप्न सजीव  अतृप्तीनं भूतकाळ पोखरून, जणू घडीच टाकली विस्कटून ... आपलं नाणं जरी खणखणीत ... परिस्थितीमुळे झालं गुळमुळीत मग मांजरीच्या गळ्यात ती घंटा, बांधूनही कोणाला फायदा-तोटा ... मांजरीचा झालाय बेरकी बोका ... वेळीच त्याला आवरायला हवा संधी मिळताच घालेल तो घाला, अन् वेड पांघरून करेल कांगावा सोन्याला भट्टीत तावून सुलाखून त्याचा कस, निखरणारच अजून ... अस्सल पुढे बेगडी कसं टिकणार ? निद्रिस्त डोळे कधी बरं उघडणार ? ?...

Poem - 🌷 ' Tell me why ' Date - Saturday, 2 November 2019

Poem - 🌷 ' Tell me why ' Poetess - Tilottama Vijay Lele Date - Saturday, 2 November 2019 Time - 7.45 PM  Please tell me why People change overnight Two loving souls Fight day n night ! Lovely innocent hearts Brake and walk apart What goes wrong, Life is a Swan-song Little Birdie coos ... Sweet n nice melody But as time goes, It becomes a tragedy ! Tiny little buds Bloom into lovely colours But some time later, Wilt down on the floor ... Chubby cheeks n little hands Take care of the mother As time passes by, Forget to love and care ... Feelings of various kinds Unadulterated and Pure After becoming mature, Why vanish into thin air? Innocence and joy ... Play like a new toy ... When they brake, Everything becomes fake ... 🌷@Tilottama Vijay Lele 🙏🕉️🔆

कविता - 🌷 ' साक्ष ' तारिख - २७ जानेवारी २०२४

कविता - 🌷 ' साक्ष ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - २७ जानेवारी २०२४ वेळ - ११ वाजून ५५ मि. श्रीनटवर निरंजन नंदलाल हा नटला ... थेट हृदयीच, लबाड जाऊनी बसला ... सिंहासनस्थ श्रीरंग नाद-निनाद करी ... अष्टौ-सिद्धी वीणा-वादने, साथ करी ... ओठी वेणू विराजित, स्वर-झंकार करी ... मंत्रमुग्ध होत गोधेनु, दुग्ध-पान्हा सोडी ... गोप-गोपी घडे घेऊन जाती यमुनातीरी ... रम्य-सांजवेळ-अवतरले सांजरंग भूवरी ... हिरव्या-वनांतरी घन-दाट हिरवी झाडी ... राधासवे कान्हा, अलगद खोड्या काढी ... नभी टिपूर चांदणं, चंद्रही चम-चम करत ... झुळुझुळु वाही यमुना-जळ मूक साक्ष देत ... 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆 

कविता - 🌷 ' अश्वत्थामा ' तारिख - शनिवार, २७ जानेवारी २०२४

कविता - 🌷 '  अश्वत्थामा  ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - शनिवार, २७ जानेवारी २०२४ वेळ - रात्री ८ वाजून २६ मि. माणसं अशी विचित्र का वागतात ... ठीक असून, खुसपटं का काढतात ... यालाच का "सुख बोचणे" म्हणतात ? स्वत:चा न्यूनगंड कुरवाळत बसतात ... दुसऱ्याला सदा कमी लेखू पाहतात ... अन् त्यातच धन्यता मानत राहतात ... दुसऱ्याला फसवणं फार सोपं असतं ... स्वत:च्या मनात मात्र ते सलतच राहतं ... शरिराची इजा औषधांनी भरुन येते ... मनात खोल, जखम भळभळत राहते ... वरवरची मलमपट्टी कामी येतच नाही ... जखमांवर खपली कधी धरतंच नाही ... असे अतृप्त जीव 'अश्वत्थामा' बनतात ... जन्मोजन्म तेल मागत हिंडतच बसतात ... 'करावे तसे भरावे'त्यांना उशिराने कळते ... पण हातातून वेळ निसटून गेलेली असते ... माणूस वेळीच जर, माणुसकीनं वागेल ... पृथ्वीवरही स्वर्ग-सुख-प्राप्त करु शकेल ... 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता 🌷 ' आराधना ' तारिख - बुधवार, २४ जानेवारी २०२४

कविता 🌷 ' आराधना ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - बुधवार, २४ जानेवारी २०२४ वेळ - दुपारी २ वाजून २२ मि. करता कार्यारंभीच, श्री गणेश-वंदना ... सफल-संपूर्ण होई सकल मनोकामना ... आळविता मनोभावे त्या श्रीगजवदना, करूनी मानस-पूजा आणि आराधना ... दृष्य-अदृष्य-क्लेषांचे निरसन करी तो ... न मागता, सिध्दि-बुध्दी-यशश्री देई तो ... न सांगता-सवरताच अंतरंग ओळखतो ... निस्सीम भक्ति-भाव-अचूक तो जाणतो ... चराचरात-स्थित, रात्रं-दिन तो पारखतो ... अंतर्यामी-स्थित क्षण-न्-क्षण अनुभवतो ... उडिदामाजी काळे-गोरे अचूकपणे हेरतो ... स्वार्थी-संधीसाधू-भोंदुंना शासनही करतो ... सत्कार्य-परोपकार हेच, महत्त्वपूर्ण मानतो ... स्वच्छ सुंदर अंत:करणातच तो खरा रमतो ... खोटा-भपका-पैशांचा चुराडा यांनी रुष्ट होतो ... भक्तिपूर्ण-आराधनेनेच तो सत्वर प्रसन्न होतो ... 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆 कविता 🌷 ' आराधना ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - बुधवार, २४ जानेवारी २०२४ वेळ - दुपारी २ वाजून २२ मि. करता कार्यारंभीच, श्री गणेश-वंदना ... सफल-संपूर्ण होई सकल मनोकामना ... आळविता मनोभावे त्या श्रीगजवदना, कर...

कविता - बालगीत 🌷 ' मुंगीताई ' तारिख - मंगळवार, २३ जानेवारी २०२४

कविता - बालगीत 🌷 ' मुंगीताई ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - मंगळवार, २३ जानेवारी २०२४ वेळ - ४ वाजून २२ मि. मुंगीताई  मुंगीताई,  लगबग कशापायी ? सांगा ही, सदाचीच कसली इतकी घाई ? वाघ पाठीशी जणू, लागल्या सारख्या ... का हो तुम्ही धावता, वेड्या-सारख्या ? कडक शिस्तिचंही, तुम्ही पालन करता ... नीट रांगा करुन, मग धावतच राहता ... आकाराने तुम्ही ताई, इटुकल्या कित्ती ... रात्रंदिवसाची करता पण धावपळ अति ... कुणाचीच तुम्हांला वाटत नाही का भिती ... सततच्या चालतात हो तुमच्या करामती ... कधी-कधी कुणाशी, पंगाही तुम्ही घेता ... सुमडीत कुठे-कुठे, जाऊन तुम्ही डसता ... मुंगीताई तुम्ही जरी एवढ्याश्शा दिसता, करु शकता हत्ती-दादालाही, वेडापिसा ...! थकणं तर तुमच्या, स्वभावातच नाही ... येते कुठून ही ऊर्जा, सांगा आम्हालाही ... 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४ वेळ - दुपारी १ वाजून ५३ मि. सुंदर, कोमल, रंगीत-झंगीत ... फुला-फुलांवरुन, पाकळीत ... कोण हळूच डोकावून जाते ... बघत बसता नजरच खिळते ... मोहक इतके की वाटे पकडावे, लबाड इतके की हाती न यावे ... भान हरपून पाठीमागे लागावे, तर गुंगारा देऊन निसटून जाते ... रंगीबेरंगी जादू अशी करणारे ... नाजुक-चंचल, खुश करणारे ... फुलांशी खेळते ते फुलपाखरू ... अर्जुनला वाटते, कसे बरं धरू ? पकडा-पकडी जोशात चालते ... आजीची मस्त करमणूक होते ... बागेत सगळीकडे भिरभिरते ... बाळ-गोपाळांना ते फार आवडते ... 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता - बालगीत 🌷 ' ओळखा पाहू '. तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता - बालगीत 🌷 ' ओळखा पाहू ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४ वेळ - दुपारी १ वाजून ५३ मि. बगिच्यात, आभाळात उधळतात सप्त रंग ... बघता क्षणीच पकडायला सगळे होती दंग फुला-फुलांचे रंग लेवून मनमोहक दिसतात ... लहान मोठ्या सगळ्यांनाच सतत लुभावतात  आवाज न करताच ते गुपचुप येऊन बसतात ... मध शोषून झाला की सुमडीत पसार होतात  एवढे लहानसे असूनही सर्वांना वेड लावतात वेड्यासारखे सारे त्यांच्या पाठीमागे धावतात ... किती पाठलाग केला तरी नक्की बगल देतात ... हातावर तुरी देऊन ते बघता-बघता सटकतात ओळखा पाहू कोण आहेत, जे असं करतात ? आकर्षक सुंदर मोहक दिसून सदा मोहवतात ... 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता - बालगीत 🌷 ' इळी मिळी गुपचिळी ' तारिख - शनिवार, २० जानेवारी २०२४

कविता - बालगीत 🌷 ' इळी मिळी गुपचिळी ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - शनिवार, २० जानेवारी २०२४ वेळ - दुपारी १ वाजून ५० मि. इवली इवली चिऊताई ... केव्हढी तिची घाई-घाई ... चोची मधून दाणे न्हेई, पिल्लांना, ती चोचीत देई ... इवला असून तिचा जीव, कसलीच नाही टिव-टीव ... काडी-न् काडी जमवते ... अन् ऊबदार घरटं बांधते ... थंडी-पाऊस जुमानत नाही ... चिवचिव कधी थांबत नाही ... क्षणभराची उसंत नाही ... दमणं तिला माहीतंच नाही ... हिरवे वाटाणे सोलताना, अळी दिसली वळवळताना ! हिरवी-हिरवी, होती अळी ... चोचीत उचलून भुर्र पळाली ... पिल्लांकडे, चिऊताई गेली ... चिऊची पिल्लं खूष झाली ... यावर अर्जुन आणि आजीची ... " इळी मिळी गुपचिळी " ... अर्जुन आणि आजीची ... " इळी मिळी गुपचिळी "... 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता - बालगीत 🌷 ' अळी मिळी गुपचिळी ' तारिख - शनिवार, २० जानेवारी २०२४

कविता - बालगीत 🌷 ' अळी मिळी गुपचिळी ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - शनिवार, २० जानेवारी २०२४ वेळ - दुपारी १ वाजून ५० मि. इवली इवली चिऊताई ... केव्हढी तिची घाई-घाई ... चोचीमधून दाणे न्हेई, पिल्लांना, ती चोचीत देई ... इवला असून तिचा जीव, कसलीच नाही टिव-टिव ... काडी-न् काडी जमवते ... अन् ऊबदार घरटं बांधते ... चिवचिव कधी थांबत नाही ... दमणं तिला माहीतच नाही ... हिरवे वाटाणे सोलताना, अळी दिसली वळवळताना ! हिरवी-हिरवी, होती अळी ... चोचीत उचलून भुर्र पळाली ... पिल्लांकडे, चिऊताई गेली ... अर्जुन अन् आजीची अळी मिळी गुपचिळी  अर्जुन अन् आजीची अळी मिळी गुपचिळी  🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता - बालगीत 🌷 ' बागुलबुवा '. तारिख - बुधवार, १९ जानेवारी २०२४

कविता - बालगीत 🌷 ' बागुलबुवा ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - बुधवार, १९ जानेवारी २०२४ वेळ - दुपारी १२ वाजून ४० मि. बागुलबुवा बागुलबुवा,  तुम्ही असं का करता ? आम्हां छोट्या मुलांना,  असे, का हो घाबरवता ? रोज खेळता-भांडताना,  तुम्ही हजेरी का हो लावता  एकजात सगळ्यांना,  घाबरुन-गुट्ट का करता ? तुमचं नाव ऐकल्यावर, एकदम चिडी-चूप होते ... दंगा मस्ती बंद होऊन, चक्क घाबरगुंडी उडते ... अधुन-मधून कधीतरीच, याल तर एकवेळ चालेल ... रोज रोजची कडक शिस्त, मग घरा-घरातील थांबेल ... फ्रेंडशिप-डेला आलात तर, मस्त गट्टी, आपली होईल ... तुमच्या नावाची भिती मग, कापरासारखी उडून जाईल ... 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता - 🌷 ' मन और मनमोहन ' तारिख - १७ जानेवारी २०२४

कविता - 🌷 ' मन और मनमोहन ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - १७ जानेवारी २०२४ समय - दोपहर के १ बजके ४४ मि. 'मोह' को दूर करनेवाले, हे नन्हे-प्यारे से "मोहन" आप से बढकर हम मानवों को, समझेगा कौन ? आप ने दिया है हमें उच्च ज्ञान-श्रीमद्भगवद्गीतासे ... जीवन सफल हो सकता है, उसी राह पर चलनेसे ... सच्ची राह दिखायी की मन में सदा हो दृढ़ निश्चय ... मनुष्य फिर दुबारा जन्म नहीं लेगा, ये बात है तय ... मोह, माया, ममता, धन-दौलत, यें साथ नहीं आते ... जिंदगी में यें ही सब, जाल बिछाये हमें हैं बहकाते ... छलावे से ही दुनिया, लगने लगती है बड़ी रंगीनसी ... मन से मोह का पर्दा उठ जाने पर, लगती यथार्थसी... मन-मोहन बंसी बजाए, चहुं-ओर खुशीयां बिखराएं ... जीवन-धारा, राधा बनकर सदा उनका साथ निभाएं ! 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता - 🌷 "पुनः पुन्हा जन्मा, येणे नाही" तारिख - ३ ऑक्टोबर २०१६

कविता - 🌷 "पुनः पुन्हा जन्मा, येणे नाही"               तारिख - ३ ऑक्टोबर २०१६ कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले                 मनं हे प्राजक्त ... होऊनी विरक्त, पुनरपि " रत " ... होणे नाही ...... मनं हे अबोली ... वाहिलं ते पायी ... पुनरपि " कायी " ... येणे नाही ...... अर्पूनी कमळ ...🌷 भाव हा निर्मळ ... पुनरपि " पाशी "... गुंतंणे नाही ...... मनं हे जास्वंदी ...🌺 अर्पिले तव-पदी ... संपू दे, आसक्ती ... आता तरी ...... मनं हे " अनंत " ... भाव असे शांत ... नको " येरझारा " ... देवा आता ...... मनं हे चमेली ... मी चरण-धुली ... नको मोह-जाली ... गुंगणे आता ...... मनं हा केवडा ... भाव हा भाबडा ... पुनरपि " विषयी " ... रमणे नाही ...... वाहुनी चंपक ... भाव हा सम्यकं ... पुन्हा इहलोकी ... येणे नाही ...... मनं हे बकुळ ... भाव हा निर्मळ ... पुनरपि " फिरुनी "  येणे नाही ...... मनं हे सायली ... चरणी वाहिली ... कृपेची साऊली ... द्यावी आता ...... मनं हे तगर ... आनंद-सागर ... नैय्या करी पार ... झणी आता ...... मनं हे कर...

कविता - 🌷 " ईश्वरीय वरद-हस्त "

कविता - 🌷 " ईश्वरीय वरद-हस्त "  कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख- २९ सप्टेंबर २०१६ गोड बातमीची हलकीशी चाहूल लागली ... काश्मीरची हनिमून-ट्रीप चांगली फळली ... परत येताना "ती"ची कळी होती खुलली ... या बातमीने दोन्ही घरी आनंद-वर्षा झाली ... सकाळी-सकाळी उठताच प्रसन्न बातमी ... जणू आनंदोत्सवाची ही तर पक्की बेगमी ... सगळं मनासारखं, तरी नको बिल्कुल गुर्मी ... उलटपक्षी अजूनी जास्त, रत व्हावें सद्कर्मी ... लाभल्या "ती"ला दोन-आई-एक स्वतःची जन्मदाती आई ... ती म्हणजे तिची " ए-आई "अन दुसरी एक " अहो - आई" ... त्या म्हणजे तिच्या सासुबाई ... नात्यानं जरी असल्या तिच्या सासूबाई, तितकाच आपलेपणा अन् काळजी घेई... सासरी तिला कधीच "सासर" नाही वाटंलं ... सर्वांकडून भरभरून प्रेम, वात्सल्याचा वर्षाव ... त्यामुळं कधी भासली नाही माहेरच्यांची उणीव ... "अहो-आईंनी" पण खूप केलं तिचं कोड-कौतुक ... अप्पांनी तर नेहमीच तिला वागविलं लेकी-समान ... दिसला तिच्या दिरात, तिला नसलेला भाऊ लहान ... नणंद थोडी अबोल, पण मनानं सरळ, साधी छान ... बाकी सारा गोतावळा...

कविता -🌷 "ज्ञात" मधून"अज्ञात"कडे झेप. तारिख - ११ ऑक्टोबर २०१६

कविता -🌷 "ज्ञात" मधून"अज्ञात"कडे झेप कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - ११ ऑक्टोबर २०१६ नवरात्रीचं अत्यंत शुभ असं पर्व ... दहाव्या दिवशी विजयश्रीचं पर्व ... भारतीय संस्कृतिचा सार्थ गर्व ... प्राचीन वेदांचं-ज्ञान सांगे अथर्व ... विजयादशमी म्हणजे दहाव्या दिवशीचा विजय रामे रावणाचा वध केला, लंकेचा दारुण पराजय  नऊ रात्रींच्या घोर युद्धानंतर दुर्गादेवींचा दिग्विजय पांडवांचा अज्ञातवास संपुन त्यांच्या हक्कांचा जय दशानन रावण युद्ध हरला म्हणून " दश-हरा" ... दहाव्या दिवशी वध केला देवीनं महिषासुरा "विजयादशमी"स विजयाचा-जल्लोष सुरवरा ... "आयुध-पूजा" करून वापरले शस्त्रा-अस्त्रा पांडव लढले शमीच्या झाडावरून आयुधं काढून सारे हक्क त्यांचे परत मिळवले दिग्विजयी होऊन  जीवनातिल सर्व क्लेशांचे, कष्टांचे, पापांचे दहन ... राम-लीलेत श्रीरामांनी केले रावणाचे गर्व-हरण ... असत्यावर सत्याचा विजय ...पांडवांनी कौरवांचा पराजय ... नऊ स्वरूपातील देवींचा जय-रामाचा लंकेशावर दिग्विजय ... खलं-प्रवृत्तींचा समूळ संहार  शौर्याचा-विरतेचा जयजयकार ... नऊ दिवसाच्या उपवासा नंतर,...

कविता -🌷 " जन्म न देताही प्रति-आई ". तारिख - १२ ऑक्टोबर २०१६

कविता -🌷 " जन्म न देताही प्रति-आई " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - १२ ऑक्टोबर २०१६ जन्मल्या जन्मल्या डोळे किलकिले  समोर खूप सारे उत्सुक डोळे दिसले एकटक जणू मलाच पाहत होते सगळे त्यां पलीकडे जाऊन, काहीच न दिसले ... थकून मग मी डोळे मिटले-हे जग नेहमी पेक्षा होते वेगळे पण मस्त वाटत होते निराळे-भूक लागता"अमृत-प्राशन"केले ... तो आनंद मात्र होता अनोखा-पारावर नव्हता माझ्या सुखा आईच्या उबदार कुशी-सारखा-तिच्या मखमली स्पर्शा- सारखा ... आईच होती माझी संपूर्ण दुनिया-अगदी तिच्या सारखी ताईची माया दोघींचा हात फिरता सुखावे काया-मी "ट्याहं" करताच ताईला येई दया ... दर महीन्याला वाढदिवस -आई व ताईचा लागे कस पद्धत होती एकदम राजस-लाडच व्हायचे रात्रं-दिवस ... झोपताना अंगाई कानी पडायची-ती ऐकताना छान झोप लागायची कधी माझ्या आधी ताईच पेंगायची-तिच्या मांडीवर गाढ झोप यायची ... आई कामात मग मी ताईकडे-ताई मला नाचत फिरवी चहूकडे तिच्या हाता रग लागे, फुटे रडे -दुसऱ्या कुणा दिले, की मी रडे ... इतर कुणी मला, घेतलेलं नाही आवडायचं-त्यांचं धसमुसळं वागणं पसंत न पडायचं त्यामुळं लगेच माझं ...

कविता - 🌷 "महागौरीचं कुमारी स्वरूप" तारिख- ८ ऑक्टोबर २०१६

महागौरी-दुर्गा देवीचा आज अष्टम-अवतार! करुया देवीच्या, कुमारी स्वरुपाचा जयकार! कविता - 🌷 "महागौरीचं कुमारी स्वरूप" कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख- ८ ऑक्टोबर २०१६  आजची आहे आठवी ही माला-शोभून दिसते "महागौरीच्या" गळा ... दुर्गेनंच हा अष्टम-अवतार घेतला, सुंदर कोवळी आठ वर्षांची बाला! अत्यंत शुद्ध व पवित्र वीर-बाला ...तपामुळेच गौर वर्ण होता लपला ... गंगास्नान करून मूळ गौर-कांती ...तेजस्वी बिजली-परि चमचमे ती! महागौरीचा सर्वात प्रिय रंग श्वेत ...अलंकार श्वेत, वस्त्रं श्वेत,वर्ण श्वेत ... म्हणून नाव "श्वेतांबरधरा" पडलं,  देवीचा गौरवर्ण चंद्रासमान, शंखासमान-कोमल,नाजूकशी शुभ्र-कुंदकळ्यासमान  महागौरी नाम दर्शवी स्वच्छ गौर-वर्ण- नंदीवर आरूढ, दैदिप्यामान जणू सुवर्ण अलौकिक ज्ञान व अनुभूती ध्यानामुळे, श्रद्धा, विश्वास, निष्ठाभाव वाढे त्यामुळे  देवी दाखवी योग्य दिशा, मार्ग ज्यामुळे, जीवनाची वाट-चाल सुकर, तृप्ती मिळे! चतुर्भुजा-त्रिनेत्रा, बुद्धिमान-शांत देवी उजव्या हाती त्रिशूल,अभय-मुद्रा दावी  शोभे वरद-हस्त अन् डमरू डाव्या हाती -वृषभ असे वाहन,आरूढ त्यावर होई ती  भा...

