कविता - बालगीत 🌷 ' गट्टी '. तारिख - सोमवार, १ जानेवारी २०२४

कविता - बालगीत 🌷 ' गट्टी '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - सोमवार, १ जानेवारी २०२४
वेळ - दुपारी ३ वाजून ०२ मि.

हत्ती दादा हत्ती दादा,
तुम्ही फार आवडता ...
बाप्पा मोरया सारखे,
तुम्ही खरंच दिसता ...!

हिरवं गवत, झाडपाला,
तुम्हाला हवा, खायला ...
सोंडेत भरून पाणी,
होळी सुध्दा खेळता ...!

सह-कुटुंब, सह-परिवार
कळपाने तुम्ही फिरता ...
लहान-मोठ्या सर्वांवर ...
खूप खूप रोब झाडता ...

असह्य तलखीत तुम्ही,
पाण्यात डुंबत बसता ...
कळपातील हत्तीं-बरोबर,
धम्माल मस्ती करता ...!

तुम्ही महा-शक्तिशाली ...
अफाट तुमची बुद्धिमत्ता ...
प्रसंग पाहून तुम्ही,
डोक्यानेच कामं करता ...

चेंडू जवळ आला तुमच्या,
त्याला, लांबवर फेकता !
कोणताही असो खेळ तुम्ही,
पटकन् खेळात रमता ...

अर्जुनच्या प्रत्येक गोष्टीत,
हमखास हजेरी लावता ...
छोट्यांबरोबर गट्टी तुमची,
त्यांना तुम्हीच, आवडता ...!

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆




































Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "