कविता : 🌷 ' भान '. दिनांक : सोमवार, २१ नोव्हेंबर २०२२
कविता : 🌷 ' भान '
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
दिनांक : सोमवार, २१ नोव्हेंबर २०२२
वेळ : रात्री ९ वाजून ४० मि.
चाल : "अवघा रंग एक झाला"
आता जन्म नको पुन्हा
भक्तीत जो चिंब झाला llधृll
संसारात रमूनी गेला,
स्वार्थात जो गुरफटला
जेव्हा भानावरती आला,
भक्तीत तो चिंब झाला ll१ll
मोह माया खुणवी त्याला
असंगती भुलवी त्याला
जेव्हा भानावरती आला,
भक्तीत तो चिंब झाला ll२ll
प्रेम-पाशात गुंतून गेला
अवघे देहभान भुलला
जेव्हा भानावरती आला,
भक्तीत तो चिंब झाला,
भक्तीत तो चिंब झाला ll३ll
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Comments
Post a Comment