कविता -🌷 " नातं म्हणजे एक कोमल तंतू ". दिनांक - २७ ऑगस्ट २०१६

कविता -🌷 " नातं म्हणजे एक कोमल तंतू " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले  दिनांक - २७ ऑगस्ट २०१६   नातं म्हणजे एक कोमल तंतू ... रेशीम-किड्या मधून नुकताच निघू लागलेला, भाव-बंधनानी ओलाचिंब झालेला ... आणि तरीही काहीसा निराळा ... आई आणि तिचे बाळ यांचा कधीही न संपणारा एक जिव्हाळ्याचा जीवन-प्रवास ... तान्हुल्यानं घट्ट पकडून ठेवलेल्या इवल्याश्या मुठीत ... अन् आईच्या उबदार कुशीत ... भावा-बहिणीचा एक अवर्णनिय असा, लडिवाळ जीवन-प्रवाह...... राखी-भाऊबीजेच्या औक्षणाने संतत तेवणाऱ्या  नंदादीपा सारखा, शान्त, अखंड व अक्षय..... दोन भावा-भावा मधला एक हवाहवासा वाटणारा ...  लुटुपुटूच्या भांडणानी अजुनच अधिक भक्कम होत जाणारा, विलक्षण अवर्णनीय बंधू -भाव ... पति आणि पत्नीची जन्मोजन्मीची एक अतूट जोडी ... आणि त्या गूढ-बंधनातली अवीट, अगम्य अशी गोडी ... वडील आणि मुलं यांच्यातील हळुवार बंध ... एक बिंब तर दुसरे त्याचेच हुबेहूब प्रतिबिंब ... जणू लाड व शिस्त यांची अचूक अशी सांगड ... वडील आणि लेक यांच्यातील लडिवाळ बंध ... दूधा-वरच्या त्या साईचे केव्हढे कोड-कौतुक ... इथं शिस्त-बिस्त नाही हं, लाडच होतात फ...

कविता - 🌷 " दिव्य-अनुभूती ". तारीख - १३ ऑक्टोबर २०१६

कविता - 🌷 " दिव्य-अनुभूती " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारीख - १३ ऑक्टोबर २०१६ आज तिरुमालाचा छानसा फोटो पाहिला-अन् जुन्या स्मृतींना पुन्हा उजाळा मिळाला... काही गोष्टी आपल्यासाठीच जणू पूर्व नियोजित असती-अचानक भेट देणे तिरुपतीला ... मूळ भन्नाट-कल्पना चंद्रकांतभाईंची-चंद्रकांतभाईं म्हणजे एक भला मित्र ... त्यांनी पोंडीचेरीच्या अरविंदाश्रमची, आणली व्हीव्हीआयपी आमंत्रण-पत्रं! त्यात मुंबई ते पोंडीचेरी रिटर्न तिकीटं-तिथे तारांकित खाणे-पिणे-राहाण्याची सोय पोंडीचेरीच्या समुद्र-किनाऱ्याची होतीच ओढ-वर बोनस श्रीतिरुपती-दर्शनाचा-अलभ्य योग! चंद्रकांतभाईंची योजना होतीच मस्तं-मी पाच महिन्यांची गरोदर, म्हणून मनी थोडं द्वंद्व होतं ... शेवटी बहुधा हामी भरली माझ्या बाळांनंचं-ट्रेनचा प्रवास म्हणून उत्सुकतेपोटी धक-धक... पण आमचे चंद्रकांतभाईं-पक्के-गुज्जूभाई-प्रवासभर खाणं-गप्पा, तोंड हलतं ठेवलं होतं... एखादी गरती बाई काय ठेवेल अशी बडदास्त-त्यातून पोटुशी म्हणून माझं स्तोम फार जास्त ... एकूण पूर्ण प्रवास फारच आरामाचा,आनंदात ... रेनिगुंटा स्टेशनवरून ऍम्बॅसॅडर कार हायर करून तिरुपतीला पोचलो, स्नाना...

कविता - बालगीत 🌷 ' छकुला '. तारिख - शनिवार, ६ जानेवारी २०२४

कविता - बालगीत 🌷 ' छकुला ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - शनिवार, ६ जानेवारी २०२४ वेळ - रात्री ९ वाजून १५ मि. इवलिशी पावले अन् इवलेसे हात, टप्पोरे मस्त डोळे, लकलकतात ... दुडूदुडू चाले, पेंग्विन जसा ... गोब-या गालांचा आमचा ससा ... गोड गोड हसून, आपलंसं करी ... देवघरात जाऊन, नमो-नमो करी ... मधाळ आवाजात तो गाणी गातो ... हात उंचावून "उचलून घे" म्हणतो ... पुस्तकं उघडून, पानं चाळवतो ... चित्रातल्या प्राण्यांशी गप्पा मारतो ... एका पायावर भुर्र जायला तयार ... गाडीत बसून, टुकुर-टुकुर बघणार ... मस्ती करतो अन् "ओ नो" म्हणतो ... मिश्कीलपणाने नाक उडवून हसतो ... अस्सा गोड आमचा, अर्जुन छकुला ... त्याच्याशी खेळताना, वेळही थांबला ...! 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता - बालगीत 🌷 ' हूप हूप हूप '. तारिख - शुक्रवार, ५ जानेवारी २०२४

कविता - बालगीत 🌷 ' हूप हूप हूप ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - शुक्रवार, ५ जानेवारी २०२४ वेळ - दुपारी १ वाजून ३ मि. माकडा माकडा, हूप हूप हूप तुझ्या शेंडीला, शेरभर तूप हूप हूप हूप, शेरभर तूप  मस्ती करूया खूप खूप खूप फांदी-फांदीवर, झाडा-झाडांवर बिनधास्त उड्या, मारतोस तू आंबा, पेरू, केळ्यांवर- चांगलाच ताव, मारतोस तू माणसां सारखा, चालतोस तू ... नक्कल करण्यात‌ तरबेज तू सर-सर झाडांवर चढतोस तू ... गोलांट्या उड्या मारतोस तू ... श्री हनुमानाचा, वंशज तू ... बुध्दिमान अन् चतुर तू ... माकडचेष्टा करतोस तू ... आम्हां खूप खूप हसवतोस तू माकडा माकडा, हूप हूप हूप ... तुझ्या शेंडीला, शेरभर तूप ... 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता - 🌷 ‘ पालवी ‘ तारीख - रविवार, २९ सप्टेंबर २०१९

कविता - 🌷 ‘ पालवी ‘ कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारीख - रविवार, २९ सप्टेंबर २०१९ अजून एक नवा करकरीत दिवस येतो ... नव्या आशांची कोवळी पालवी लेऊन ! पुन्हा तो आशाळभूत होऊन, जणू मुजरा करीत तो लवून ... अपेक्षांचं असं ओझं लादून, नव-बदलांची जाणीव होऊन ... तशात विचार जातो चाटून  अंगात काटा येतो सरसरून ! पाच गेले अन् पन्नास राहिले म्हणता-म्हणता आली पन्नाशी ... पालटत गेली सगळी परिस्थिती ... तेंव्हाच बदलांची जाणीव झाली ... हे असं वारंवार का बरं घडतं, याच विचाराने तनमन पोखरतं ... अपेक्षा बाळगून, निराश होऊन ... पदरी फक्त, नवीन अनुभव येतो ! तरुण सळसळतं रक्तं, नवा जोश नवनवीन योजना+आनंदी जल्लोष मग प्रश्नांची ही झुंड हवी कशाला ? झुंज न देता, विषयाला बगल देऊन ... नवं-नवं सगळंच, हवं-हवंसं वाटतं ... जुनं-पानं मग पार निरूपयोगी ठरतं ... अनुभवाचे बोल, वाटू लागतात फोल ... सोईस्करपणे  करती,  ऐकलं-न ऐकलं ... अजून एक नवा करकरीत दिवस येतो ... सोनसळी संकेतासह हसत-खेळत येतो  नव्या आशांची कोवळी पालवी लेऊन ! नव्या आशांची कोवळी पालवी लेऊन ! 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता : 🌷 ' भान '. दिनांक : सोमवार, २१ नोव्हेंबर २०२२

कविता : 🌷 ' भान ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले दिनांक : सोमवार, २१ नोव्हेंबर २०२२ वेळ : रात्री ९ वाजून ४० मि. चाल : "अवघा रंग एक झाला" आता जन्म नको पुन्हा भक्तीत जो चिंब झाला llधृll संसारात रमूनी गेला,  स्वार्थात जो गुरफटला  जेव्हा भानावरती आला, भक्तीत तो चिंब झाला ll१ll मोह माया खुणवी त्याला असंगती भुलवी त्याला जेव्हा भानावरती आला, भक्तीत तो चिंब झाला ll२ll प्रेम-पाशात गुंतून गेला  अवघे देहभान भुलला जेव्हा भानावरती आला, भक्तीत तो चिंब झाला, भक्तीत तो चिंब झाला ll३ll 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता : 🌷' खरी श्रीमंती '. तारिख : रविवार, ५ मार्च २०२३

कविता : 🌷' खरी श्रीमंती ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले  तारिख : रविवार, ५ मार्च २०२३ वेळ : ११ वाजून २२ मि. "अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने ?" ही स्थिती  तरीही "चमडी देगा पर दमडी नहीं देगा" अशी कद्रू, कृपण प्रवृत्ती ! कधी कधी असं होतं की ज्या कशाला हात लावू, सोनं होतं त्याचंही ! अशावेळी खिसे गरम, तिजोरी भक्कम, नव्या-कोर्या गाड्यांची चमचम...  बंगले, नवं कोरं पेंट-हाऊस, प्रतिष्ठित स्पोर्ट्स क्लबातून खास आमंत्रण ! इतकी सगळी 'माया' जमवल्यावरही, अंतरंगात मात्र 'ठणठण गोपाळ' ! स्वार्था-पलीकडे जाऊन कोणासाठी, अंगाला घस लावून कशाला घ्याल ? भरमसाठ पैसे फेकूनही कोणी 'मनाची श्रीमंती' विकत घेऊच शकत नाही,  उपजत नसल्यास, परिस्थितीनं डोळ्यात अंजन घातल्याविना ती येत नाही  एकदा का डोळ्यांवरची झापडं उघडली की, तो खरा भानावर येऊ शकतो आजवरच्या चुकांनी पश्चात्ताप-दग्ध होऊन, मनोमन चांगलाच खजील होतो 'खरी श्रीमंती' ही मनाच्या मोठेपणाची, उदारतेची, सदा माणुसकी जपणारी स्वकष्टांची पर्वा न करता, नि:स्वार्थभावाने मदतीचा हात नित्य पुढे करणारी ...

कविता : 🌷' मुख्य भान '. तारिख : गुरुवारी, २७ एप्रिल २०२३

कविता : 🌷' मुख्य भान ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : गुरुवारी, २७ एप्रिल २०२३ वेळ : १ वाजून ४०  'सुख सुख' म्हटलं तर ते नेमकं असं काय हवं असतं ? खरं म्हणाल तर सारं सारं काही अंतरीच नांदत असतं ! जन्मतःच अति-सूक्ष्म-अति-तरल-अंतरात्मा हृदयी असतो हृदयांतरीचा सुप्त असा तो ईश्वरीय-अंश हसवतो-खुलवतो ! लडिवाळ-निष्पाप बालपणात त्वरित टिपून घेतो सर्व काही मनाची पक्की जडण-घडण होते माऊलीच्या सुसंस्कारांनी ! निरागस मैत्री-सहकार्याचे संस्कार सतत घडतात बालवाडीत शालेय-जीवन पैलू पडून जणू रुपांतरित होतं दगडातून मूर्तीत ! महाविद्यालय-प्रशिक्षण कामी येतं, नोकरी मिळवण्यासाठी स्वतःच्या पायांवर ठाम उभे, कौटुंबिक-कर्तव्य-पालनासाठी ! या संपूर्ण प्रवासात 'माणूसकीनं कसं जगावं' याचं मुख्य भान, ज्याला-त्याला आपापल्या परीनेच कमवावं लागतं त्याचं ज्ञान ! @तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता 🌷 ' जाणीव '. तारिख : सोमवार, १९ जून २०२३

