कविता - बालगीत 🌷 ' अळी मिळी गुपचिळी ' तारिख - शनिवार, २० जानेवारी २०२४

कविता - बालगीत 🌷 ' अळी मिळी गुपचिळी '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - शनिवार, २० जानेवारी २०२४
वेळ - दुपारी १ वाजून ५० मि.

इवली इवली चिऊताई ...
केव्हढी तिची घाई-घाई ...

चोचीमधून दाणे न्हेई,
पिल्लांना, ती चोचीत देई ...

इवला असून तिचा जीव,
कसलीच नाही टिव-टिव ...

काडी-न् काडी जमवते ...
अन् ऊबदार घरटं बांधते ...

चिवचिव कधी थांबत नाही ...
दमणं तिला माहीतच नाही ...

हिरवे वाटाणे सोलताना,
अळी दिसली वळवळताना !

हिरवी-हिरवी, होती अळी ...
चोचीत उचलून भुर्र पळाली ...

पिल्लांकडे, चिऊताई गेली ...
अर्जुन अन् आजीची
अळी मिळी गुपचिळी 
अर्जुन अन् आजीची
अळी मिळी गुपचिळी 

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆






















Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "