कविता - 🌷 ‘ पिंगा‘ तारीख - शुक्रवार, २० सप्टेंबर २०१९
कविता - 🌷 ‘ पिंगा‘
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारीख - शुक्रवार, २० सप्टेंबर २०१९
माणसांत जेवढे गुण असतात ...
तेवढे दोषही भरलेले असतात ...
कळत-नकळतच चुका होतात ...
नंतर त्यांची प्रश्नचिन्ह बनतात !
त्यावेळी टाकलेली दोन पावलं ...
हळहळ बनून मग फेरा धरतात ...
काय चूक होतं अन् काय बरोबर,
या संभ्रमातच, कैक वर्षं सरतात ...
बुडत्याला जसा काडीचा आधार ...
डोळे कारणांचा वेध घेत राहतात !
गुंता-गुंत मनातली किचकट फार ...
अशानं स्वप्नं कशी होणार साकार ?
मुठीत पकडून एखादं फुलपाखरू,
तळवा आपसूक रंगीत होऊन जातो ...
निष्पाप जीव मात्र कासावीस होऊन,
जगण्यासाठी शर्थीनं, धडपड करतो ...
जे जे घडायचं होतं ते घडून गेल्यावर,
सारा आसमंत होई एकदम शांत शांत ...
दर्याकिनारी लाटा करती अविरत दंगा ...
मनांतरी मात्र विचारांचा सततचा पिंगा ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Comments
Post a Comment