कविता 🌷 ' जाणीव ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : सोमवार, १९ जून २०२३ वेळ : ०८ वाजून ५४ मि. असं का व्हावं, माणसं गेली की त्यांची खरी 'किंमत' जाणवावी, त्यांच्या 'नसण्यानं' बेचैनी व्हावी विचारानं मनाची घालमेल व्हावी ! बेफिकीर वृत्तीनं वर्तमान वाहतो जाताना सोबत सुखालाही न्हेतो  बंद डोळ्यांना जाणीवही नसते ! जेव्हा ती होते वेळ गेलेली असते ! कधी वाटतं ते मायाजाल असावं, ज्यात भुरळ पडून भरकटत जावं  तन-मन गुरफटून भानही हरपावं ! जणू भूल पडून सर्वच धूसर व्हावं ! कैक जन्मांची पुण्याई कामी यावी  सुखाने पायांपाशी लोळण घ्यावी ! हुशार-प्रेमळ-पतीची साथ मिळावी प्रेम-लाड-कौतुकाची बरसात व्हावी ! कुणा काळ्या-बेर्याची दृष्ट लागावी, मोकाट जनावरा-सम वृत्ती पलटावी  सारासार-बुद्धी काम करेनाशी व्हावी, चुकीच्या झापडांनी, मती गुंग व्हावी ! पश्चात्तापाने फार काही बदलत नाही गेलेला सुवर्ण-काळ परत येत नाही ! झालेल्या चुकांची जाणीव जात नाही बेगडी-मुखवटा फारकाळ टिकत नाही  @तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता - 🌷' भाग्याचा ठेवा '. दिनांक - ३ जानेवारी २०२४

कविता - 🌷' भाग्याचा ठेवा ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले दिनांक - ३ जानेवारी २०२४ वेळ - दुपारी, ३ वाजून २३ मि. खरोखरच हा भाग्याचा केवढा मोठा आहे ठेवा ... इतका की इतरांना वाटू शकतो अशा भाग्यशालींचा हेवा...! सदैव डोक्याचे, शरीराचे, मनाचे सगळे विभाग शाबूत व कार्यक्षम असणे ही फार मोठी गोष्ट आहे... वय वाढूनही विस्मृती न होणे, सर्व गोष्टी चांगल्या लक्षात ठेवता येणे ... दृष्टी आणि श्रवणशक्ती अगदी शंभर जरी टक्के नाही... तरी किमान बिना-तक्रार, कुरबुरीविना, दैनंदिन जीवनात कार्यक्षम राहण्या एवढी शाबूत असणे ... थोडक्यात काय तर नाकावर चष्मा आणि कानात यंत्र लावण्याची गरजच न भासणे ... व्यवस्थितपणे चावायला आणि थोडी शोभेला-हसायला, दंतपंक्तींची उपस्थिती असणे अत्यंत महत्त्वाचे... बत्तीशी शाबूत असणे, ऊसाची कांडी जमो न जमो, निदान चिक्की, तीळगुळाचे लाडू खाणे ... घ्राणेंद्रिय कार्यशील असून, मस्त मोगरा, अनंत, बकुळी आदींच्या सुगंधाचा मनसोक्त आस्वाद घेता येणे... या अन् अशा अनेकानेक अतिशय सामान्य पण तरीही अक्षरशः स्वर्गीय सुखांच्या वर्षावात चिंब होता यावे... कसलीही (तब्येतीची वा पैशाची) फिकीर न करता,...

कविता - 🌷' खरं कसब '. दिनांक - २ जानेवारी २०२३

कविता - 🌷' खरं कसब ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले दिनांक - २ जानेवारी २०२३ वेळ - सकाळी ११ वाजून २६ मि. बघता-बघता सरुन गेलं, जुनं-पानं मावळतं वर्ष ... नव आशा-आकांक्षांचं, आलं-आलं हे नूतन वर्ष ! राग, रुसवे-फुगवे सारेच ... गेले घाबरून दूर पळून, नव्या उमेदीने क्षणन्-क्षण जगूया आता भरभरून ! कडू-गोड, चुकलं-माकलं ... सगळं-सगळं माफ करून, नूतन वर्षाला सामोरे जावू, झालं-गेलं सर्वच विसरून ! सरलेलं ते जुनं वर्ष होतं ... जणू एक जुनंच पुस्तक, पूर्ण वाचून मनन करून ...  भलतंच गरगरलं मस्तक ! आता आयतं हातात पडलंय, नवं करकरीत असं हे पुस्तक ... ३६५ पानांमधून सुवर्ण लुटून, मग होऊ आपण नत-मस्तक ! " केल्याने होत आहे रे " " आधी केलेची पाहिजे " श्री समर्थांचे हे सार्थ-वचन,  आचरणात आणले पाहिजे ! आयुष्य कितीही जरी मिळालं, तरीही सदैव ते तुटपुंजं वाटतं ... "उद्याला करु" असं म्हणंत-म्हणंत, अवघं आयुष्य सरून जाऊ शकतं ! "कल करे सो आज कर",  " आज करे सो अब ! " जगूया अर्थपूर्ण-सुंदर-जीवन,  त्यातच दडलं आहे खरं कसब ! 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता - 🌷' खरं कसब '. दिनांक - २ जानेवारी २०२३

कविता - 🌷' खरं कसब ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले दिनांक - २ जानेवारी २०२३ वेळ - सकाळी ११ वाजून २६ मि. बघता-बघता सरुन गेलं, जुनं-पानं मावळतं वर्ष ... नव आशा-आकांक्षांचं, आलं-आलं हे नूतन वर्ष ! राग, रुसवे-फुगवे सारेच ... गेले घाबरून दूर पळून, नव्या उमेदीने क्षणन्-क्षण जगूया आता भरभरून ! कडू-गोड, चुकलं-माकलं ... सगळं-सगळं माफ करून, नूतन वर्षाला सामोरे जावू, झालं-गेलं सर्वच विसरून ! सरलेलं ते जुनं वर्ष होतं ... जणू एक जुनंच पुस्तक, पूर्ण वाचून मनन करून ...  भलतंच गरगरलं मस्तक ! आता आयतं हातात पडलंय, नवं करकरीत असं हे पुस्तक ... ३६५ पानांमधून सुवर्ण लुटून, मग होऊ आपण नत-मस्तक ! " केल्याने होत आहे रे " " आधी केलेची पाहिजे " श्री समर्थांचे हे सार्थ-वचन,  आचरणात आणले पाहिजे ! आयुष्य कितीही जरी मिळालं, तरीही सदैव ते तुटपुंजं वाटतं ... "उद्याला करु" असं म्हणंत-म्हणंत, अवघं आयुष्य सरून जाऊ शकतं ! "कल करे सो आज कर", " आज करे सो अब ! " जगूया सुंदर असं जीवन, त्यातच आहे खरं कसब ! 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता -🌷 ' अशी सुवर्ण-संधी '. तारिख - २२ नोव्हेंबर २०१६

कविता -🌷 ' अशी सुवर्ण-संधी ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - २२ नोव्हेंबर २०१६ मोहोजाळ घाली वेटोळे ... वेढूनी कधी बसे न कळे ... अळवा-सम जर मन असे तृप्त, ... जल-थेंबापरि राही, ते अलिप्त ... अज्ञानाची करोडों-लक्ष झापडं ... मति बंद, डोळे उघडे जरी सताडं ... अतृप्तीच सर्वं वासनांचे, असे मूळ ... दुःखी करी जीवा लावूनी भलते खूळ ... बिलगून बसे, मुंगी जशी न सोडी गूळ ... मन-अधीन भरकटे, होऊनी दिशाभूल ... बुध्दी-भ्रष्ट होऊन, चाले अति-मंद ... चुकीच्या जागी, मग शोधी आनंद ... वागणं-बोलणं-आचरण, सर्व बेबंद ... बाळगूनी फुकाचा तो उन्मत्त-दर्प ... फुत्कार मारीं अंतस्थ विषारी सर्प ... पापं करुन-सवरुन, वरुन करी शंखं ... संधी साधून हमखास मारीतसे डंखं ... जमवल्या पापांच्या अगणित राशी ... उन्मत्तपणा भरीसभर होताच राषी ... आता कितीही जरी झाली उपरती, ... परत येणे नाही, निसटून गेलेली रेती ... सरळ मार्गी जीवा, पडे अति-संभ्रम ... न कळे, काय करावे, होतसे विभ्रम ... मुजोर जीव सोकावें, बनूनी बेशरम ... सोडी पूर्ण ताळ-तंत्र, लाज व शरम ... पापं करण्याचं पण लागू शकतं व्यसन- अंगातली हुशारी, गैर-प्रकारांनी वाप...

कविता - बालगीत 🌷 ' लब्बाड चांदोबा '. तारिख - सोमवार, १ जानेवारी २०२४

कविता - बालगीत 🌷 ' लब्बाड चांदोबा ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - सोमवार, १ जानेवारी २०२४ वेळ - दुपारी ४ वाजून ३३ मि. रात्रीच्या वेळी आभाळात, चमचम करीत, चांदण्यात ... एक गोलमटोल चांदोबा, ... हसतो गालातल्या गालात ...! सर्वांबरोबर चालत राहतो ... आपण थांबलो की थांबतो ...! चांदण्यांबरोबर खेळ खेळतो ... ढगांच्या आड,  मध्येच  लपतो ...! कधी कधी पाण्यात दिसतो ... कधी कधी गायबच असतो ...! एक दिवस होतो, टुम्म पुरी ...! नंतर लहान-लहान, होत जातो ! आजीच्या गोष्टीत, रोजच येतो ... मजेशीर खूप-खूप गमती करतो ...! अर्जुन झोपला की, पळ काढतो ... स्वप्नात लब्बाड, हळूच डोकावतो ...! 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆

कविता - बालगीत 🌷 ' गट्टी '. तारिख - सोमवार, १ जानेवारी २०२४

कविता - बालगीत 🌷 ' गट्टी ' कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - सोमवार, १ जानेवारी २०२४ वेळ - दुपारी ३ वाजून ०२ मि. हत्ती दादा हत्ती दादा, तुम्ही फार आवडता ... बाप्पा मोरया सारखे, तुम्ही खरंच दिसता ...! हिरवं गवत, झाडपाला, तुम्हाला हवा, खायला ... सोंडेत भरून पाणी, होळी सुध्दा खेळता ...! सह-कुटुंब, सह-परिवार कळपाने तुम्ही फिरता ... लहान-मोठ्या सर्वांवर ... खूप खूप रोब झाडता ... असह्य तलखीत तुम्ही, पाण्यात डुंबत बसता ... कळपातील हत्तीं-बरोबर, धम्माल मस्ती करता ...! तुम्ही महा-शक्तिशाली ... अफाट  तुमची  बुद्धिमत्ता ... प्रसंग पाहून तुम्ही, डोक्यानेच कामं करता ... चेंडू जवळ आला तुमच्या, त्याला, लांबवर फेकता ! कोणताही असो खेळ तुम्ही, पटकन् खेळात रमता ... अर्जुनच्या प्रत्येक गोष्टीत, हमखास हजेरी लावता ... छोट्यांबरोबर गट्टी तुमची, त्यांना तुम्हीच, आवडता ...! 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